उल्हासनगरात चक्क आमदारांच्या कार्यालयासमोर क्रिकेट बेटिंग, पोलिसांकडून एकाला अटक

हरदासानी हा विविध मोबाईल नंबर आणि इसमांच्या नावाने बेटिंगचे आकडे लावत होता. याचवेळी पोलिसांनी त्याला रंगेहाथ पकडलं. धक्कादायक बाब म्हणजे मधुबन ही इमारत उल्हासनगरचे आमदार कुमार आयलानी यांच्या जनसंपर्क कार्यालयाच्या अगदी समोर आहे.

उल्हासनगरात चक्क आमदारांच्या कार्यालयासमोर क्रिकेट बेटिंग, पोलिसांकडून एकाला अटक
उल्हासनगरात चक्क आमदारांच्या कार्यालयासमोर क्रिकेट बेटिंगImage Credit source: TV9
Follow us
| Updated on: Aug 29, 2022 | 10:21 PM

उल्हासनगर : उल्हासनगरमध्ये आमदारांच्या कार्यालयासमोर क्रिकेट बेटिंग (Cricket Betting)चा अड्डा सुरू असल्याची बाब समोर आली आहे. उल्हासनगर पोलिसांनी धाड (Raid) टाकत हा अड्डा उध्वस्त केला आणि एकाला बेड्या ठोकल्या (Arrest) आहेत. रविवारी आशिया कप स्पर्धेतील भारत – पाकिस्तान क्रिकेट मॅच सुरू होती. या सामन्यावर उल्हासनगरमध्ये बेटिंग सुरू असल्याची माहिती उल्हासनगर पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी कारवाई करत आरोपीला रंगेहाथ पकडले.

पोलिसांकडून छापा टाकत साहित्य जप्त

मिळालेल्या माहितीनुसार, कॅम्प 2 मधील मधुबन अपार्टमेंट या इमारतीच्या पाचव्या माजल्यावर 501 क्रमांकच्या फ्लॅटमध्ये पोलिसांनी रात्री 9 च्या सुमारास धाड टाकली. यावेळी संजय हरदासानी हा इसम क्रिकेट मॅचवर बेटिंग करत असल्याचं पोलिसांना आढळून आलं. त्याच्याकडे 6 मोबाईल, टीव्ही, वायफाय, डायरी, कॅलक्युलेटर आणि इतर साहित्य जप्त करण्यात आलं.

बेटिंगचे आकडे लावताना रंगेहाथ पकडले

हरदासानी हा विविध मोबाईल नंबर आणि इसमांच्या नावाने बेटिंगचे आकडे लावत होता. याचवेळी पोलिसांनी त्याला रंगेहाथ पकडलं. धक्कादायक बाब म्हणजे मधुबन ही इमारत उल्हासनगरचे आमदार कुमार आयलानी यांच्या जनसंपर्क कार्यालयाच्या अगदी समोर आहे. त्यामुळे उल्हासनगरात खळबळ माजली आहे. याप्रकरणी आरोपी संजय हरदासानी याच्याविरोधात गुन्हा दाखल करत त्याला अटक करण्यात आली आहे. (Cricket betting in front of MLA office in Ulhasnagar, police arrested one)

हे सुद्धा वाचा

Non Stop LIVE Update
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.