दीड वर्षांपासून लैंगिक अत्याचार, पीडित विद्यार्थ्याची आत्महत्या, वही भरुन सुसाईड नोट

सेवादल छात्रवासात राहणाऱ्या एका विद्यार्थ्याने गळफास लावून घेत वसतीगृहात काल (20 जानेवारी) आत्महत्या केली (Chandrapur student suicide) होती.

  • निलेश डाहाट, टीव्ही 9 मराठी, चंद्रपूर
  • Published On - 23:51 PM, 21 Jan 2020
दीड वर्षांपासून लैंगिक अत्याचार, पीडित विद्यार्थ्याची आत्महत्या, वही भरुन सुसाईड नोट

चंद्रपूर : सेवादल छात्रवासात राहणाऱ्या एका विद्यार्थ्याने गळफास लावून घेत वसतीगृहात काल (20 जानेवारी) आत्महत्या केली (Chandrapur student suicide) होती. या आत्महत्येप्रकरणी अनेक धक्कादायक खुलासे समोर आले आहेत. तसेच त्याने वही भरुन सुसाईड नोट लिहून ठेवली होती. या प्रकरणी पोलिसांनी 11 सहकारी विद्यार्थी आणि 3 कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल केला असून त्यांना अटक केली आहे.

चंद्रपूर शहरातील सेवादल छात्रावासातील एका विद्यार्थ्याने काल (20 जानेवारी) आत्महत्या केली होती. याप्रकरणी सहकारी विद्यार्थी आणि वसतिगृह कर्मचारी त्याचे लैंगिक शोषण करत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. गेल्या एक ते दीड वर्षांपासून त्याचे लैंगिक शोषण आणि मानसिक छळ होत असल्याचे समोर आल्याचे पोलीस तपासात पुढे आले आहे.

पिडीत विद्यार्थ्याच्या वस्तू तपासल्यानंतर त्याने वही भरुन लिहिलेली सुसाईड नोट पोलिसांना आढळली आहे. सुमारे 19 पानांची ही नोंदवही पोलिसांनी आता ताब्यात घेतली आहे. या छात्रावासात 93 मुले आणि 30 मुली शिक्षणासाठी वास्तव्याला (Chandrapur student suicide) आहेत.

पिडीत विद्यार्थ्याला नृत्याची आवड होती. त्यामुळे त्याचे सहकारी आणि वसतिगृह कर्मचारी त्याला नपुंसक म्हणून छळ करत. याबाबात त्याने वहीत नमूद केले आहे. मला फॅशन डिझायनर व्हायचे होते. त्यासाठी आपला संघर्ष सुरु होता असेही त्याने या सुसाईड नोटमध्ये म्हटलं आहे.

दरम्यान या प्रकरणी पोलिसांनी विद्यार्थ्याचे 11 सहकारी विद्यार्थी आणि 3 वसतिगृह कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल केला आहे. तसेच त्यांना अटकही करण्यात आली आहे. या विद्यार्थ्याला न्याय मिळावा यासाठी आज शहरात दोषींना अटक आणि छात्रावासाची मान्यता रद्द करण्यासाठी कँडल मार्चचे आयोजन करण्यात (Chandrapur student suicide) आले होते.