Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘काय चाललंय मित्रा’ आवाज दिल्याने मित्रावरच संतापला, मटण कापण्याच्या हत्याराने वार

काय चाललंय मित्रा असा आवाज दिल्याने एका तरुणावर प्राणघातक हल्ला करण्यात आला आहे. या हल्ल्यात एक तरुण गंभीर जखमी झाला आहे.

'काय चाललंय मित्रा' आवाज दिल्याने मित्रावरच संतापला, मटण कापण्याच्या हत्याराने वार
crime scene
Follow us
| Updated on: Jan 21, 2025 | 4:17 PM

Dharashiv Crime : राज्यातील गुन्हेगारीच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होत आहे. खून, अपहरण, हत्या, फसवणूक यांसारखे गंभीर स्वरुपाचे गुन्हे राज्यभरात घडत आहेत. यावरुन राज्यात कायदा आणि सुव्यवस्था ढासळल्याचा आरोप सातत्याने होत आहे. त्यातच आता धाराशिव जिल्ह्यात एक धक्कादायक घटना घडली आहे. काय चाललंय मित्रा असा आवाज दिल्याने एका तरुणावर प्राणघातक हल्ला करण्यात आला आहे. या हल्ल्यात एक तरुण गंभीर जखमी झाला आहे. सध्या त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, धाराशिवच्या कळंब तालुक्यातील गोविंदपूर या ठिकाणी एक तरुण मटणाच्या दुकानाच्या बाजूला बसला होता. यावेळी एका तरुणाने त्याला कसं चाललंय मित्रा, काय चाललंय मित्रा असं म्हणत आवाज दिला. मात्र काय चाललंय मित्रा म्हणून नाव घेत आवाज दिल्याच्या रागातून त्याला संताप अनावर झाला. या संतापामुळे एका मित्राकडून दुसऱ्या मित्रावर प्राणघातक हल्ला करण्यात आला.

मटण कापण्याच्या सत्तुरने तरुणावर सपासप वार

यावेळी त्या संतापलेल्या तरुणाने मटण कापण्याच्या सत्तुरने त्याच्या मित्रावर सपासप वार केले. यात तरुण गंभीर जखमी झाला. यात त्याचा हात निकामी होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. या हल्ल्यानंतर तरुणाला उपचारासाठी तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या प्रकरणी अद्याप गुन्हा दाखल झालेला नाही. उपचारानंतर जखमी तरुणाचा जबाब घेऊन गुन्हा दाखल करण्यात येईल, असे स्पष्टीकरण पोलीस विभागाकडून देण्यात आले आहे.

“त्यांनी राज्याची वाय झेड..”, सुरक्षेवरून राऊत अन् महायुतीमध्ये जुंपली
“त्यांनी राज्याची वाय झेड..”, सुरक्षेवरून राऊत अन् महायुतीमध्ये जुंपली.
ठाकरेंना मशाल देणाऱ्या शिवसैनिकानं साथ का सोडली? नेत्यांची नावं घेत..
ठाकरेंना मशाल देणाऱ्या शिवसैनिकानं साथ का सोडली? नेत्यांची नावं घेत...
'राऊतांनी कुंभमेळ्यात साबणाचं दुकान...', 'त्या' टीकेवरून मनसेचा टोला
'राऊतांनी कुंभमेळ्यात साबणाचं दुकान...', 'त्या' टीकेवरून मनसेचा टोला.
'..म्हणून काहीही वक्तव्य करणार का?', कोर्टानं रणवीर अलाहबादियाला झापलं
'..म्हणून काहीही वक्तव्य करणार का?', कोर्टानं रणवीर अलाहबादियाला झापलं.
ठाकरे एकटे पडणार? आदित्य ठाकरेंचा उल्लेख करत शहाजीबापू यांचं मोठ भाकीत
ठाकरे एकटे पडणार? आदित्य ठाकरेंचा उल्लेख करत शहाजीबापू यांचं मोठ भाकीत.
80 प्रवाशांना घेऊन जाणारं प्लेन क्रॅश, लॅडिंगदरम्यानचा व्हिडीओ व्हायरल
80 प्रवाशांना घेऊन जाणारं प्लेन क्रॅश, लॅडिंगदरम्यानचा व्हिडीओ व्हायरल.
कमाल खानने सर्व मर्यादा ओलांडल्या,'त्या' वादग्रस्त पोस्टवरून CM आक्रमक
कमाल खानने सर्व मर्यादा ओलांडल्या,'त्या' वादग्रस्त पोस्टवरून CM आक्रमक.
'आता तसं होईल असं वाटत नाही', पक्षाला रामराम अन् मातोश्रीपुढं नतमस्तक
'आता तसं होईल असं वाटत नाही', पक्षाला रामराम अन् मातोश्रीपुढं नतमस्तक.
'माझं लेकरू...', सुप्रिया सुळेंसमोर संतोष देशमुखांच्या आईचा कंठ दाटला
'माझं लेकरू...', सुप्रिया सुळेंसमोर संतोष देशमुखांच्या आईचा कंठ दाटला.
'फडणवीसांनी शिंदेंना एक साबण द्यावा अन्...', संजय राऊतांचा निशाणा
'फडणवीसांनी शिंदेंना एक साबण द्यावा अन्...', संजय राऊतांचा निशाणा.