पॉर्नसारखं प्रत्यक्षात करायला गेला आणि तो अलगद मृत्यूच्या जाळ्यात अडकला, नागपूरची भयंकर घटना

विशेष म्हणजे त्या तरुणाचं लग्न सुद्धा झालं होतं आणि त्याने प्रेमिकेसोबत हा सगळा प्रकार केला

  • सुनील ढगे, टीव्ही 9 मराठी, नागपूर
  • Published On - 16:03 PM, 8 Jan 2021
Engineer Dies

नागपूरः मोबाईलवर पॉर्न फिल्म बघून वेगवेगळ्या प्रकारे शारीरिक संबंध प्रस्थापित करणं एका तरुणाच्या जीवावर बेतलं आहे. सेक्स करण्याच्या नादात एका तरुणाचा गळफास लागून मृत्यू झालाय. नागपूर जिल्ह्याच्या सावनेर तालुक्यातील खापरखेडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या एका लॉजवर ही घटना घडली आहे. मृत्युमुखी पडलेला तरुण 27 वर्षांचा असून, तो पेशाने इंजिनीअर होता. विशेष म्हणजे त्या तरुणाचं लग्न सुद्धा झालं होतं आणि त्याने प्रेमिकेसोबत हा सगळा प्रकार केला असून, पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केलीय. (Engineer Dies Of Strangulation While Having Sex In Nagpur)

त्याचं झालं असं की, मृत्युमुखी पडलेला तरुण आणि एका 20 वर्षीय तरुणीमध्ये गेल्या काही वर्षांपासून प्रेम संबंध होते. काल दोघांनीही बाहेर फिरायला जाण्याचा बेत आखला. दोघांनीही खापरखेडा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील दहेगाव (रंगारी) परिसरात असलेल्या महाराजा लॉजवरील एक खोली बुक केली होती. तिथे गेल्यानंतर दोघांनी शारीरिक संबंध प्रस्थापित केले. यावेळी वेगवेगळ्या पोजिशनमध्ये शारीरिक संबंध प्रस्थापित करताना दोघांनी दोरीचा उपयोग केला. तरुण खुर्चीवर बसल्यानंतर त्याने हात आणि पाय दोरीने बांधून घेतले आणि दोघांनी संबंध प्रस्थापित केले.

तरुणी बाथरूममध्ये गेली असता तो तरुण खुर्चीसह खाली कोसळला

सेक्स करून झाल्यानंतर ती तरुणी बाथरूममध्ये गेली असता तो तरुण खुर्चीसह खाली कोसळला, ज्यामुळे त्याच्या गळ्याभोवती असलेला दोर आवळला गेला आणि त्याचा गळफास लागून दुर्दैवी मृत्यू झाला. ज्यावेळी ती तरुणी बाथरूमच्या बाहेर आली, तोपर्यंत त्या तरुणाचा मृत्यू झाला होता. त्यानंतर लगेचच या घटनेची माहिती लॉज व्यवस्थापकांना देण्यात आली होती, त्यांनी पोलिसांना यासंदर्भात माहिती दिल्यानंतर पोलीस देखील घटनास्थळी दाखल झाले होते. पोलिसांनी तरुणाचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी शासकीय रुग्णालयात पाठवला असून, घटनेचा तपास सुरू करण्यात आलाय.

बांधलेल्या दोरीने गळा आवळला गेल्याने मृत्यू झाल्याचा अंदाज

पोलिसांनी प्राथमिकदृष्ट्या त्या ठिकाणी तपासणी केली असता बांधलेल्या दोरीने गळा आवळला गेल्याने मृत्यू झाल्याचा अंदाज आहे, मात्र पोलिसांनी सगळ्याच बाजूने तपास सुरू केलाय. मात्र घडलेली घटना ही अगदी विचित्र प्रकारची असल्याने या घटनेची मोठी चर्चा होत आहे.

संबंधित बातम्या

नागपूरमधील रेडलाईट एरियात पोलिसांची मोठी कारवाई, 8 अल्पवयीन मुलींची सुटका, 100 ग्राहक ताब्यात

Engineer Dies Of Strangulation While Having Sex In Nagpur