Bihar Murder | वर्षभरापूर्वी लग्न, विवाहितेने प्रियकराच्या मदतीने काढला पतीचा काटा

Bihar Murder | वर्षभरापूर्वी लग्न, विवाहितेने प्रियकराच्या मदतीने काढला पतीचा काटा
पतीची हत्या पत्नीला बेड्या
Image Credit source: टीव्ही 9

ही घटना बिहारमधील खगरियातील बेलदौर पोलीस स्टेशनच्या हद्दीतील चोधली गावातील असून मोहम्मद अमरूल असे मृत पतीचे नाव आहे. हत्येनंतर बेलदौर पोलीस ठाण्याचे पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी आरोपी महिलेला अटक केली.

अनिश बेंद्रे

|

May 11, 2022 | 7:34 AM

पाटणा : पत्नीने प्रियकरासह आपल्याच पतीची हत्या (Husband Murder) केल्याचं उघडकीस आलं आहे. बिहारमधील खगरियामध्ये ही धक्कादायक घटना घडल्याची (Bihar Crime News) माहिती आहे. महिलेने पतीचे हात पाय दोरीने बांधले, त्यानंतर त्याचा गळा आवळून खून केल्याचा आरोप आहे. या हत्याकांडात विवाहितेला तिच्या प्रियकरानेही मदत केल्याचं समोर आलं आहे. या प्रकरणी आरोपी पत्नीला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत, तर तिचा बॉयफ्रेण्ड पसार झाला आहे. जेमतेम वर्षभरापूर्वीच दोघांचा विवाह झाला होता. मात्र विवाहबाह्य संबंधातून (Extra Marital Affair) महिलेने पतीचा खून केल्याचा आरोप केला जात आहे.

काय आहे प्रकरण?

ही घटना बिहारमधील खगरियातील बेलदौर पोलीस स्टेशनच्या हद्दीतील चोधली गावातील असून मोहम्मद अमरूल असे मृत पतीचे नाव आहे. हत्येनंतर बेलदौर पोलीस ठाण्याचे पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी आरोपी महिलेला अटक केली. मात्र, यावेळी महिलेचा प्रियकर पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पळून जाण्यात यशस्वी झाला.

महिलेचे विवाहबाह्य संबंध

मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी महिला सहजादी खातूनचे गावातील अल्तमस नावाच्या तरुणाशी गेल्या अनेक महिन्यांपासून प्रेम संबंध होते. या नात्याला साहजिकच तिचा पती कडाडून विरोध करत होता. सहजादीला आधीच तिचा नवरा आवडत नव्हता, त्यामुळे प्रियकराला हाताशी धरुन तिने मार्गातून त्याचा काटा काढून टाकण्याची योजना आखली. महिलेने गळ्यात पंचा टाकून पतीचा जीव घेतला. या घटनेनंतर तरुणाच्या कुटुंबीयांची रडून रडून बिकट अवस्था झाली आहे.

महिलेला अटक, प्रियकर फरार

मयताच्या आईचे म्हणणे आहे की, लग्नाच्या सुरुवातीपासूनच महिलेने तिच्या मुलापासून अंतर राखले होते. सुनेला माझा मुलगा आवडला नव्हते. या घटनेबाबत एसएचओने सांगितले की, ही हत्या विवाहबाह्य प्रेम प्रकरणातून झाली आहे. पत्नीने प्रियकरासह ही घटना घडवून आणली. आरोपी महिला सध्या पोलिसांच्या ताब्यात आहे. तिचा प्रियकर फरार असून, त्याचा शोध सुरू आहे.

हे सुद्धा वाचा


Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें