सोलापुरात काँग्रेस कार्यकर्ते करण म्हेत्रेंच्या अंत्ययात्रेला गर्दी, दोनशेहून अधिक समर्थकांवर गुन्हा

करण म्हेत्रेंच्या अंत्ययात्रेला शेकडो समर्थकांची गर्दी जमल्याने सोशल डिस्टन्सिंगची ऐशीतैशी झाली (Karan Mhetre Funeral Mob )

सोलापुरात काँग्रेस कार्यकर्ते करण म्हेत्रेंच्या अंत्ययात्रेला गर्दी, दोनशेहून अधिक समर्थकांवर गुन्हा
Karan Mhetre Funeral
Follow us
| Updated on: May 17, 2021 | 9:39 AM

सोलापूर : युवा नेते करण म्हेत्रे (Karan Mhetre) यांच्या अंत्ययात्रेला गर्दी करणाऱ्या दोनशेहून अधिक कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अंत्ययात्रेवेळी गर्दी करु नका असं सांगणाऱ्या पोलिसांनाच धक्काबुक्की झाली होती. करण म्हेत्रे यांच्या अंत्ययात्रेला रविवारी हजारोंच्या संख्येने जनसुमदाय आला होता. त्यामुळे सोलापुरातील सदर बाजार पोलिस स्टेशनमध्ये आपत्ती व्यवस्थापन कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Congress MLA Praniti Shinde supporter Social Activist Karan Mhetre Funeral Mob gathers in Solapur FIR filed)

करण म्हेत्रे यांच्यावर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु होते. मात्र उपचार सुरु असताना शनिवारी दुपारच्या सुमारास त्यांनी अखेरचा श्वास घेतला. म्हेत्रेंच्या निधनाची बातमी समजताच त्यांचे कार्यकर्ते संबंधित हॉस्पिटलच्या परिसरात जमा झाले. आपला नेता गेल्याने कार्यकर्त्यांनी एकच आक्रोश केला.

अंत्ययात्रेला शेकडो समर्थकांची गर्दी

दुसऱ्या दिवशी, म्हणजेच रविवारी सोलापुरात म्हेत्रेंच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. याआधी, अंत्ययात्रेला शेकडो समर्थकांची गर्दी जमल्याने सोशल डिस्टन्सिंगची ऐशीतैशी झाली. या घटनेचा व्हिडीओ समोर आला आहे. सोलापूर शहरातील सदर बाजार पोलीस स्थानक हद्दीत हा प्रकार घडला.

माजी नगरसेविका अनिता म्हेत्रे यांचे पती

करण म्हेत्रे हे लष्कर भागातील सामाजिक कार्यकर्ते होते. सोलापुरातील काँग्रेसच्या माजी नगरसेविका अनिता म्हेत्रे यांचे पती होते. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे, सोलापूरच्या आमदार प्रणिती शिंदे यांचे ते कट्टर समर्थक मानले जात होते. मोची समाजात त्यांचं वजन होतं. आमदार प्रणिती शिंदे यांच्या प्रत्येक निवडणुकीत म्हेत्रेंचा पुढाकार दिसून यायचा.

गरीब कुटुंबातून मोठ्या मेहनतीने करण म्हेत्रे यांनी समाजात स्वतःचे वेगळे स्थान निर्माण केले होते. ताडीच्या विरोधात त्यांनी आक्रमक भूमिका घेतली होती. मोची समाजातील युवकांसाठी त्यांनी स्वखर्चाने जिमही बांधली होती.

धडपडीचा युवा नेता हरपला

वयाच्या अवघ्या 40 व्या वर्षी करण म्हेत्रे यांचं निधन झाल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे. त्यांच्या पश्चात पत्नी – काँग्रेसच्या माजी नगरसेविका अनिता म्हेत्रे आणि मुले असा परिवार आहे. समाजातील धडपडीचा युवा नेता कोरोनाचा बळी गेल्याने दुःख व्यक्त होत आहे.

पाहा व्हिडीओ :

संबंधित बातम्या :

प्रणिती शिंदेंचे कट्टर समर्थक करण म्हेत्रेंचे निधन, सोलापुरात अंत्यसंस्काराला शेकडोंची गर्दी

पुण्यात गुन्हेगाराची हत्या, अंत्ययात्रेला शेकडो बाईक्सची रॅली, 80 समर्थक ताब्यात

(Congress MLA Praniti Shinde supporter Social Activist Karan Mhetre Funeral Mob gathers in Solapur FIR filed)

Non Stop LIVE Update
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?.
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?.
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका.
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल.
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?.
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?.
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?.
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ.
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा.
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?.