दाऊदला झटका, दानिश अली मुंबई पोलिसांच्या ताब्यात

मुंबई : अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमला मोठा झटका लागला आहे. तस्कर माफिया दानिश अलीचा ताबा मुंबई पोलिसांच्या क्राईम ब्रँचने घेतला आहे. दानिश अली हा दाऊदचा भाऊ नुराचा मुलगा सोहेल कासकरचा जवळचा साथीदार आहे. सोहेलचं प्रत्यर्पणही अपेक्षित असल्याचं म्हटलं जातं आहे. दानिशला  सोहेल कासकरसोबत अमेरिकेतून आर्म्स स्मगलिंगच्या प्रकरणात अटक केली गेली होती. दानिश अली 2001 साली […]

दाऊदला झटका, दानिश अली मुंबई पोलिसांच्या ताब्यात
Follow us
| Updated on: Jul 05, 2019 | 4:41 PM

मुंबई : अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमला मोठा झटका लागला आहे. तस्कर माफिया दानिश अलीचा ताबा मुंबई पोलिसांच्या क्राईम ब्रँचने घेतला आहे. दानिश अली हा दाऊदचा भाऊ नुराचा मुलगा सोहेल कासकरचा जवळचा साथीदार आहे. सोहेलचं प्रत्यर्पणही अपेक्षित असल्याचं म्हटलं जातं आहे. दानिशला  सोहेल कासकरसोबत अमेरिकेतून आर्म्स स्मगलिंगच्या प्रकरणात अटक केली गेली होती.

दानिश अली 2001 साली दुबईत जाऊन तिथे डी कंपनीत सक्रीय झाला. त्यानंतर तो सोहेल कासकरसोबत मिळून डायमंड स्मगलिंगच्या कामात लागला होता. दोघांनी मिळून रशियामध्ये डायमंड माईन्सच्या सिंडिकेट चालविणाऱ्यासोबत डायमंड स्मगलिंगचा धंदा सुरु केला. त्याच दरम्यान दानिश अलीला विजा मिळत नव्हता, म्हणून त्याने स्टुडंट विजा घेतला आणि अध्ययनसोबत डायमंड समगलिंगचं काम सुरु केलं. मात्र, 2004 मध्ये सोहेल कासकरच्या दक्षिण आफ्रिकेत डायमंड स्मगलिंगच्या आरोपाखाली अटक झाला आणि एका वर्षानंतर तो सुटला. त्यानंतर सोहेल कासकरने दानिश अलीसोबत मिळून आर्म्स अम्युनिशन सप्लाय आणि ड्रग्सचा धंदा सुरु केला. दोघांनी आपला बेस स्पेनला बनवला आणि तिथेच पहिल्यांदा ते दोघे अमेरिकन एजन्सीजच्या रडारवर आले. अमेरिकन एजन्सीने दानिश आणि सोहेल कासकर यांच्याशी संपर्क साधला आणि स्वतःला टेरेरिस्ट दाखवत, त्यांच्याकडून हत्यार खरेदी करण्याची मागणी केली होती. शेवटी 2014 मध्ये दोघांना अटक करुन तपास एफबीआयला दिला गेला.

दानिश अलीचं भारतात प्रत्यार्पण झाल्याने आता सोहेल कासकरचाही लवकरच प्रत्यार्पण होणार, अशी शक्यता वर्तवली जात आहे. मात्र, दानिशला सध्या मकोकाअंतर्गत आर्थर रोड तुरुंगाच्या अंडा सेलमध्ये ठेवण्यात आले आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. दानिश अलीवर डी कंपनीसाठी खंडणी, ड्रग्स सिंडिकेट सोबतच अंडरवर्ल्डसाठी हवाला मार्गाच्या नेक्सस (nexus) संदर्भात मुंबई अँटी-एक्स्टॉर्शन सेलचे अधिकारीही तपास करत आहेत.

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, दानिश अलीला 15 नोव्हेंबरला चभारतात आणलं गेलं. मात्र, त्याला भारतात आणल्याची माहिती लपवण्यात आली, कारण त्याच्याकडे दाऊद गँगसंदर्भात असलेली माहिती सार्वजनिक झाल्यास पुढे सोहेल कासकरला भारतात आणण्यास अडथळा निर्माण झाला असता. त्यामुळे दानिशबद्दलची माहिती गुप्त ठेवण्यात आली.

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान.
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित.
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य.
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश.
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली.
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?.
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.