Aurangabad | औरंगाबादेत आणखी दोन खून, पती-पत्नीचा मृतदेह पलंगाखाली लपवून ठेवला, नातेवाईकानेच केली हत्या?

सोमवारी सकाळी औरंगाबादला हादरवून टाकणारी आणखी एक घटना समोर आली. पुंडलिक नगरात पती-पत्नीचा खून झाल्याचं उघडकीस आलं आहे.

Aurangabad | औरंगाबादेत आणखी दोन खून, पती-पत्नीचा मृतदेह पलंगाखाली लपवून ठेवला, नातेवाईकानेच केली हत्या?
Image Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: May 23, 2022 | 11:43 AM

औरंगाबाद : शहरात एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. पुंडलिक नगर परिसरात पती आणि पत्नीची (Husband wife murder) हत्या झाल्याचे समोर आले आहे. ही हत्या (Aurangabad murder) नेमकी कधी झाली आहे, याचेही गूढ असून, दोघांचेही मृतदेह कुजलेल्या अवस्थेत दिसून येत आहे. शामसुंदर हिरालाल कलंत्री वय -55, व किरण शामसुंदर कलंत्री -45 वर्षे अशी मृताची नावे आहेत. मृतदेह घराबाहेर काढण्याची प्रक्रिया सुरु असून प्राथमिक अंदाजानुसार, नातेवाईकांनीच या दोघांची हत्या केल्याचा पोलिसांना (City poilice) संशय आहे. हा खून अत्यंत नियोजनपूर्वक केल्याचंही दिसून येत आहे. खूनानंतर दोघांचेही मृतदेह वेगवेगळ्या मजल्यावर ठेवले होते. पलंगाखाली हे मृतदेह ठेवल्यामुळे काही काळ फारसं कुणाला कळलं नाही. मात्र मृतदेह कुजल्यानंतर या प्रकरणाचा उलगडा झाला.

पुंडलिक नगर हादरलं..

गुन्हेगारी घटना वाढल्यामुळे नेहमीच प्रकाशझोतात असलेलं पुंडलिक नगर आज आणखी एका घटनेनं हादरलं. या परिसरातील गल्ली नंबर 4 मध्ये एका मंदिरासमोरील इमारतीत ही घटना घडली. शामसुंदर हिरालाल कलंत्री आणि किरण शामसुंदर कलंत्री या दोघांचा मृतदेह कुजलेल्या स्थितीत पोलिसांना आढळला आहे. हे दोन्ही मृतदेह पलंगाखाली लपवून ठेवण्यात आले होते. घटनास्थळी पोलीस दाखल झाले असून सदर प्रकरणाचा तपास करत आहेत.

हे सुद्धा वाचा

औरंगाबादेत हत्यासत्र सुरूच

औरंगाबादेत हत्यांची मालिकच सुरु असल्याचं चित्र आहे. शनिवारी दुपारी देवगिरी कॉलेजमधील एका विद्यार्थिनीची एकतर्फी प्रेमातून निर्घृण हत्या करण्यात आली. त्या आधी दोन दिवसांपूर्वी एकाने मैत्रिणीची हत्या करून स्वतः आत्महत्या केली होती. तसेज जिन्सी पोलीस ठाण्याच्या हद्दीत शुक्रवारी दोघांमध्ये किरकोळ कारणावरून शिवीगाळ आणि वाद झाले. यातून एकाने धारदार शस्त्राने दुसऱ्याला गंभीर जखमी केले. यात एकाचा मृत्यू झाला.

Non Stop LIVE Update
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.