इचलकरंजीः हातकणंगले तालुक्यातील कोरोची येथे एकाचा खून झाल्यानं खळबळ उडालीय. कोरोचीतील चव्हाण मळ्यामध्ये शुभम कमलाकर याची दगडाने ठेचून निर्घृण हत्या करण्यात आली. याबाबतची नोंद हातकणंगले पोलीस ठाण्यात करण्यात आलीय. हातकणंगले तालुक्यातील कोरोची गावाजवळ चव्हाण मळा येथे शुभम कमलाकर या तरुणाची डोक्यात दगड घालून निर्घृण हत्या करण्यात आली. (Brutal Murder Of A Young Man By Throwing Stone At His Head)
नागरिकांच्या ही बाब लक्षात आली असता त्यांनी शहापूर पोलिसांना ही माहिती दिली. हातकणंगले पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अशोक भवड यांच्यासह त्यांच्या पथकाने घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला.
दरम्यान, मृताचा चेहरा विद्रूप झाल्याने मृताची ओळख पटवण्यात पोलिसांना अडचण येत होती. पँटचे खिसे तपासल्यानंतर मृताची ओळख पटली. त्यानंतर नातेवाईकांचा शोध घेण्यात आला. ही हत्या प्रेम प्रकरण आणि नशेमध्ये झाली असल्याचा पोलिसांचा कयास आहे. तर याप्रकरणी अप्पर पोलीस अधीक्षक जयश्री गायकवाड यांनी आरोपींचा शोध घेण्यासाठी तीन पथके रवाना केली आहेत, अशी माहिती प्रसार माध्यमांशी बोलताना दिली.
कोरोची माळावर झालेल्या शुभम उमेश कमलाकर या तरुणाच्या खुनाचा उलगडा त्याच्याच व्हॉट्स अॅपवरील स्टेट्सवरून होण्याची शक्यता आहे. वास्तव चित्रपटातील एका हत्येचा सीन या स्टेट्समध्ये असल्याचे स्पष्ट झाले. या खुनाचे नेमके कारण अद्याप समोर आलेले नसताना शुभमने आपल्या व्हॉट्सअॅपवर ठेवलेल्या स्टेट्सची चर्चा परिसरात होऊ लागली आहे. या स्टेट्सवरून वेगवेगळ्या तर्कवितर्कांना उधाण आलेय. धोके को कभी भुलाया नही जाता’, उसका बारी बारी से हिसाब किया जाता है ! अशा आशयाचा उल्लेख स्टेट्सवर आहे. तसेच अभिनेता संजय दत्त याचा गाजलेला चित्रपट ‘वास्तव’मधील हत्येचा सीन स्टेट्सवर ठेवण्यात आला होता. त्यामुळे अशा आशयाचा स्टेट्स ठेवण्यामागे शुभमचा उद्देश काय असावा, अशी चर्चा दबक्या आवाजात सुरू झाली आहे.
शुभम रिक्षा चालवत होता. तसेच वेल्डिंगच्या दुकानात काम करत होता. मंगळवारी रात्री काम संपल्यानंतर तो मित्रांसोबत कोरोची माळावर गेला होता. यावेळी त्यांनी मद्यप्राशन केले होते. त्यानंतर त्यांच्यात वाद होऊन मारेकऱ्यांनी शुभमचा दोरीने गळा आवळून खून केला. त्यानंतर त्याची ओळख पटू नये म्हणून त्याच्या चेहऱ्यावर सिमेंटच्या खांबाने वर्मी घाव घालून चेहरा विद्रूप केला. दरम्यान, शुभमचे मित्रांसोबत वाद का झाला? याचा उलगडा शुभमने ठेवलेल्या स्टेट्सवरून होणार का? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
संबंधित बातम्या
आम्ही राहायचं कुठे? प्रॉपर्टीच्या वाद विकोपाला, मुलाकडून वडिलांची हत्या
नेव्ही अधिकारी सुरजकुमार दुबे यांची हत्या की आत्महत्या?; गूढ वाढलं
Brutal Murder Of A Young Man By Throwing Stone At His Head