जुन्या वादातून दोघा सख्ख्या भावांची हत्या, आरोपी चुलत भाऊ पसार, बीड हादरलं

दुहेरी हत्याकांडाची घटना उघडकीस आल्याने बीड जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे. (Beed Crime Brothers killed )

जुन्या वादातून दोघा सख्ख्या भावांची हत्या, आरोपी चुलत भाऊ पसार, बीड हादरलं
बीडमध्ये राम साळुंके आणि लक्ष्मण साळुंके या भावांची हत्या
Follow us
| Updated on: May 18, 2021 | 3:22 PM

बीड : जुन्या वादातून झालेल्या हाणामारीत दोघा सख्ख्या भावांना प्राण गमवावे लागले. चुलत भावानेच दोघा भावंडांची निर्घृण हत्या केल्याचा आरोप आहे. बीड जिल्ह्यातील नागापूर येथे ही घटना घडली. आरोपी चुलत भाऊ घटनास्थळावरुन पसार झाला असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत. पूर्ववैमनस्यातून आरोपीने दोघा भावंडांना संपवल्याचा प्राथमिक अंदाज आहे. (Beed Crime News Brothers killed by Cousin)

चुलतभावानेच दोघांना संपवलं

राम साळुंके आणि लक्ष्मण साळुंके या दोन सख्ख्या भावांची हत्या करण्यात आली. सोमवारी रात्री 10 वाजताच्या सुमारास ही घटना घडली. दोघांना मारहाण करुन चुलत भाऊ परमेश्वर साळुंके याने जीव घेतला. त्यानंतर मारेकरी घटनास्थळावरुन पसार झाला आहे. दुहेरी हत्याकांडाची घटना उघडकीस आल्याने बीड जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणी पिंपळनेर पोलीस अधिक तपास करत आहेत. आरोपी भावाला पकडण्याचे आव्हान पोलिसांसमोर आहे.

एकतर्फी प्रेमातून युवतीची हत्या

दरम्यान, यवतमाळ जिल्ह्यातील पुसद तालुक्यात राहणाऱ्या युवतीची हत्या झाल्याची घटना दोनच दिवसांपूर्वी उघडकीस आली होती. खंडाळा पोलीस स्टेशनच्या हद्दीत येत असलेल्या रामपूर नगर भागात सुवर्णा अर्जुन चव्हाण ही 21 वर्षीय युवती सहकुटुंब राहत होती. गावात राहणारा 25 वर्षीय आरोपी आकाश श्रीराम आडे याचे सुवर्णावर एकतर्फी प्रेम होते. सुवर्णाचे वडील, आई, भाऊ बाहेरगावी गेले होते. ही संधी साधून आरोपी आकाश तिच्या घरात शिरला.

सुवर्णावर चाकू-गुप्तीने वार

सुवर्णाच्या पोटात आकाशने चाकू आणि गुप्तीने वार केले. गंभीर जखमी झाल्यामुळे सुवर्णाच्या घरात रक्ताचा सडा पडला होता. हल्ल्यात सुवर्णाला प्राण गमवावे लागले. तिच्या हत्येची बातमी वाऱ्यासारखी गावात पसरली आणि गावात राहणाऱ्यांनी खंडाळा पोलीस स्टेशनला माहिती दिली. आरोपी आकाश आडे घटनास्थळावरुन पसार झाला होता. पोलिसांनी 5 पथके पाठवून त्याचा कसून शोध घेतला. अखेर त्याला धनसळ जंगलातून पोलिसांनी ताब्यात घेतले.

संबंधित बातम्या :

बहिणीची छेड काढणाऱ्याला बेदम चोपलं, आरोपीच्या निष्पाप भावावर अत्याचार

शारीरिक-मानसिक जाचाला कंटाळून सावत्र मुलीकडून लाकडी दांडक्याने बापाची हत्या

(Beed Crime News Brothers killed by Cousin)

Non Stop LIVE Update
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?.
निधीवरून धमकीचा मामला...अजित पवारांचं 'त्या' वक्तव्यावरून स्पष्टीकरण
निधीवरून धमकीचा मामला...अजित पवारांचं 'त्या' वक्तव्यावरून स्पष्टीकरण.
लटकवून लटकवून उमेदवारी मिळाली, राणेंना ठाकरे गटाच्या नेत्यानं डिवचलं
लटकवून लटकवून उमेदवारी मिळाली, राणेंना ठाकरे गटाच्या नेत्यानं डिवचलं.
बाई खुणावेल, डोळा मारेल पण... राऊतांचा नाव न घेता राणांवर निशाणा
बाई खुणावेल, डोळा मारेल पण... राऊतांचा नाव न घेता राणांवर निशाणा.
अजितदादांवर गुन्हा दाखल होणार? शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी, पण का?
अजितदादांवर गुन्हा दाखल होणार? शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी, पण का?.
'यमराज'नं भरला लोकसभेचा उमेदवारी अर्ज? रेड्यावर बसून घेतली एन्ट्री
'यमराज'नं भरला लोकसभेचा उमेदवारी अर्ज? रेड्यावर बसून घेतली एन्ट्री.
नाची, डान्सर आणि... नवनीत राणांवर बोलताना संजय राऊतांची जीभ घसरली
नाची, डान्सर आणि... नवनीत राणांवर बोलताना संजय राऊतांची जीभ घसरली.
सुनेत्रा पवारांनी उमेदावारीचा अर्ज दाखल करताच दादांनी भरला डमी अर्ज
सुनेत्रा पवारांनी उमेदावारीचा अर्ज दाखल करताच दादांनी भरला डमी अर्ज.
लोकसभेची निवडणूक म्हणजे अफझलखानाची... अमोल कोल्हे नेमकं काय म्हणाले?
लोकसभेची निवडणूक म्हणजे अफझलखानाची... अमोल कोल्हे नेमकं काय म्हणाले?.
ठरलं... रत्नागिरी-सिंधुदुर्गातून राणे लढणार, भाजपकडून 13 वी यादी जाहीर
ठरलं... रत्नागिरी-सिंधुदुर्गातून राणे लढणार, भाजपकडून 13 वी यादी जाहीर.