कोरोना उपचारानंतर घरी जाणाऱ्या मायलेकीवर वाईट नजर, आईवर गँगरेप, मुलगी कशीबशी वाचली

कोरोना उपचारानंतर घरी जाणाऱ्या मायलेकीवर वाईट नजर, आईवर गँगरेप, मुलगी कशीबशी वाचली
आधी सामूहिक बलात्कार, मग पीडितेला दोन लाखांना विकले

मायलेकी चालत जात असताना संध्याकाळी सात वाजण्याच्या सुमारास दोघा युवकांची नजर दोघींवर पडली. आरोपींनी त्यांचा पाठलाग सुरु केला (Assam Married Woman Gang Rape )

अनिश बेंद्रे

|

May 31, 2021 | 11:52 AM

गुवाहाटी : कोरोनावरील उपचारानंतर रुग्णालयातून घरी जाणारी महिला लैंगिक अत्याचाराला बळी पडल्याची संतापजनक घटना समोर आली आहे. दोघा युवकांनी विवाहितेवर सामूहिक बलात्कार केला, तर तिची मुलगी आरोपींच्या तावडीतून कशीबशी वाचली. आसाम जिल्ह्यातील घटनेमुळे देशभरात खळबळ उडाली आहे. (Assam Charaideo Married Woman Gang Rape while returning from Hospital recovering Corona)

पीडितेसह पती आणि मुलगीही रुग्णालयात

आसामच्या चराईदेव जिल्ह्यात पीडिता कुटुंबासह राहते. ती बोरहाट नागामती भागात चहाच्या मळ्यात काम करणाऱ्या श्रमिक कुटुंबातील आहे. काही दिवसांपूर्वी पीडित महिला, तिचा पती आणि मुलगी यांना कोरोनाचा संसर्ग झाल्याचं समजलं. सुरुवातीला तिघंही होम आयसोलेशनमध्ये होते. मात्र प्रकृती खालावल्यामुळे तिघांनाही सपेखाती मॉडल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते.

कोरोना चाचणी निगेटिव्ह आल्यानंतर महिलेच्या पतीला 27 मे रोजी रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. तर पीडिता आणि तिच्या मुलीला शनिवार 29 मे रोजी रुग्णालयातून सोडण्यात आले.

रुग्णालयाकडून मदतीस नकार

आसाममध्ये संचारबंदी असल्यामुळे मायलेकीला घरी जाण्यासाठी कोणतेही वाहन उपलब्ध नव्हते. त्यामुळे महिलेने रुग्णालयातील अधिकाऱ्यांकडे मदत मागितली. घर हॉस्पिटलपासून 25 किमी दूर असल्यामुळे आपल्यासाठी वाहनाची व्यवस्था करण्याची विनंती तिने केली. मात्र रुग्णालय कर्मचाऱ्यांनी तिची विनंती अमान्य केल्यामुळे तिला लेकीसह पायी जाण्यावाचून गत्यंतर नव्हते.

पायी जाताना मायलेकीचा पाठलाग

धुदरई भागातून मायलेकी चालत जात असताना संध्याकाळी सात वाजण्याच्या सुमारास दोघा युवकांची नजर दोघींवर पडली. आरोपींनी त्यांचा पाठलाग सुरु केला. त्यानंतर युवकांनी महिलेवर सामूहिक बलात्कार केला. मुलगी दोघांच्या तावडीतून सुटण्यात यशस्वी झाली. तिने स्थानिक रहिवासी आणि पोलीस स्टेशन गाठून या घटनेची माहिती दिली.

आरोपींची शोध मोहीम सुरु

स्थानिक आणि पोलिसांनी पीडितेला गंभीर अवस्थेत रुग्णालयात दाखल केले. चराईदेव जिल्हा पोलिसांनी आरोपींची शोध मोहीम सुरु केली आहे. पीडितेच्या कुटुंबीयांची भेट घेतल्यानंतर स्थानिक आमदार धर्मेश्वर कोंवर यांनी या प्रकारासाठी सपेखाती मॉडल रुग्णालयाला जबाबदार ठरवले आहे. आरोपींचा शोध घेण्याचं आव्हान पोलिसांसमोर आहे.

संबंधित बातम्या :

वृद्ध महिलेची हत्या करुन अतिप्रसंग, पुण्यात घृणास्पद प्रकार, आरोपी चार तासात जेरबंद

तरुणीवर सामूहिक बलात्कार करुन चित्रीकरण, व्हायरल व्हिडीओवरुन महिलेसह पाच जणांना बेड्या

(Assam Charaideo Married Woman Gang Rape while returning from Hospital recovering Corona)

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें