चना डाळच्या पोत्यांखालून गुटख्याची तस्करी, तंबाखूजन्य गुटखा, सुगंधी सुपारीचे 52 पोते जप्त

ट्रकमधून शिरपूर पोलिसांनी 12 लाख 70 हजार 500 रुपयांचा अवैध गुटखा जप्त केला आहे.

चना डाळच्या पोत्यांखालून गुटख्याची तस्करी, तंबाखूजन्य गुटखा, सुगंधी सुपारीचे 52 पोते जप्त
Follow us
| Updated on: Aug 25, 2020 | 5:38 PM

धुळे : इंदूर येथून धुळेकडे जाणारा एक ट्रक पोलिसांनी जप्त केला आहे (Dhule 22 Lack Gutkha Seized). या ट्रकमधून पोलिसांनी तब्बल 32 लाख 70 हजार 500 रुपयांचा गुटखा ट्रकसह जप्त केला आहे (Dhule 22 Lack Gutkha Seized).

मध्यप्रदेशच्या इंदूरकडून येणाऱ्या एका ट्रकमधून शिरपूर पोलिसांनी 12 लाख 70 हजार 500 रुपयांचा अवैध गुटखा जप्त केला आहे. पोलिसांनी मंगळवारी (25 ऑगस्ट) पहाटे ही कारवाई केली आहे. या कारवाईत अवैध गुटखा, वाहनासह एकूण 32 लाख 70 हजार 500 रुपयांचा मुद्देमाल शिरपूर पोलिसांनी जप्त केला आहे.

शिरपूर तालुका पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अभिषेक पाटील यांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे त्यांच्या पोलीस पथकातील कर्मचाऱ्यांनी हाडाखेड चेक नाका येथे सापळा रचून ही कारवाई केली. अवैध तंबाखू , गुटखा आणि प्रतिबंधित सुगंधी सुपारी घेऊन इंदूर येथून धुळ्याकडे येणाऱ्या बारा चाकी ट्रक शिरपूर पोलिसांनी जप्त केली आहे.

चना डाळच्या पोत्यांखालून गुटख्याची तस्करी

सदर हाडाखेड चेक नाका येथे या वाहनांची तपासणी करत असताना वाहनामध्ये चना डाळच्या पोत्यांखाली विमल पान मसाला, वन कंपनीचा तंबाखूजन्य गुटखा आणि प्रतिबंध सुगंधी सुपारी असे एकूण 52 पोते आढळून आले.

या प्रकरणी वाहन चालक श्याम मोहनलाल मोर्या आणि बलराम मानसिंग या दोन संशयितांना ताब्यात घेण्यात आलं आहे. याप्रकरणी भांदवि कलम 328, 272, 273, तंबाखू उत्पादने प्रतिबंधक अधिनियम कलम 7 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे (Dhule 22 Lack Gutkha Seized).

ही कारवाई पोलीस अधीक्षक चिन्मय पंडित आणि पोलीस अधीक्षक राजु भुजबळ, उपविभागीय पोलीस अधिकारी अनिल माने यांच्या मार्गदर्शनाखाली शिरपूर तालुका पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अभिषेक पाटील यांच्या नेतृत्वाखालील पथकाने केली.

Dhule 22 Lack Gutkha Seized

संबंधित बातम्या :

स्वस्तात सोने विक्रीचं आमिष देऊन लुटणं जीवावर बेतलं, अहमदनगरमधील 4 जणांच्या हत्येचा उलगडा

शेजाऱ्यांचं पाहून दोन भावांचा खारी विक्रीचा धंदा, मात्र व्यावसायिक वादातून एकाची निघृण हत्या

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान.
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित.
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य.
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश.
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली.
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?.
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.