#क्राईम किस्से : हेल्मेटने 14 वार, वायरने गळा आवळला, प्रियदर्शिनी मट्टू हत्या प्रकरणी पोलीस महानिरीक्षकाचा पोरगा होता आरोपी

प्रियदर्शनी कायद्याच्या तिसर्‍या वर्षाला शिकत असताना तिच्या मामाच्या घरी गळा आवळलेल्या अवस्थेत सापडली होती. हत्येपूर्वी तिच्यावर बलात्कार झाला होता, मोटरसायकलच्या हेल्मेटने तिच्यावर 14 वेळा वार करण्यात आले होते आणि शेवटी वायरने तिचा गळा दाबला होता.

#क्राईम किस्से : हेल्मेटने 14 वार, वायरने गळा आवळला, प्रियदर्शिनी मट्टू हत्या प्रकरणी पोलीस महानिरीक्षकाचा पोरगा होता आरोपी
संतोष सिंग, प्रियदर्शिनी मट्टू
Follow us
| Updated on: Nov 06, 2021 | 8:10 AM

मुंबई : प्रियदर्शिनी मट्टू (Priyadarshini Mattoo) या कायद्याचं शिक्षण घेणाऱ्या 25 वर्षीय विद्यार्थिनीची 23 जानेवारी 1996 रोजी हत्या करण्यात आली होती. नवी दिल्लीतील तिच्या मामाच्या घरी बलात्कार करुन तिचा खून करण्यात आला होता. 17 ऑक्टोबर 2006 रोजी दिल्ली उच्च न्यायालयाने संतोष कुमार सिंगला बलात्कार आणि खून या दोन्ही गुन्ह्यांसाठी दोषी ठरवले आणि त्याच वर्षी 30 ऑक्टोबर रोजी त्याला फाशीची शिक्षा सुनावण्यात आली होती. मात्र चार वर्षांनी, 6 ऑक्टोबर 2010 रोजी सर्वोच्च न्यायालयाने त्याची फाशीची शिक्षा जन्मठेपेत बदलली. पोलीस महानिरीक्षकाचा मुलगा असलेल्या संतोष कुमार सिंग याला यापूर्वी 1999 मध्ये एका ट्रायल कोर्टाने निर्दोष मुक्त केले होते. त्यामुळे उच्च न्यायालयाच्या निर्णयाला भारतातील एक महत्त्वाची उलथापालथ मानले गेले होते.

कोण होती प्रियदर्शिनी मट्टू 

प्रियदर्शिनी मट्टू ही काश्मिरी पंडित होती. तिचे बालपण श्रीनगरमध्ये गेले. श्रीनगरमधील प्रेझेंटेशन कॉन्व्हेंट स्कूलमध्ये शालेय शिक्षण पूर्ण केल्यानंतर, काश्मीरमधील वाढत्या इस्लामिक दहशतवादामुळे प्रियदर्शिनी आपल्या कुटुंबासह जम्मूमध्ये स्थलांतरित झाली. प्रियदर्शिनीने जम्मूमध्ये असताना एमएएम कॉलेजमधून बीकॉम शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर एलएलबी पदवी मिळवण्यासाठी तिने दिल्ली विद्यापीठात प्रवेश घेतला. दिल्लीत शिकत असताना संतोष सिंगने तिच्याशी जवळीक साधली आणि अश्लील पद्धतीने प्रपोज केले. एक दिवशी त्याने तिचा पाठलाग सुरू केला. त्यामुळे तिच्या कुटुंबीयांनी पोलिसांकडे एफआयआरही दाखल केला. काही काळ तिला पोलिस संरक्षण देण्यात आले होते, मात्र संतोषकडून पाठलाग सुरूच होता.

हेल्मेटने तिच्यावर 14 वेळा वार

प्रियदर्शनी कायद्याच्या तिसर्‍या वर्षाला शिकत असताना तिच्या मामाच्या घरी गळा आवळलेल्या अवस्थेत सापडली होती. हत्येपूर्वी तिच्यावर बलात्कार झाला होता, मोटरसायकलच्या हेल्मेटने तिच्यावर 14 वेळा वार करण्यात आले होते आणि शेवटी वायरने तिचा गळा दाबला होता. कॉलेजमध्ये तिला सिनिअर असलेला संतोष कुमार सिंग अनेक वर्षांपासून तिचा पाठलाग आणि छळ करत होता. त्यामुळे तो या प्रकरणात मुख्य संशयित होता. पण संतोष एका पॉवरफुल कुटुंबातील होता. त्याचे वडील जे.पी. सिंग हे पाँडिचेरीचे पोलिस महानिरीक्षक होते. खटल्याच्या काळात, त्यांनी दिल्लीत सह पोलिस आयुक्त म्हणून काम केले. हे संबंध लक्षात घेऊन न्यायालयाने या प्रकरणाचा तपास केंद्रीय अन्वेषण विभागाकडे (सीबीआय) सोपवला होता.

1995 मध्ये प्रियदर्शिनीने संतोष सिंग आपला छळ करत असल्याची तक्रार केली होती. त्यावेळी तिला वैयक्तिक सुरक्षा अधिकारी देण्यात आला होता. याचा बदला घेत संतोषने ती एकाच वेळी दोन पदव्या मिळवत असल्याचा आरोप करत विद्यापीठाकडे तक्रार केली होती. मात्र प्रियदर्शिनी 1991 मध्ये एम.कॉम उत्तीर्ण झाली होती आणि तक्रार केवळ सूडभावनेने करण्यात आल्याचे निष्पन्न झाले.

प्रियदर्शिनीच्या मामाच्या घरात हत्या

23 जानेवारी 1996 च्या सकाळी, संतोष दिल्लीच्या वसंत कुंज भागात प्रियदर्शिनीच्या मामाच्या घरात जाण्यासाठी दरवाजा ठोठावताना दिसला होता. एका नोकराने संतोषला तिच्या घरात प्रवेश करताना पाहिले होते. मात्र संतोषने सांगितले की, मला कायदेशीर तक्रारींमध्ये तडजोड करण्यासाठी तिच्याशी बोलायचे आहे. त्यानंतर, संतोषने तिच्यावर बलात्कार केला, इलेक्ट्रिक वायरने तिचा गळा दाबला आणि नंतर मोटरसायकलच्या हेल्मेटने तिचा चेहरा ओळखण्यापलिकडे बिघडवला. मात्र जवळपास दहा वर्षांनी, 17 ऑक्टोबर 2006 रोजी दिल्ली उच्च न्यायालयाने संतोष कुमार सिंगला बलात्कार आणि खून या दोन्ही गुन्ह्यांसाठी दोषी ठरवले.

Non Stop LIVE Update
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका.
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी.
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत.
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास.
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत.
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?.
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?.
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?.
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा.
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात.