Osmanabad Delivery : दुर्दैवी ! उस्मानाबादमध्ये स्त्री रुग्णालयात महिलेची बाथरूममध्ये प्रसुती, आरोग्यमंत्री डॉ. तानाजीराव सावंत यांच्या जिल्ह्यातील प्रकार

उपजिल्हा रुग्णालय असो की ग्रामीण रुग्णालय की उपकेंद्र, या सर्व ठिकाणावरून अनेक वेळा रुग्णांना उस्मानाबाद येथे रेफर करण्यात येतं. हा प्रकार कमी झाल्यास जिल्ह्याच्या ठिकाणी असलेल्या रुग्णालय व यंत्रणेवरील कामाचा ताण काही प्रमाणात कमी होऊ शकतो.

Osmanabad Delivery : दुर्दैवी ! उस्मानाबादमध्ये स्त्री रुग्णालयात महिलेची बाथरूममध्ये प्रसुती, आरोग्यमंत्री डॉ. तानाजीराव सावंत यांच्या जिल्ह्यातील प्रकार
स्त्री रुग्णालयात महिलेची बाथरूममध्ये प्रसुतीImage Credit source: TV9
Follow us
| Updated on: Aug 25, 2022 | 12:02 AM

उस्मानाबाद : महाराष्ट्राच्या आरोग्य सेवेचा बोजवारा कसा उडाला आहे, हे सांगणारी घटना उस्मानाबाद जिल्हा स्त्री रुग्णालयात घडली आहे. विशेष म्हणजे राज्याचे आरोग्य मंत्री प्रा. डॉ. तानाजीराव सावंत (Dr. Tanajirao Sawant) यांच्या उस्मानाबाद जिल्ह्यातील हा प्रकार असून, यामुळे आरोग्य यंत्रणा कशी पुरती कोलमडली आहे हे दिसून येते. उस्मानाबाद स्त्री रुग्णालया (Womens Hospital)त दाखल झालेल्या एका महिलेची प्रसुती (Delivery) बाथरूममध्ये झाल्याने एकच खळबळ उडाली आहे. जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणावर कोणाचे नियंत्रण नाही, आरोग्य यंत्रणेला सुधारण्यासाठी डॉ. सावंत हे प्रशासनाला कोणते इंजेक्शन देणार हे पाहावे लागेल. उपजिल्हा रुग्णालय असो की ग्रामीण रुग्णालय की उपकेंद्र, या सर्व ठिकाणावरून अनेक वेळा रुग्णांना उस्मानाबाद येथे रेफर करण्यात येतं. हा प्रकार कमी झाल्यास जिल्ह्याच्या ठिकाणी असलेल्या रुग्णालय व यंत्रणेवरील कामाचा ताण काही प्रमाणात कमी होऊ शकतो.

बेड उपलब्ध नसल्याने वॉर्डात वाट पहायला लावले

नारीवाडी गावची रुक्मिणी सुतार या डिलिव्हरीसाठी जिल्हा स्त्री रुग्णालयात दाखल झाल्या. परंतु त्यांना आवश्यक ती सेवा मिळाली नाही. दवाखान्यात महिलांची झालेली फुल गर्दी त्यामुळे त्यांना बेड उपलब्ध होऊ शकणार नाही असे सांगितले आणि वॉर्डात वाट पाहायला लावले. त्यानंतर वॉर्डात चकरा मारणाऱ्या रुक्मिणीला कळा चालू झाल्याने ती बाथरूममध्ये गेली असता बाथरूममध्येच बाळ जन्माला आले. त्यानंतर किमान एक तास डॉक्टर रुग्णालयात आलेच नाहीत. मुलगा झाल्याचा आनंद असतानाच अशा पद्धतीने बाथरूममध्ये डिलिव्हरी झाल्याने रुक्मिणी यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.

क्षमतेपेक्षा अधिक रुग्ण येत असल्याने विविध अडचणी येतात

उस्मानाबाद स्त्री रुग्णालय हे 60 बेडचे मंजूर असून तिथे रोज किमान 125 ते 150 रुग्ण उस्मानाबाद जिल्ह्यासह शेजारी इतर जिल्ह्यातून दाखल होतात. त्यामुळे इथे नेहमी गर्दी असते. रुग्णांना वैद्यकीय सुविधा व बेड न मिळणे हे इथे नित्यनियमाचे झाले आहे. त्यामुळे कमी जास्त प्रमाणात रोज रुग्णांना विविध अडचणींना सामोरे जावे लागते. स्त्री रुग्णालयात बेड कमी आहेत, शिवाय इथे डॉक्टर व इतर स्टाफ कमी असल्याने आवश्यक त्या सुविधा देता येत नसल्याची कबुली डॉक्टर देतात. त्यामुळे रिक्त पदे तात्काळ भरणे गरजेचे आहे. तसेच स्त्री रुग्णालय हे वैद्यकीय कॉलेज किंवा जिल्हा रुग्णालयच्या इमारतील हलवणे गरजेचे आहे. जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणाबाबत अनेक तक्रारी आहेत, त्यात सुधारणा होणे गरजेचे आहे. सावंत यांची कार्यपद्धती वेगळी आहे, ते आरोग्य मंत्री झाल्याने त्यांच्याकडून अनेक अपेक्षा आहेत. (A woman gives birth her baby in a bathroom at a womens hospital in Osmanabad)

हे सुद्धा वाचा

Non Stop LIVE Update
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत.
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?.
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?.
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?.
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा.
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात.
शिंदेंची पत्रकार परिषद, लोकसभा उमेदवारांची घोषणा? संभाव्य यादीत कोण?
शिंदेंची पत्रकार परिषद, लोकसभा उमेदवारांची घोषणा? संभाव्य यादीत कोण?.
महायुतीत छत्रपती संभाजीनगर जागेवरून पेच कायम, शिवसेना-भाजपात रस्सीखेच
महायुतीत छत्रपती संभाजीनगर जागेवरून पेच कायम, शिवसेना-भाजपात रस्सीखेच.
दिलीप वळसे पाटलांना गंभीर दुखापत, उपचार सुरु, काय घडलं? कशीये प्रकृती?
दिलीप वळसे पाटलांना गंभीर दुखापत, उपचार सुरु, काय घडलं? कशीये प्रकृती?.
डॉक्टर, नर्सेस यांची इलेक्शन ड्युटी रद्द ; निवडणूक अधिकाऱ्यांची माहिती
डॉक्टर, नर्सेस यांची इलेक्शन ड्युटी रद्द ; निवडणूक अधिकाऱ्यांची माहिती.