बहिणीच्या प्रियकराची गळा चिरुन हत्या, धमकावल्यानंतरही प्रेमसंबंध न तोडल्याचा राग

आरोपीने मित्राच्या मदतीने डबलूला चाकूने भोसकलं. रक्ताच्या थारोळ्यात पडलेला डबलू कसाबसा रिक्षात बसून गुरु गोविंद सिंग रुग्णालयात पोहोचला. त्याची गंभीर प्रकृती पाहून त्याला सफदरजंग रुग्णालयात पाठवण्यात आले. मात्र वाटेतच डबलूचा मृत्यू झाला.

बहिणीच्या प्रियकराची गळा चिरुन हत्या, धमकावल्यानंतरही प्रेमसंबंध न तोडल्याचा राग
क्राईम

नवी दिल्ली : दुसऱ्या समाजातील युवक आपल्या बहिणीवर प्रेम करत असल्याच्या रागातून भावाने त्याची हत्या केली. राजधानी दिल्लीतील रघुबीर नगरमधील टीसी कॅम्प परिसरात राहणाऱ्या 26 वर्षीय डबलू सिंह याचा खून झाला होता. मंगळवारी रात्री डबलू सिंहचा चाकूने गळा चिरुन खून करण्यात आला.

आरोपीने मित्राच्या मदतीने डबलूला चाकूने भोसकलं. रक्ताच्या थारोळ्यात पडलेला डबलू कसाबसा रिक्षात बसून गुरु गोविंद सिंग रुग्णालयात पोहोचला. त्याची गंभीर प्रकृती पाहून त्याला सफदरजंग रुग्णालयात पाठवण्यात आले. मात्र वाटेतच डबलूचा मृत्यू झाला. हत्येनंतर परिसरात तणावाचे वातावरण पसरले होते.

खबरदारीचा उपाय म्हणून मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करावा लागला. तत्परतेने कारवाई करत राजौरी गार्डन पोलिसांनी हत्येचा आरोपी आणि त्याच्या मित्राला अटक करण्यात आली. चौकशीत दोघांनी खुनाची कबुली दिली आहे.

दोघा आरोपींना अटक

बुधवारी दोन्ही समाजातील लोकांची भेट घेऊन शांतता राखण्याचे आवाहन केल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. पोलिसांनी बुधवारी कडेकोट बंदोबस्तात डीडीयू हॉस्पिटलमध्ये डबलूच्या मृतदेहाचे पोस्टमॉर्टम केले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुलीचा भाऊ लाडला उर्फ ​​फरान आणि त्याचा मित्र शाहलाम उर्फ ​​चन्ना अशी आरोपींची नावे आहेत.

आरोपीची धमकी

रघुबीर नगर परिसरात डबलू सिंग कुटुंबासह राहत होता. त्याच्या कुटुंबात वडील चंद्रेश सिंग, आई, एक भाऊ आणि बहीण आहेत. डबलू कपड्यांचे व्यवसाय करायचा. त्याच परिसरातील एका तरुणीवर त्याचे प्रेम होते. अनेकदा दोघे फोनवर बोलत असत. ही बाब मुलीचा भाऊ फरान याला समजताच त्याने डबलूला धमकी दिली होती. मात्र डबलू आणि तरुणीमध्ये पुन्हा संबंध सुरु झाले.

चाकूने गळा चिरला

हा प्रकार फरानला कळला. त्याने डबलूच्या खुनाचा कट रचला आणि मंगळवारी रात्री त्याला परिसरातच गाठले. यावेळी त्याच्यासोबत चन्नाही उपस्थित होता. फरानने सोबत चाकू घेतला होता. आरोपींनी आधी डबलूला मारहाण केली. यानंतर लाडलाने चाकू काढून त्याच्यावर अनेक वार केले. शेवटी त्याचा गळाही चिरला. त्यानंतर आरोपी तिथून पळून गेले.


संबंधित बातम्या 

विद्यार्थिनीवर जीव जडला, नकारामुळे शिक्षकाकडून हत्या, नंतर मालगाडीसमोर उडी मारत आयुष्य संपवलं

कुठून आला इतका द्वेष? इलेक्ट्रिशियनच्या छातीत 13 वेळा खंजीर खुपसला, जीव गेल्यावरच मारेकरी थांबला

सासरी निघालेल्या नववधूवर गाडीतच गोळीबार, एक्स बॉयफ्रेण्डवर संशय

Published On - 4:01 pm, Thu, 2 December 21

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI