ऐन लग्नात नववधू बेपत्ता, औरंगाबादेत सासर-माहेरचा राडा, नऊ वऱ्हाडी जखमी

दोन्ही कुटुंब भिडल्यामुळे काही काळ तणावाचं वातावरण निर्माण झालं, मात्र पोलिसांच्या हस्तक्षेपामुळे अनर्थ टळला.

ऐन लग्नात नववधू बेपत्ता, औरंगाबादेत सासर-माहेरचा राडा, नऊ वऱ्हाडी जखमी
Follow us
| Updated on: Nov 03, 2020 | 11:05 AM

औरंगाबाद : लग्नघर आणि लग्नमंडपात लगीनघाईच्या वेळी असणारी गडबड, गोंधळ सर्वांनाच माहित असेल. मात्र औरंगाबादमधील एका लग्नात भलतीच गोष्ट पाहायला मिळाली. ऐन लग्नाच्या वेळी नववधू बेपत्ता झाल्याने मोठा गहजब झाला. त्यामुळे सासर आणि माहेरच्या कुटुंबात राडा होऊन नऊ वऱ्हाडी जखमी झाले. (Aurangabad Wedding Ruckus after Bride goes missing)

औरंगाबाद शहरातल्या शिवाजीनगर परिसरात ही घटना घडली. लग्नाच्या आधीच नववधू बेपत्ता झाल्यामुळे एकच खळबळ उडाली. वधू नेमकी कुठे गेली, ती गायब होण्यामागील कारण काय, याचा पत्ता तिच्या कुटुंबालाही नसल्याचं बोललं जातं. मात्र तिच्या अचानक बेपत्ता होण्यामुळे माहेर आणि सासरच्या मंडळींमध्ये तणाव निर्माण झाला.

सुरुवातीला माहेर आणि सासरच्या कुटुंबांमध्ये शाब्दिक चकमक उडाली. या वादावादीचे पर्यवसन हाणामारीत झाले. दोन्ही कुटुंब एकमेकांना भिडल्यामुळे काही काळ तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं. मात्र पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केल्यामुळे पुढील अनर्थ टळला.

माहेर आणि सासरच्या कुटुंबात उडालेल्या धुमश्चक्रीमध्ये एकूण 9 जण जखमी झाल्याची माहिती आहे. औरंगाबादमधील पुंडलिक नगर पोलीस स्टेशनच्या हद्दीत हा प्रकार घडला. पोलिसांकडून सात जणांना ताब्यात घेण्यात आलं आहे.

तेलंगणाती लग्नराड्याची आठवण

तेलंगणामध्येही गेल्या वर्षी भरलग्नातच वधू आणि वरपक्षामध्ये राडा झाल्याचं पाहायला मिळालं होतं. शाब्दिक वादानंतर पाहुणे मंडळींनी एकमेकांवर खुर्च्या फेकून मारल्या होत्या. त्यावेळी तिघे जण जखमी झाले होते.

तेलंगणच्या सूर्यपेट जिल्ह्यातील कोदाद मंडलमध्ये राहणाऱ्या तरुणाचा विवाह आंध्र प्रदेशच्या प्रकाशम जिल्ह्यातील तरुणीसोबत पार पडला. सुरुवातीला वधू आणि वर पक्षाची मंडळी खुशीत होती, मात्र गावात लग्नाची वरात काढण्यावरुन त्यांच्यामध्ये वादाची ठिणगी पडली. शाब्दिक वादाचे रुपांतर हाणामारीत झालं. दोन्ही बाजूच्या पाहुणे मंडळींनी एकमेकांवर खुर्च्या फेकून मारल्या,

संबंधित बातम्या :

ऐन लग्नातच वधू-वरपक्षात राडा, एकमेकांवर खुर्च्यांची फेकाफेक

(Aurangabad Wedding Ruckus after Bride goes missing)

Non Stop LIVE Update
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती.
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया.
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?.
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?.
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा.
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान.