नागपुरात हत्येचं सत्र थांबता थांबेना; आता पुतण्याने का केली काकाची हत्या?

जुन्या घरगुती वादातून ही हत्या झाल्याची माहिती समोर आलीय.

  • सुनील ढगे, टीव्ही 9 मराठी, नागपूर
  • Published On - 16:34 PM, 22 Jan 2021
नागपुरात हत्येचं सत्र थांबता थांबेना; आता पुतण्याने का केली काकाची हत्या?

नागपूरः गेल्या काही दिवसांपासून नागपुरात हत्या सत्र थांबण्याचं नाव घेत नाहीये, नागपुरातील एका पुतण्याने काकाची हत्या केल्यानं एकच खळबळ उडालीय. नागपुरातील पाचपावली पोलीस स्टेशन हद्दीत पुतण्यानेच काकाची हत्या केली असून, आरोही पुतण्याला पोलिसांनी अटक केलीय. जुन्या घरगुती वादातून ही हत्या झाल्याची माहिती समोर आलीय. (After His Nephew Killed His Uncle In Nagpur)

नागपुरात काल रात्री पाचपावली पोलीस स्टेशन हद्दीत पंचशील कॉलनीमध्ये काका पुतण्यामध्ये जुन्या घरगुती वादातून जोरदार भांडण झाले. त्या भांडणानं आजूबाजूच्या परिसरातील लोक जमा झाले होते. या जोरदार भांडणाचं पर्यवसान हाणामारीत झाले. त्यानंतर पुतण्याने काकावर लाकडाच्या काठीने जोरदार वार केले, त्यात काका अशोक मेश्रामचा जागीच मृत्यू झाला.

दोन-तीन वर्षांपूर्वीचा वाद पुन्हा आला उफाळून

जवळपास दोन-तीन वर्षांपूर्वी आरोपीचे वडील आणि काका यांच्यात वाद झाला होता, तो वाद आता पुन्हा एकदा उफाळून आला आणि त्यातून ही हत्या झाल्याची माहिती पोलिसांनी दिलीय. पोलिसांनी आरोपी पुतण्याला अटक केली आणि पुढील तपास सुरू केलाय.

हत्येमुळे परिसरात चांगलीच खळबळ

विशेष म्हणजे हा वाद घरगुती होता, मात्र त्याच रूपांतर हत्येत झालं. त्यामुळे परिसरात चांगलीच खळबळ माजली. मात्र यात कारण पाहिल्यास ते शुल्लक आहे. नागपुरात हत्यांचं सत्र थांबणार तरी कधी असाच प्रश्न आता उपस्थित केला जातोय.

नागपुरात पाच जणांकडून गळा चिरुन तरुणाची हत्या

नागपूर जिल्ह्यातील खापरखेडा पोलीस स्टेशन हद्दीत एक धक्कादायक घटना घडली होती (Nagpur Youth Murder By Five). गळा चिरून एका 30 वर्षीय तरुणाची निर्घृण हत्या करण्यात आल्याची घटना समोर आली होती. बाजार परिसरातील राजबाबा बिअर बारसमोर ही हत्येची घटना घडली होती. प्रशांत घोडेस्वर असं हत्या झालेल्या तरुणाचं नाव आहे. रात्री उशिरा ही हत्या झाल्याची माहिती होती.

संबंधित बातम्या

नागपुरात पाच जणांकडून गळा चिरुन तरुणाची हत्या, थरार सीसीटीव्हीत कैद

नागपूर शहर ड्रग्ज तस्करीचा नवा अड्डा?, नागपुरात पुन्हा ड्रग्ज तस्करीचा पर्दाफाश

After His Nephew Killed His Uncle In Nagpur