सोशल डिस्टन्सिंगचे पालन न केल्यानं 3 माजी आमदारांविरोधात गुन्हा दाखल

सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचं पालन न केल्याने 3 माजी आमदारांवर सिटी कोतवाली पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल Case Filed Against 3 Former MLAs For Non Compliance With Social Distance

  • गणेश सोनोने, टीव्ही 9 मराठी, अकोला
  • Published On - 8:09 AM, 3 Dec 2020

अकोलाः गेल्या काही दिवसांपासून राज्यासह देशभरात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत चालला आहे. त्याच पार्श्वभूमीवर सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचं पालन करण्याचे सरकारकडून वारंवार निर्देश दिले जात आहेत. अकोल्यात मोर्चामध्ये सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचं पालन न केल्याने 3 माजी आमदारांवर सिटी कोतवाली पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Case Filed Against 3 Former MLAs For Non Compliance With Social Distance)

अकोल्यात काल 2 डिसेंबर रोजी OBC आरक्षण बचाव मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. विशेष म्हणजे हा मोर्चा शहरातल्या स्वराज्य भवन येथून निघून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत काढण्यात आला होता, या मोर्चात जवळपास 300 ते 400 मोर्चेकरी सहभागी झाले होते.

या मोर्चात कोरोनाच्या नियमांचे उल्लंघन करण्यात आले असून, काढलेल्या मोर्चात 3 माजी आमदारांसह 33 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विनापरवानगी मोर्चाचे आयोजन करणे आणि कोणत्याही सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचं पालन न केल्याने कलम 188, 269, भादंवि 135 बीपी ACT तसेच साथीचे रोग अधिनियम 1897 कलम 3 अन्वये सिटी कोतवाली पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यात माजी आमदार हरिदास भदे, माजी आमदार बळीराम सिरस्कार, माजी आमदार तुकाराम बिडकर यांच्यासह मोर्च्यांमधील 33 जणांचा समावेश असून, त्यांच्याविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

देशात कोरोना रुग्णांच्या संख्येत पुन्हा एकदा वाढ होत आहे. कोरोनाची दुसरी लाट येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.  या पार्श्वभूमीवर देशात सर्व पातळ्यांवर खबरदारी घेतली जात आहे. दिल्ली तसेच राज्यातील पुणे, मुंबईसारख्या शहरांत कोरोना रुग्णांची संख्या लक्षणीयरीत्या वाढत असल्याचे दिसत आहे. Case Filed Against 3 Former MLAs For Non Compliance With Social Distance

बिहार, पश्चिम बंगालमध्ये 50 रुपये, झारखंडमध्ये 1 लाख रुपयापर्यंत दंड

देशात वेगवेगळ्या राज्यांत कोरोना संसर्गाची स्थिती लक्षात घेऊन तेथील स्थानिक प्रशासन नियम ठरवत आहे. चेहऱ्यावर मास्क न लावता फिरल्यास वेगवेगळ्या राज्यांत वेगवेगळा दंड आहे. एनडीएशासित बिहार आणि तृणमूल काँग्रेसशासित पश्चिम बंगालमध्ये विनामास्क फिरल्याने सर्वांत कमी 50 रुपये दंड आहेत. तर हिमाचल प्रदेशमध्ये विनामास्क फिरताना आढळल्यास 5 हजार रुपयांचा दंड आहे. केरळमध्ये हा दंड 2 ते 10 हजार रुपयांपर्यंत आहे.

झारखंड सरकारने कोरोनाविषयक नियम अतिशय कडक केले आहेत. नागरिक विनामास्क फिरताना आढळल्यास दोन वर्षांपर्यंत कारागृह आणि एक लाख रुपयांपर्यंत दंडाची तरतूद झारखंड सरकारने केली आहे.

केरळमध्ये पुढील एक वर्ष नियम पाळावे लागणार

केरळ सरकारने कोरोनाविषयक नियम पाळण्याविषयी कडक पवित्रा घेतला आहे. नागरिक सोशल डिस्टन्सिंग नियमांचे उल्लंघन तसेच विनामास्क फिरताना आढळले तर 10 हजार रुपयांपर्यंतच्या शिक्षेची तरतूद आहे. तसेच दोन वर्षांपर्यंत कारागृहाची शिक्षासुद्धा दिली जाऊ शकते.

Case Filed Against 3 Former MLAs For Non Compliance With Social Distance

संबंधित बातम्या :

Salman Khan | दोन स्टाफ मेंबर्सना आधी कोरोनाची लागण, आता सलमान खानचा अहवाल समोर

दिल्लीत कोरोनाचा कहर, अरविंद केजरीवालांनी बोलावली सर्वपक्षीय बैठक