पत्नी नांदायला येत नव्हती, संतापलेल्या पतीने विष पाजून केला हत्येचा प्रयत्न

अंजली पांडे हिचे काही कारणावरुन पतीशी वाद असल्याने ती पतीचे घर सोडून माहेरी राहत होती. पती वारंवार घरी येण्यास सांगत होता. मात्र ती पतीच्या घरी नांदायला जायला तयार नव्हती.

पत्नी नांदायला येत नव्हती, संतापलेल्या पतीने विष पाजून केला हत्येचा प्रयत्न
पतीकडून पत्नीला जीवे मारण्याचा प्रयत्नImage Credit source: TV9 Marathi
Follow us
| Updated on: Dec 03, 2022 | 7:23 PM

डोंबिवली : पत्नी नांदायला यायला तयार नव्हती म्हणून संतापलेल्या पतीने ज्यूसमधून पत्नीला विषारी औषध पाजून जीवे मारण्याचा प्रयत्न केला. डोंबिवली पश्चिमेला ही धक्कादायक घटना घडली आहे. पत्नीचा आरडाओरडा ऐकून ऑफिसमधील लोक बाहेर आले आणि त्यांनी आरोपीला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले. विष्णुनगर पोलीस ठाण्यात आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कृष्णकांत पांडे असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.

पत्नी नांदायला जायला तयार नव्हती

अंजली पांडे हिचे काही कारणावरुन पतीशी वाद असल्याने ती पतीचे घर सोडून माहेरी राहत होती. पती वारंवार घरी येण्यास सांगत होता. मात्र ती पतीच्या घरी नांदायला जायला तयार नव्हती.

पतीने पत्नीशी भांडण करत विषारी औषध घालून ज्यूस पाजला

यात रागातून कृष्णकांत पत्नी काम करत असलेल्या डोंबिवली पश्चिमेकडील दीनदयाळ रोड परिसरातील कार्यालयात गेला. तेथे जाऊन त्याने पत्नीला ऑफिसबाहेर बोलावून घेतले. कृष्णकांतने पत्नीला नांदायला का येत नाही विचारत तिच्याशी भांडण करायला सुरवात केली.

हे सुद्धा वाचा

भांडणानंतर त्याने तुला मारुन टाकतो म्हणत आपल्या जवळील पिशवीतून विषारी औषध मिश्रित ज्यूस काढला आणि तो बळजबरीने अंजलीला प्यायला भाग पाडले.

पत्नीच्या सहकाऱ्यांनी आरोपी पतीला पकडून पोलिसात दिले

पत्नीला ज्यूस पाजल्यानंतर कृष्णकांत तेथून पळून गेला. मात्र पत्नीचा आरडाओरडा ऐकून ऑफिसमधील लोक बाहेर आले. सर्व सहकाऱ्यांनी कृष्णकांतचा पाठलाग करत त्याला पकडले आणि विष्णुनगर पोलिसांच्या ताब्यात दिले.

विष्णुनगर पोलिसांनी कृष्णकांत विरोधात गुन्हा दाखल करत त्याला अटक केली आहे. विषारी औषध पोटात गेल्याने अंजलीला उपचारासाठी कळवा रुग्णालयात दाखल केले आहे.

Non Stop LIVE Update
मशाल आहे की आईस्क्रीमचा..., भाजपच्या बड्या नेत्याची ठाकरे गटाला टोला
मशाल आहे की आईस्क्रीमचा..., भाजपच्या बड्या नेत्याची ठाकरे गटाला टोला.
सासूचे 4 दिवस संपले, आता सूनेचे दिवस...,दादांचा शरद पवारांना खोचक टोला
सासूचे 4 दिवस संपले, आता सूनेचे दिवस...,दादांचा शरद पवारांना खोचक टोला.
गद्दारी करणाऱ्यांना... ओमराजे निंबाळकरांची शिंदेंच्या खासदारावर टीका
गद्दारी करणाऱ्यांना... ओमराजे निंबाळकरांची शिंदेंच्या खासदारावर टीका.
खासदाराच्या प्रचारसभेत आमदाराला आली चक्कर, रुग्णालयात उपचार सुरु
खासदाराच्या प्रचारसभेत आमदाराला आली चक्कर, रुग्णालयात उपचार सुरु.
काँग्रेसचा जाहीरनामा मुस्लिमांना प्राधान्य देणारा? भाजपच्या टीकेवर....
काँग्रेसचा जाहीरनामा मुस्लिमांना प्राधान्य देणारा? भाजपच्या टीकेवर.....
राणेंच्या उमेदवारीवरून धाकधूक, नितेश राणेंचं वक्तव्य; एक दिवस थांबा...
राणेंच्या उमेदवारीवरून धाकधूक, नितेश राणेंचं वक्तव्य; एक दिवस थांबा....
नरेंद्र मोदी खोटारडे... त्यांच्या घोषणा भपंक, राऊतांचा मोदींवर घणाघात
नरेंद्र मोदी खोटारडे... त्यांच्या घोषणा भपंक, राऊतांचा मोदींवर घणाघात.
घड्याळ चिन्हाचं प्रकरण न्यायप्रविष्ट, दादांच्या जाहिरातीत काय म्हटलंय?
घड्याळ चिन्हाचं प्रकरण न्यायप्रविष्ट, दादांच्या जाहिरातीत काय म्हटलंय?.
उन्हाचा तडाखा वाढलाय, मुंबईसह 'या' शहरात उष्णतेची लाट, उन्हाची काहिली
उन्हाचा तडाखा वाढलाय, मुंबईसह 'या' शहरात उष्णतेची लाट, उन्हाची काहिली.
भाजपचे शेकडो कार्यकर्ते अन् पदाधिकारी देणार भाजपचा देणार राजीनामा
भाजपचे शेकडो कार्यकर्ते अन् पदाधिकारी देणार भाजपचा देणार राजीनामा.