Aurangabad Accident : सख्ख्या बहिणींसह एकूण तिघांवर भरधाव ट्रक काळ बनून आला! जागीच ठार

औरंगाबाद येथे घडलेल्या भीषण अपघातात तीन जणांचा जागीच मृत्यू! नेमका कसा घडला अपघात? वाचा सविस्तर

Aurangabad Accident : सख्ख्या बहिणींसह एकूण तिघांवर भरधाव ट्रक काळ बनून आला! जागीच ठार
भीषण अपघातImage Credit source: TV9 Marathi
Follow us
| Updated on: Nov 24, 2022 | 10:58 AM

औरंगाबाद : औरंगाबाद (Aurangabad Accident) येथील वाळूज एमआयडीसी (Valuj MIDC) येथे भीषण अपघात (Road Accident) झाला. या अपघातामध्ये तीन जणांचा जागच्या जागी जीव गेलाय. भरधाव ट्रकने तीन कामगारांना चिरडलं आणि हा अनर्थ घडला. या अपघातामुळे दोन सख्ख्या बहिणींचाही समावेश आहे. या अपघातानंतर रस्त्यावर एकच गोंधळ उडाला होता. या अपघातात मृत्यू झालेल्यांची नावं दीपक लोखंडे, अनिता लोखंडे आणि निकीता लोखंडे अशी आहेत. या दुर्दैवी घटनेमुळे हळहळ व्यक्त केली जातेय.

या अपघातानंतर वाळूज एमआयडीसी मार्गावरील वाहतूक काही काळ ठप्प झाली होती. सकाळी साडे आठ-नऊ वाजण्याच्या सुमारास ही दुर्दैवी घटना घडली. या अपघाताची नोंद पोलिसांनी घेतली असून पुढील कारवाई आता केली जातेय.

एमएच 04 एफजे 5288 क्रमांकाच्या ट्रकने एका दुचाकीला धडक दिली. या दुचाकीवरुन कामगार जात होता. यात एक पुरुष आणि अन्य दोन महिला होता. या तिघांनाही ट्रकने चिरडलं. हा अपघात इतका भीषण होता की तिघांवरही जागच्या जागीच काळानं घाला घातला.

या अपघातात मृ्त्यू झालेल्यांचे मृतदेह पोलिसांनी ताब्यात घेतले. अपघातानंतर या मार्गावरील बघ्यांची गर्दी जमली होती. सोबत ट्रकही रस्त्याच्या बाजूला अडवण्यात आला होता. त्यामुळे या मार्गावर प्रचंड कोंडी झाली होती.

औरंगाबादमध्ये कालही दुचाकींचा विचित्र अपघात झाला होता. दुचाक्यांच्या झालेल्या धडकेत दोन तरुण हवेत फेकले गेले होते. त्यानंतर ट्रॅक्टरखाली येऊन त्यांचा जागीच मृत्यू झाला होता.

अपघाताची ही घटना ताजी असताना औरंगाबाद मध्यरात्री देखील भरधाव कारचा थरारक अपघात सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला होता. त्यानंतर आता आज सकाळी झालेल्या भीषण अपघातात झालेल्या तिघांच्या मृत्यूने हळहळ व्यक्त केली जातेय.

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.