धक्कादायक! 60 वर्षीय महिलेचा अनैतिक संबंधातून खून झाल्यानं खळबळ

संबंधित महिलेच्या ओळखीतील संभाजीनगर येथे राहणाऱ्या व्यक्तीने अनैतिक संबंधातून खून केल्याची माहिती समोर आली.

  • संतोष नलावडे, टीव्ही 9 मराठी, सातारा
  • Published On - 21:27 PM, 21 Jan 2021
धक्कादायक! 60 वर्षीय महिलेचा अनैतिक संबंधातून खून झाल्यानं खळबळ

साताराः  गेल्या काही दिवसांपूर्वी साताऱ्यात 60 वर्षीय महिलेचा खून झाल्यानं एकच खळबळ उडाली होती. कृष्णानगर येथे 60 वर्षीय महिलेचा झालेला खून हा अनैतिक संबंधातून झाल्याची आता धक्कादायक माहिती समोर आलीय. कृष्णानगर परिसरात 15 तारखेला सकाळी धारदार शस्त्राने गळ्यावर वार करून अज्ञात व्यक्तीने खून केल्याची धक्कादायक घटना घडली होती. सातारा शहर पोलीस ठाण्यातही याची नोंद झाली होती. यानंतर या प्रकरणाचा तपास सातारा पोलिसांनी सुरू केल्यावर संबंधित महिलेच्या ओळखीतील संभाजीनगर येथे राहणाऱ्या व्यक्तीने अनैतिक संबंधातून खून केल्याची माहिती समोर आली. (60 Year Old Woman Was Murdered In An Immoral Relationship)

या प्रकरणी संशयित आरोपी 33 वर्षीय अनंत पेढणेकर याला पोलिसांनी अटक केली. मृत महिला अनेक छोट्या मराठी मालिकांमध्ये काम करत होती. संशयित आरोपीचे घरी जाणे-येणे होते. महिला घरी एकटी राहत असल्यामुळे संशयित आरोपी सोबत प्रेमसंबंध तिचे जुळले होते. या प्रकरणात मृत महिलेने संशयित आरोपीला तिच्यासोबत घरातच राहण्याचा तगादा लावला होता. यामुळे दोघांच्यात भांडण झाल्याने रागाच्या भरात संशयित आरोपी अनंत पेडणेकरने हे कृत्य केल्याची कबुली दिली आहे. मात्र या अनैतिक संबंधाच्या हत्येने सातारा जिल्ह्यात मोठी खळबळ उडालीय.

काय आहे प्रकरण?

या महिलेची शनिवार 16 रोजी मध्यरात्री राहत्या बंगल्यामध्ये अज्ञाताने गळा चिरून हत्या केली होती. या घटनेमुळे कृष्णानगर परिसरात प्रचंड खळबळ उडाली होती. शहर पोलीस ठाण्यातील दोन पथके आणि स्थानिक गुन्हे शाखेचे एक पथक या खून प्रकरणाचा तपास करत होते. पीडित महिलेच्या मोबाईलवर वारंवार फोन करणा-या व्यक्तींचीही पोलिसांनी कसून चौकशी केली.

यातूनच काही महत्त्वाची माहिती शहर पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेला मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी अनंत पेडणेकर याला चौकशीसाठी ताब्यात घेतले. सुरुवातीला त्याने टोलवाटोलवी करत पोलिसांना गुंगारा देण्याचा प्रयत्न केला. परंतु त्याला पोलिसी खाक्या दाखविताच त्याने क्षणाचाही विलंब न करता खुनाची कबुली दिली. अनैतिक संबंधातून खून केल्याचे पेडणेकरने पोलिसांना सांगितले.

संबंधित बातम्या

सातारा हादरलं, धारदार शस्त्राने वार करुन तरुणाची हत्या

60 Year Old Woman Was Murdered In An Immoral Relationship in satara