नागौर : राजस्थानमध्ये एक भयंकर प्रकरण उघडकीस आले आहे. प्रियकराने आपल्या विवाहित प्रेयसीची हत्या करुन मृतदेहाचे तुकडे केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. हत्येच्या चार दिवसानंतर हत्येचा उलगडा करण्यास पोलिसांना यश आले. गुड्डी असे हत्या करण्यात आलेल्या महिलेचे नाव आहे, तर अनोपाराम असे हत्या करणाऱ्या आरोपीचे नाव आहे. महिलेच्या नातेवाईकांनी दिलेल्या तक्रारीनुसार पोलिसांनी अनोपाराम विरोधात गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी अनोपारामला अटक केली आहे. आरोपीने पोलीस चौकशीत गुन्ह्याची कबुली दिली आहे. मात्र अद्याप पोलिसांना मृतदेह मिळाला नाही.