सोशल मीडियावर रील्स बनवण्याचा नाद जीवावर बेतला, अपघातात एक ठार, तीन विद्यार्थी गंभीर जखमी

परभणीच्या पाथरी सोनपेठ राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 548 वर एक विचित्र अपघात झाला. यामध्ये ध्वजारोहणासाठी शाळेत चाललेल्या विद्यार्थ्यांच्या दुचाकीला समोरुन येणाऱ्या वाहनाने धडक दिली. अपघातात एकाचा मृत्यू झाला, तर तीन गंभीर जखमी झाले.

सोशल मीडियावर रील्स बनवण्याचा नाद जीवावर बेतला, अपघातात एक ठार, तीन विद्यार्थी गंभीर जखमी
रील्स बनवण्याचा नाद जीवावर बेतला
Follow us
| Updated on: Jan 26, 2023 | 6:20 PM

परभणी : सोशल मीडियावर रील्स बनवणे शाळकरी मुलांच्या जीवावर बेतले आहे. चालत्या दुचाकीवर व्हिडिओ करण्याच्या प्रयत्नात झालेल्या अपघातात एका विद्यार्थ्याचा मृत्यू झाला तर तीन विद्यार्थी गंभीर जखमी झाले आहेत. दुचाकीवरील चारही मुलं नववी इयत्तेत शिकत आहेत. पाथरी-सोनपेठ राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 548 वर हा अपघात घडला. शंतनु सोनवणे असे अपघातात मृत्यू झालेल्या मुलाचे नाव आहे. तर स्वप्निल चव्हाण, योगानंद घुगे, राहुल महादू अशी जखमी मुलांची नावे आहेत. या अपघाताचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

चालत्या दुचाकीवर रील्स बनवत होते

अपघात एवढा भीषण होता की यामध्ये एका विद्यार्थ्यांचा हात धडा वेगळा झाला आहे. चालत्या दुचाकीवर एका हातात मोबाईल घेऊन हे चौघे रील्स बनवत होते.

लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वानाच सोशल मीडियाने पछाडले आहे. सोशल मीडियावर रील्स बनवण्याची भयानक क्रेझ सध्या सर्वांमध्ये आहे. मात्र हीच क्रेज चार विद्यार्थ्यांच्या जीवावर बेतल्याचे उघडकीस आले आहे.

हे सुद्धा वाचा

अपघातात एकाचा मृत्यू, तीन गंभीर जखमी

परभणीच्या पाथरी सोनपेठ राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 548 वर एक विचित्र अपघात झाला. यामध्ये ध्वजारोहणासाठी शाळेत चाललेल्या विद्यार्थ्यांच्या दुचाकीला समोरुन येणाऱ्या वाहनाने धडक दिली. अपघातात एकाचा मृत्यू झाला, तर तीन गंभीर जखमी झाले.

शाळेत ध्वजारोहनासाठी चालले होते चौघे

पाथरी तालुक्यातील डाकू पिंपरी येथील चार विद्यार्थी कानसूर येथील असणाऱ्या श्री चक्रधर स्वामी विद्यालय येथे गुरुवार 26 जानेवारी रोजी सकाळी प्रजासत्ताक दिनानिमित्त ध्वजारोहणासाठी दुचाकीवरून जात होते.

सकाळी साडेसातच्या सुमारास महाविद्यालयापासून एक किमी अंतरावर राष्ट्रीय महामार्गावर समोरून येणाऱ्या वाहनाची धडक बसून त्यांच्या दुचाकीला अपघात झाला. दुचाकीवर रील्स बनवत असताना हा अपघात घडला.

स्थानिक लोकांनी विद्यार्थ्यांना उपचारासाठी आंबेजोगाई येथे नेले. दोन विद्यार्थ्यांची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी लातूर येथे पाठवण्यात आले आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक गणेश राहिरे यांच्यासह पाथरी पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले.

Non Stop LIVE Update
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती.
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया.
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?.
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?.
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा.
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान.