काय डोकं आहे ! आई अभ्यासावरून रागवली, शाळकरी मुलीने रचला अपहरण, लैंगिक अत्याचाराचा बनाव

मुंबईतील भांडूपमध्ये एक अतिशय भयानक आणि तेवढीच धक्कादायक घटना घडल्याचे उघडकीस आले. एका शाळकरी मुलीचे अपहरण करून तिच्यावर लैंगिक अत्याचार झाल्याची तक्रार पोलिसांसमोर आली होती.

काय डोकं आहे ! आई अभ्यासावरून रागवली, शाळकरी मुलीने रचला अपहरण, लैंगिक अत्याचाराचा बनाव
पिंपरी चिंचवडमध्ये लॉजमध्ये हत्याकांड
Follow us
| Updated on: Sep 30, 2024 | 9:13 AM

गेल्या काही काळात मुंबईसह राज्यात विविध ठिकाणी महिला, मुलींवरील अत्याचाराच्या घटना उघडकीस येत आहे. बदालपूरमधील शाळेतील दोन चिमुकल्या मुलींवर झालेल्या अत्याचाराने तर संपूर्ण राज्यात संतापाची लाट उसळली. त्या घटनेतील आरोपीचा एन्काऊंटरमध्ये मृत्यूही झाला. लैंगिक अत्याचाराच्या घटनांविरोधात आवाज उठवत नागरिक कडक कायद्यांची मागणी करत आहेत. हे सगळं सुरू असताना दुसरीकडे मुंबईतील भांडूपमध्ये एक अतिशय भयानक आणि तेवढीच धक्कादायक घटना घडल्याचे उघडकीस आले. एका शाळकरी मुलीचे अपहरण करून तिच्यावर लैंगिक अत्याचार झाल्याची तक्रार पोलिसांसमोर आली होती.

मात्र घटनाक्रम आणि पुरावे यात तफावत आढळल्याने पोलिसांना संशय आला, अखेर त्यांनी कसून तपास करताच हा सगळा बनाव असल्याचे समोर आले. आई अभ्यासावरून रागावली म्हणून त्या अल्पवयीन मुलीने स्वत:च्याच अपहरणाचा आणि लैंगिक अत्याचाराच बनाव रचल्याची धक्कादायक माहिती उघड झाली. यामुळे परिसरात खळबळ माजली असून पोलिसही अवाक् झाले.

शाळा सुटली तरी घरी आलीच नाही म्हणून….

मिळालेल्या माहिनीनुसार, ही अल्पवयीन मुलगी भांडूप येथे तिच्या आई-वडिलांसह राहते. शनिवारी सकाळी ती पावणेसातच्या सुमारास नेहमीप्रमाणे शाळेत जाण्यासाठी घराबाहेर पडली. दुपारी शाळा सुटून बराच वेळ झाला तरी ती घरी परत न आल्याने तिच्या कुटुंबियांना चिंता वाटू लागली, ते काळजीत पडले, सगळीकडे तिचा शोध घेऊन लागले. मात्र मुलगी काही सापडलीच नाही. अखेर संध्याकाळी 4-5 च्या सुमारासा ती मुलगी घरी आली, ते पाहून सर्वांचा जीव भांड्यात पडला.

स्वत:च्याच अपहरणाचा बनाव

घरी परतव्यावर कुटुंबियांनी तिच्यावर प्रश्नांचा भडिमार केला. इतका वेळ कुठे होतीस, घरी यायला आज इतका वेळ का लागला, नेमकं काय झालं असे प्रश्न विचारत घरच्यांनी तिला भंडावून सोडलं. तेव्हा तिने जे सांगितलं ते ऐकून घरचे सगळे हादरलेच. त्या मुलीने दिलेल्या माहितीनुसार, शाळेत जात असताना तीन जणांनी अचानक तिला गाठलं, तिच्या तोंडाला रुमाला बांधला आणि तिला ठाण्याच्या दिशेने नेलं. तेथे त्यांनी आपल्यावर लैंगिक अत्याचार करण्याचा प्रयत्न केला, अशी माहिती त्या मुलीने तिच्या आईला दिली. हे ऐकून घरच्यांना मोठा धक्का बसला.

त्यानंतर त्या अल्पवयीन मुलीच्या आईन तातडीने भांडूप पोलीस स्टेशन गाठलं आणि घडलेला प्रकार कथन केला. पोलिसांनी तत्काळ तक्रार नोंदवून घेत याप्रकरणाचा तपास सुरू केला. मात्र तिने सांगितलेला घटनाक्रम आणि पुरावे यात तफावत आढळली. पोलिसांनी त्या मुलीच्या शाळेच्या बाहेरच्या परिसरातील सीसीटीव्ही फुटजेही चेक केलं. तेव्हा ती मुलगी तेथे एकटीच चालत असल्याचं दिसून आलं. त्यावरून पोलिसांना संशय आला. अखेर पोलिसांनी त्या मुलीला विश्वासात घेऊन विचारपूस केली असता, तिने जे सांगितलं ते ऐकून सगळेच चक्रावले. आई अभ्यासावरून रागावली, म्हणून आपण हा अपहरणाचा आणि लैंगिक अत्याचाराचा बनाव रचल्याचे तिने पोलिसांसमोर कबूल केले.

'कारण टायगर अभी जिंदा है...',अमोल कोल्हेंची फटकेबाजी, बघा काय म्हणाले?
'कारण टायगर अभी जिंदा है...',अमोल कोल्हेंची फटकेबाजी, बघा काय म्हणाले?.
उद्धव ठाकरेंवर अ‍ॅन्जिओप्लास्टी शस्त्रक्रिया, डॉक्टरांचा सल्ला काय?
उद्धव ठाकरेंवर अ‍ॅन्जिओप्लास्टी शस्त्रक्रिया, डॉक्टरांचा सल्ला काय?.
भाजप आमदारासमोर महिलांना वाटलेल्या साड्या मराठा आंदोलकांनी पेटवल्या अन
भाजप आमदारासमोर महिलांना वाटलेल्या साड्या मराठा आंदोलकांनी पेटवल्या अन.
UP च्या बहरइचमध्ये देवी विसर्जनावेळी गोळीबार, संतप्त जमावाकडून जाळपोळ
UP च्या बहरइचमध्ये देवी विसर्जनावेळी गोळीबार, संतप्त जमावाकडून जाळपोळ.
सिद्दीकींच्या हत्येचा कट याच घरात शिजला; बघा एक्सक्ल्युझिव्ह व्हिडीओ
सिद्दीकींच्या हत्येचा कट याच घरात शिजला; बघा एक्सक्ल्युझिव्ह व्हिडीओ.
बाबा सिद्दीकींसह झिशान यांच्याही हत्येचा होता कट, आरोपींची मोठी कबुली
बाबा सिद्दीकींसह झिशान यांच्याही हत्येचा होता कट, आरोपींची मोठी कबुली.
राज ठाकरे राजकीय सस्तन प्राणी, जे साडेचार वर्षे..अंधारेंची बोचरी टीका
राज ठाकरे राजकीय सस्तन प्राणी, जे साडेचार वर्षे..अंधारेंची बोचरी टीका.
आचारसंहितेपूर्वी मंत्रिमंडळ बैठकीत निर्णयाचा धडाका, 19 निर्णय जारी
आचारसंहितेपूर्वी मंत्रिमंडळ बैठकीत निर्णयाचा धडाका, 19 निर्णय जारी.
सरकारकडून टोलमाफी अन् राज ठाकरे म्हणाले, 'ही आनंदाची बाब, पण फक्त...'
सरकारकडून टोलमाफी अन् राज ठाकरे म्हणाले, 'ही आनंदाची बाब, पण फक्त...'.
सरकारकडून टोलमाफी अन् मनसेचा एकच जल्लोष; अविनाश जाधव म्हणाले...
सरकारकडून टोलमाफी अन् मनसेचा एकच जल्लोष; अविनाश जाधव म्हणाले....