सलून चालकाला पोलिसांचा स्पर्शही नाही, मारहाणीत मृत्यूच्या आरोपावर पोलीस उपायुक्तांचं स्पष्टीकरण

घटनेचं सीसीटीव्ही फूटेज तपासून पोलीस उपायुक्तांनी औरंगाबाद सलूनचालक कथित मारहाण प्रकरणी स्पष्टीकरण दिलंय (Aurangabad Salon businessman dies police clarifies)

सलून चालकाला पोलिसांचा स्पर्शही नाही, मारहाणीत मृत्यूच्या आरोपावर पोलीस उपायुक्तांचं स्पष्टीकरण
पोलिसांच्या मारहाणीत सलून चालकाचा मृत्यू प्रकरणातील सीसीटीव्ही फूटेज
Follow us
| Updated on: Apr 16, 2021 | 10:48 AM

औरंगाबाद : औरंगाबादमध्ये पोलिसांच्या मारहाणीत सलून चालकाचा मृत्यू झाल्याचा आरोप नातेवाईकांनी केला होता. मात्र या घटनेत पोलिसांचा काहीच दोष नसल्याचा दावा औरंगाबादचे पोलीस उपायुक्त दीपक गिर्हे यांनी केला आहे. घटनेचं सीसीटीव्ही फूटेज तपासून पोलीस उपायुक्तांनी हा निर्वाळा दिला. (Aurangabad Salon businessman allegedly dies after police beats Deputy Commissioner clarification)

सलून चालकाला पोलिसांनी स्पर्शही केला नाही, असंही दीपक गिर्हे यांच्याकडून स्पष्ट करण्यात आलं आहे. पोलिसांवर खोटे आरोप करुन बदनामी करणाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल करणार, असा इशाराही पोलिसांनी दिला आहे.

पोलिसांच्या मारहाणीत सलून व्यावसायिकाचा मृत्यू झाल्याचा आरोप करत औरंगाबादमधील उस्मानपुरा पोलीस ठाण्यासमोर मोठा जमाव जमला होता. मात्र परिसरातील सीसीटीव्ही फूटेजमध्ये सलून चालक पोलिसांशी बोलत असतानाच अचानक जमिनीवर कोसळल्याचं समोर आलं होतं. त्यामुळे पोलिसांनी त्याला मारहाण केली की नाही, असा संभ्रम निर्माण झाला होता.

नियम मोडून सलून उघडल्याचा दावा

राज्यात कोरोनाबाधितांची संख्या वाढत असल्याने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी संपूर्ण राज्यात 15 दिवसांसाठी संचारबंदीची घोषणा केली आहे. याशिवाय आधीच कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत. या निर्बंधांनुसार फक्त जीवनाश्यक वस्तूंची दुकानं उघडण्यास मुभा आहे. मात्र या नियमांच्या विरुद्ध जाऊन औरंगाबादेतील सलून व्यावसायिक फिरोज खान यांनी सलून उघडलं.

फिरोज खान यांना मारहाण केल्याचा आरोप

सलून उघडल्याची माहिती मिळाल्यानंतर दोन पोलीस कर्मचारी सलूनवर पोहोचले. पोलिसांनी खान यांना बेदम मारहाण केल्याचा दावा केला जात होता. या मारहाणीत सलून व्यावसायिक फिरोज खान यांचा मृत्यू झाल्याचा आरोप कुटुंबियांनी केला होता. परंतु समोर आलेल्या सीसीटीव्ही फूटेजमध्ये पोलीस बोलत असताना सलून चालक अचानक जमिनीवर कोसळल्याचं दिसत आहे. त्यांना परिसरातील नागरिकांनी रुग्णालयात हलवल्याचंही फूटेजमध्ये दिसत आहे. (Aurangabad Salon businessman allegedly dies after police beats Deputy Commissioner clarification)

संबंधित पोलिसांची तडकाफडकी बदली

या प्रकरणी औरंगाबाद पोलीस आयुक्त निखिल गुप्ता यांनी पोलीस निरीक्षक, पोलीस उपनिरीक्षकासह एका कर्मचाऱ्याची तडकाफडकी बदली केली होती.

पाहा व्हिडीओ :

संबंधित बातम्या 

CCTV VIDEO | औरंगाबादेत पोलिस मारहाणीत सलून चालकाचा मृत्यू झाल्याचा आरोप, सीसीटीव्हीमुळे ट्विस्ट

कडक निर्बंध असताना सलून उघडलं, पोलिसांनी इतकं मारलं की जीव गेला, औरंगाबादेतील धक्कादायक घटना

(Aurangabad Salon businessman allegedly dies after police beats Deputy Commissioner clarification)

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान.
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित.
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य.
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश.
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली.
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?.
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.