Aurangabad : सरपंचाच्या पतीची ग्रामपंचायतीच्या कार्यालयात अरेरावी, आदिवासींना शिविगाळ! संतापजनक व्हिडीओ समोर

ही संतापजनक घटना औरंगबादच्या गणोरी गावात घडली. या गावची सरपंच असलेल्या महिलच्या पतीने आदिवासी नागरिकांना शिविगाळ केली. ग्रामपंचायीत गेल्यानंतर पदाधिकाऱ्यांच्या खूर्चीवर बसून ही शिविगाळ करण्यात आल्यानं लोकांनी संताप व्यक्त केला.

Aurangabad : सरपंचाच्या पतीची ग्रामपंचायतीच्या कार्यालयात अरेरावी, आदिवासींना शिविगाळ! संतापजनक व्हिडीओ समोर
धक्कादायक प्रकारImage Credit source: TV9 Marathi
Follow us
| Updated on: Aug 30, 2022 | 1:23 PM

औरंगाबाद : गरिबी वाईट असं म्हणतात. गरिबीमुळे हक्काच्या अधिकारांसाठी झगडावं लागतं. संघर्ष करावा लागतो. महाराष्ट्रातील एका ग्रामपंचायत कार्यालयात हेच पाहायला मिळालंय. ही बाब औरंगाबादच्या (Aurangabad Viral video) एका गावातील आहे. औरंगाबादमधील गणोरी (Ganori village, Fulambri Taluka) गावातील एक व्हिडीओ सध्या समोर आली आहे. या व्हिडीओमध्ये राज्यभरातील आदिवासी समाजात संताप व्यक्त केला जातो आहे. एका सरपंचाच्या पतीने आदिवासी बांधवांना शिविगाळ केली आहे. अर्वाच्य भाषेत शिविगाळ करताना हा व्हिडीओ सोशल मीडियात (Social Media) व्हायरल झालाय. ग्रामपंचायत कार्यलायात पदाधिकाऱ्यांच्या खुर्चीत एक व्यक्ती बसला होता. हा व्यक्ती गावातील महिला सरपंचाचा पती असल्याचं सांगितलं जातंय. या व्यक्तीने आदिवासींना शिविगाळ केली. त्यांना उडवाउडवीची उत्तरंही दिली. अरेरावी करत असणाऱ्या या व्यक्तीला आदिवासी बांधवांपैकी एकाने जाब विचारण्यास सुरुवात केली. इतकंच नाही तर या घटनेचा व्हिडीओ रेकॉर्ड केला. ग्रामपंचायतीत हुकुमशाही चालवता का तुम्ही? तुम्ही सरपंच आहात का? असा प्रश्नही उपस्थित केलाय.

पाहा व्हिडीओ :

ही संतापजनक घटना औरंगबादच्या गणोरी गावात घडली. या गावची सरपंच असलेल्या महिलच्या पतीने आदिवासी नागरिकांना शिविगाळ केली. ग्रामपंचायीत गेल्यानंतर पदाधिकाऱ्यांच्या खूर्चीवर बसून ही शिविगाळ करण्यात आल्यानं लोकांनी संताप व्यक्त केला. घरांसाठी जागा मागायला गेलेल्या आदिवासींना ही शिविगाळ करण्यात आली. यावेळी आदिवासी बांधव खाली जमिनीवर बसले असल्याचं दिसून आलंय.

ग्रामपंचायत कारभारात सरपंच पती हस्तक्षेप करत असल्याचा आरोप आदिवासी बांधवांकडून करण्यात आला आहे. औरंगाबाद जिल्ह्यातील फुलंब्री तालुक्यात गणोरी गावामध्ये घडलेल्या या घटनेनं तीव्र संताप व्यक्त केला जातो आहे. संतोष तांदळे असं शिविगाळ करणाऱ्या सररपंच पतीचं नाव आहे. या घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर अजूनही पुरुषप्रधान संस्कृतीच जोपासली का जातेय, असा सवालही उपस्थित करण्यात आलाय. शिवाय आदिवासींना समान वागणूक का दिली जात नाही, यावरुनही तीव्र प्रतिक्रिया उमटण्यास सुरुवात झाली आहे.

Non Stop LIVE Update
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती.
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया.
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?.
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?.
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा.
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान.