सीरियल किलर रामन राघवच्या मुसक्या आवळणाऱ्या पोलीस अधिकाऱ्याचे मुंबईत निधन

सीरियल किलर रामन राघव याच्या मुसक्या आवळत त्याला अटक करणारे मुंबई पोलीस दलातील सेवानिवृत्त अधिकारी अ‌ॅलेक्स फियालोह यांचे शनिवारी मुंबईत निधन झाले. (Alex Fialho is pass away who arrested serial killer Raman Raghav in Mumbai)

सीरियल किलर रामन राघवच्या मुसक्या आवळणाऱ्या पोलीस अधिकाऱ्याचे मुंबईत निधन
Follow us
| Updated on: Nov 15, 2020 | 12:53 PM

मुंबई: सीरियल किलर रामन राघव याच्या मुसक्या आवळत त्याला अटक करणारे मुंबई पोलीस दलातील सेवानिवृत्त अधिकारी अ‌ॅलेक्स फियालोह यांचे शनिवारी मुंबईत निधन झाले. त्यांचे वय 92 वर्ष होते. 1970 च्या दशकात मुंबईला हादरवून सोडणाऱ्या रामन राघव या सीरियल किलरच्या मुसक्या आवळण्याचा पराक्रम केला होता. (Alex Fialho is pass away who arrested serial killer Raman Raghav in Mumbai)

अ‌ॅलेक्स फियालोह यांना रामन राघवला अटक केल्याबद्दल राष्ट्रपती पदक मिळाले होते. ते मुंबई पोलीस दलातून सहायक पोलीस आयुक्तपदावरुन सेवानिवृत्त झाले होते. फियालोह नामवंत हॉकी खेळाडू होते ते मुंबई पोलिसांच्या संघाकडून खेळत होते. फियालोह यांनी 1962 मध्ये पोलीस दलातील नोकरी स्वीकारली होती.

मुंबईत 1970 च्या दशकात रामन राघवची दहशत होती. सलगपणे होणाऱ्या हत्यांमुळं 1968 मध्ये मुंबई हादरली होती. खूनसत्रामुळं मुंबईतील सर्वसामान्य नागरिक खूप घाबरलेले असायचे. बाहेर पडताना लोक स्वत: सोबत संरक्षणासाठी काठ्या घेऊन निघायचे. तत्कालीन पोलीस आयुक्त इम्यॅन्युअल मोडक यांना खूनसत्राचा तातडीनं छडा लावायचा होता. यासाठी पोलीस निरीक्षक विनायकराव वाकाटकर यांच्या नेतृत्वात एक पथक स्थापन कऱण्यात आले होते.अ‌ॅलेक्स फियालोह हे देखील त्या पथकामध्ये काम करत होते. (Alex Fialho is pass away who arrested serial killer Raman Raghav in Mumbai)

अ‌ॅलेक्स फियालोह हे त्यावेळी त्यांच्यासोबत नेहमी रामन राघवचा फोटो सोबत ठेवत होते. रामन राघव सोबत त्यावेळी भिजलेली छत्री होती. मुंबईत पाऊस नसतानाही भिजलेली छत्री पाहून अ‌ॅलेक्स फियालोह यांना संशय आला. यानंतर त्यानी रामन राघवला अटक केली.

अ‌ॅलेक्स फियालोह यांनी रामन राघवला 1968 मध्ये डोंगरीमध्ये अटक केली होती. त्यावेळी रामन राघवनं 40 लोकांचे खून केले होते. यानंतर न्यायालयानं रामन राघवला आजन्म कारावासाची शिक्षा सुनावली होती. 1995 मध्ये रमन राघवचा रुग्णालयात मृत्यू झाला होता.

दिग्दर्शक अनुराग कश्यप यांनी चार वर्षांपूर्वी रामन रामन राघवच्या जीवनावर एक चित्रपट बनवला होता. यामध्ये नवाजुद्दीन सिद्दीकी महत्वाच्या भूमिकेत होता.

संबंधित बातम्या:

शिक्षणाच्या जिद्दीसमोर सगळं काही दुय्यम, आई लग्न लावून देतेय म्हणून तिघींनीही सोडलं घर

कामगारानेच केली मालकाची हत्या; अवघ्या पाच तासांत पोलिसांनी ठोकल्या बेड्या

(Alex Fialho is pass away who arrested serial killer Raman Raghav in Mumbai)

Non Stop LIVE Update
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत.
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास.
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत.
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?.
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?.
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?.
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा.
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात.
शिंदेंची पत्रकार परिषद, लोकसभा उमेदवारांची घोषणा? संभाव्य यादीत कोण?
शिंदेंची पत्रकार परिषद, लोकसभा उमेदवारांची घोषणा? संभाव्य यादीत कोण?.
महायुतीत छत्रपती संभाजीनगर जागेवरून पेच कायम, शिवसेना-भाजपात रस्सीखेच
महायुतीत छत्रपती संभाजीनगर जागेवरून पेच कायम, शिवसेना-भाजपात रस्सीखेच.