Ahmednagar : ओढ्याच्या पाण्यात वाहून गेल्यानं 8 वर्षांच्या मुलीचा मृत्यू, पार्थडी तालुक्यातील घटनेनं हळहळ

Pathardi girl downed : भोसले नावाचं हे कुटुंबीय करोडी गावाच्या शिवारातील डोंगर परिसरात वास्तव्यास होतं. या कुटुंबीयांच्या घराशेराजी एक ओढा आहे. हा ओढा पावसाच्या पाण्यात प्रवाही होता. सोमवारी संध्याकाळी आलेल्या मुसळधार पावसाने भोसले कुटुंबीयांच्या घराशेजारी अशलेला हा ओढा अचानक प्रवाही झाला होता.

Ahmednagar : ओढ्याच्या पाण्यात वाहून गेल्यानं 8 वर्षांच्या मुलीचा मृत्यू, पार्थडी तालुक्यातील घटनेनं हळहळ
8 वर्षांच्या मुलीचा मृत्यूImage Credit source: TV9 Marathi
Follow us
| Updated on: Sep 07, 2022 | 6:53 AM

अहमदनगर : अहमदनगरमध्ये (Ahmednagar Drown) एका 8 वर्षांच्या मुलीचा ओढ्यामध्ये वाहून गेल्यानं मृत्यू (Accident Death) झाला. या दुर्दैवी घटनेप्रकरणी संपूर्ण जिल्ह्यात हळहळ व्यक्त केली जातेय. या मुलीचे आईवडील कामानिमित्त घराबाहेर गेले होते. त्यावेळी ही हृदयद्रावक घटना घडली. आठ वर्षांची मुलगी ओढ्यात वाहून गेल्यानं कळल्यानंतर तिच्या आईवडिलांनाही मोठा धक्का बसला होता. या मुलीच्या मृत्यूबाबत (Daughter died) कळल्यानंतर तिच्या आईवडिलांनी केलेला आक्रोशही काळीज पिळवटून टाकणारा होता.

नेमकी कुठे घडली घटना?

अहमनगर जिल्ह्यातीमधील पाथर्डी तालुक्यामधील करोडी गावात ही घटना घडली. करोडी गावामध्ये एक आदिवासी कुटुंब राहत होतं. भोसले नावाचं हे कुटुंबीय करोडी गावाच्या शिवारातील डोंगर परिसरात वास्तव्यास होतं. या कुटुंबीयांच्या घराशेराजी एक ओढा आहे. हा ओढा पावसाच्या पाण्यात प्रवाही होता. सोमवारी संध्याकाळी आलेल्या मुसळधार पावसाने भोसले कुटुंबीयांच्या घराशेजारी अशलेला हा ओढा अचानक प्रवाही झाला होता.

घरात कुणीच नसताना…

सोमवारी संध्याकाळी साडे पाच वाजण्याच्या सुमारास पाथर्डी तालुक्यातील गावात जोराचा पाऊस झाला होता. या पावसात भोसले कुटुंबीयांच्या शेजारी असलेला ओढा तुडुंब वाहू लागला. घराजवळ मयुरी रावण भोसले ही मुलगी ओढ्याजवळच होता. त्यावेळी ओढा प्रवाही झाल्याने ती अचानक ओढ्याच्या प्रचंड प्रवाहात वाहून गेली. ही घटना घडली तेव्हा मयुरीचे वडील कामाला गेले होते. तर आई शेळ्या चरण्यासाठी गेली होती. मयुरी आणि तिची एक बहीण घरी एकटेच होते.

आईवडील घरी आल्यानंतर मयुरी भोसले हीच्या बहिणी सर्व हकिकत सांगितली. त्यानंतर आईवडिलांना मोठा धक्काच बसला. 8 वर्षांची पोटची मुलगी गमावल्यानं भोसले कुटुंबीयांना मोठा हादरा बसलाय. कोरडे गावात ही घटना वाऱ्यासारखी पसरली. त्यानंतर गावातही शोकाकूल वातावरण असून मयुरीच्या मृत्यूबाबत हळहळ व्यक्त केली जातेय. मयुरीच्या मृत्यूप्रकरणाची नोंद पोलिसांनी केली असून पुढील तपास केला जातोय.

Non Stop LIVE Update
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.