Video: उमेश कोल्हे यांच्या हत्ये नंतर अमरावतीत आणखी दहा जणांचा जीव धोक्यात; भाजप खासदाराचा खळबळजनक आरोप

अमरावतीत नुपूर शर्मा यांच्या समर्थनार्थ पोस्ट व्हायरल केल्याचे उमेश कोल्हे यांची हत्या करण्यात आली होती. तर शहरातील 10 लोकांना नुपूर शर्मा बद्दल पोस्ट टाकल्याने जीवे मारण्याच्या धमक्या आल्या असा गंभीर आरोप भाजप नेते व खासदार अनिल बोंडे यांनी केला.

Video: उमेश कोल्हे यांच्या हत्ये नंतर अमरावतीत आणखी दहा जणांचा जीव धोक्यात; भाजप खासदाराचा खळबळजनक आरोप
Follow us
| Updated on: Jul 03, 2022 | 6:45 PM

अमरावती : अमरावती: अमरावतीच्या उमेश कोल्हे(Umesh Kolhe) हत्याप्रकरणानंतर राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. उमेश कोल्हे यांच्या हत्ये नंतर अमरावतीत आणखी दहा जणांचा जीव धोक्यात आहे. नुपूर शर्मा प्ररकरणी आणखी दहा जणांना धमक्या आल्याचा खळबळजनक आरोप भाजप खासदाराने केला आहे.

अमरावतीत नुपूर शर्मा यांच्या समर्थनार्थ पोस्ट व्हायरल केल्याचे उमेश कोल्हे यांची हत्या करण्यात आली होती. तर शहरातील 10 लोकांना नुपूर शर्मा बद्दल पोस्ट टाकल्याने जीवे मारण्याच्या धमक्या आल्या असा गंभीर आरोप भाजप नेते व खासदार अनिल बोंडे यांनी केला.

अमरावती शहरातील डॉ. गोपाल राठी यांनीही पोस्ट टाकल्या होत्या,त्यामुळे डॉ. राठी यांनी सोशल मीडियावर व्हिडीओ पोस्ट करत माफी मागितली माझ्या मुळे कोणत्या धर्मातील लोकांच्या भावना दुखावल्या असतील तर माफी मागतो यापूर्वी अशी चूक होणार नाही असंही डॉक्टर राठी यांनी आपल्या माफीनाम्या मध्ये म्हटलंय ,तर ज्यांना धमक्या आल्यात त्यांची अमरावती पोलिसांनी चौकशी केली नाही असा आरोपही अनिल बोंडे यांनी केला आहे.

धमक्या आलेल्या सर्व लोकांच्या चौकशी केल्या पाहिजे अशी मागणीही बोंडे यांनी केली, मात्र अमरावतीचे उमेश कोल्हे यांचं प्रकरण देशभरात गाजत असताना अमरावती पोलीस दिरंगाई का करीत आहे असा सवाल उपस्थित होत आहे.

उदयपूरमध्ये कन्हैयालालच्या हत्येआधीच झाली होती उमेश कोल्हेची हत्या

अमरावतीच्या उमेश कोल्हे हत्या प्रकरणाचे कनेक्शन थेट नुपूर शर्मा प्रकरणाशी जोडण्यात येत आहे. नुपूर शर्मा प्रकरणीच उदयपूरमध्ये कन्हैयालाल नावाच्या टेलरची हत्या झाली होती. उदयपूरमध्ये कन्हैयालालची हत्या होण्याच्या आठवडाभर आधीच उमेश कोल्हेची हत्या झाल्याचा दावा केला जात आहे. हत्येनंतर काही वेळातच दोन तरुणांनी एक व्हिडिओ जारी केला आणि धारदार शस्त्रे दाखवून हत्येची जबाबदारी स्वीकारली. यानंतर पोलिसांनी यांना अटक केली.

तर उदयपूरच्या कन्हैयाचा जीव वाचला असता; मृत उमेश कोल्हे यांच्या भावाचा दावा

वादग्रस्त नुपूर शर्मा यांच्या समर्थनार्थ सोशल मीडियावर पोस्ट टाकल्याने उमेश कोल्हे यांची हत्या केल्याची कबुली पोलिसांनी दिली आहे. मृतक उमेश कोल्हे यांचा भाऊ महेश कोल्हे प्रथमच प्रसार माध्यमा समोर आले. अमरावती पोलिसांनी चार ते पाच दिवसापूर्वी प्रकरण उघडकीस आणलं असतं तर राज्यस्थान मधील उदयपूरच्या कन्हैयाचा जीव वाचला असता असं महेश म्हणााले. माझ्या भावाच्या हत्या प्रकरणाचा तपास एनआयएकडे दिला हे आमचं भाग्य आणि दुर्दैव दोन्ही आहे. यापुढे कोणाची हत्या होणार नाही याची खबरदारी पोलिसांनी घ्यावी असं अवाहन महेश यांनी केले आहे.

अमरावतीच्या उमेश कोल्हेंची हत्या देखील नुपूर शर्मा प्रकरणामुळेच

54 वर्षीय उमेश कोल्हे यांच्या हत्येमुळे अमरावतीत एकच खळबळ उडाली. नुपूर शर्माच्या समर्थनार्थ पोस्ट केल्याने त्याची हत्या करण्यात आल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला होता. मात्र, हा अंदाज खरा ठरला असून नुपूर शर्मा प्रकरणामुळेच कोलेहे यांची हत्या झाल्याचा खुलासा पोलिसांनी केला आहे.

कोल्हे यांचं स्वत:चं मेडिकल स्टोर आहे. 21 जून 2022 ला कोल्हे रात्री उशीरा आपल्या मेडिकलमधून घरी जात असताना त्यांच्यावर जीवघेणा हल्ला झाला. घरी परतत असताना या हल्लेखोरांनी त्यांना रस्त्यातच गाठलं आणि त्यांच्यावर चाकूने सपासप वार केले. या हल्ल्यात ते ठार झाले.

Non Stop LIVE Update
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?.
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका.
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका.