आगर माळवा : मध्य प्रदेशातील आगर माळवा जिल्ह्यात पती-पत्नीच्या वादातून एक धक्कादायक घटना घडली आहे. क्षुल्लक कारणातून झालेल्या वाद पत्नीच्या जीवावर बेतला आहे. शेतात काम करत असतानाच पती-पत्नीमध्ये काही कारणावरुन वाद झाला. या वादातून पत्नीने आधी पत्नीचे नाक कापले. यामुळे संतापलेल्या पतीने तिच्यावर धारदार शस्त्राने वार केले. यात पत्नीचा मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवला. तर आरोपी पतीलाही उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. आरोपी पतीवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत. बबिता पाटीदार आणि त्रिलोक पाटीदार अशी पती-पत्नीची नावे आहेत.