Bihar Land Dispute | जमिनीच्या वादातून अ‍ॅसिड हल्ला, 20 जण जखमी, तिघे गंभीर

या घटनेत 20 जण जखमी झाले आहेत. यापैकी तिघांची प्रकृती गंभीर आहे. ही घटना दाऊदपूर ठाण्यांतर्गत येणाऱ्या जैतपूर तख्त गावात घडली

Bihar Land Dispute | जमिनीच्या वादातून अ‍ॅसिड हल्ला, 20 जण जखमी, तिघे गंभीर
Follow us
| Updated on: Nov 23, 2020 | 4:21 PM

पाटणा : बिहारच्या (Bihar) सारण जिल्ह्यात रविवारी जमिनीच्या वादातून (Bihar Land Dispute) अ‍ॅसिड हल्ला (Acid Attack) झाल्याची धक्कादायक घटना घडली. या घटनेत 20 जण जखमी झाले आहेत. यापैकी तिघांची प्रकृती गंभीर आहे. ही घटना दाऊदपूर ठाण्यांतर्गत येणाऱ्या जैतपूर तख्त गावात घडली (Bihar Land Dispute).

“या घटनेनंतर अनूप शाह, तुलसी शाह आणि मुन्ना शाह नावाच्या तिघांना अटक करण्यात आली आहे”, अशी माहिती दाऊदपूरचे एसएचओ सुजीत कुमार चौधरी यांनी दिली.

संजय शाह आणि रामचंद्र शाह यांच्यात जमिनीवरुन वाद होता. त्यावरुन रामचंद्र शाहच्या कुटुंबाने संजय शाहच्या कुटुंबियांवर हल्ला केला.

तिघे गंभीररित्या जखमी

“या हल्ल्यानंतर रामचंद्र शाहच्या कुटुंबियांनी आणि समर्थकांनी संजय शाह यांच्यासोबत वाद घातला. या दरम्यान रामचंद्र शाहच्या काही समर्थकांनी दुसऱ्या गटावर चार ते पाच अ‍ॅसिडच्या बाटल्या फेकल्या. यामध्ये 20 जण जखमी झाले”, अशी माहिती सुजीत कुमार चौधरी यांनी दिली. “तपासादरम्यान हल्लेखोरांनी दागिने बनवण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या अ‍ॅसिडचा वापर केल्याचं दिसून आलं”, असंही त्यांनी सांगितलं (Bihar Land Dispute).

सोनू गुप्ता, रवि कुमार, अजय कुमार, रोशन शाह, मोहित कुमार, बुलेटराम, भारत राम, पुष्पा देवी, सविता देवी आणि बबिता देवी हे या घटनेत जखमी झाले आहेत. पीडितांना दाऊदपूर, एकमा आणि छपराच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. तर तीन जण गंभीररित्या जखमी झाले आहेत. त्यांच्यावर पाटणाच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

Bihar Land Dispute

संबंधित बातम्या :

तिघांचा गळफास, चौथा फास कुणासाठी?, अफवा थांबवा, अन्यथा गुन्हे दाखल करु; पोलिसांचा इशारा

दिल्लीत प्रियकराची हत्या, मृतदेहाचे तुकडे करुन गुजरातमध्ये फेकले, आई, होणारा नवरा आणि प्रेयसी अटकेत

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.