शिंदखेडाः अलिकडच्या काळात मोबाईलचं मुलांचं प्रचंड वेड लागलंय. मोबाईलमध्ये व्हिडीओ पाहून प्रत्यक्षात तशी कृती करण्याचा बरीचशी मुलं प्रयत्न करत असतात. मोबाईलच्या आहारी गेलेली मुलं काय काय करू शकतात, या विचारच न केलेला बरा. धुळ्यातही असाच एक प्रकार समोर आलाय. धुळे जिल्ह्यातील शिंदखेडा तालुक्यातील तुकारामवाडीमधील हर्षल उर्फ सोन्या दीपक कुंवर या 13 वर्षांच्या मुलानं मोबाईलमध्ये व्हिडीओ पाहून आत्महत्या केल्यानं खळबळ उडालीय. (First Video In Mobile And Ended Life In Dhule)
एका मुलानं वेबसाईटवर जन्मतारीख टाकून मृत्यू कधी आणि कसा होतो हे पाहिलं आणि गळफास घेऊन स्वतःचं आयुष्य संपवल्यानं आजूबाजूच्या परिसरातील सर्वच हादरलेत. हर्षल हा शिंदखेडा तालुका धुरे येथे वास्तव्याला होता. तो आठवीच्या वर्गात शिक्षणाचे धडे गिरवत होता. लॉकडाऊनमध्ये तीन ते चार महिन्यांपासून हर्षल तुकाराम वाडीतील त्याचे मामा दीपक भदाणे यांच्याकडे राहायला आलेला होता. मामा दीपक यांचा कपडे इस्त्रीचा व्यवसाय असल्यानं ते बऱ्याचदा कामानिमित्त बाहेरच असायचे. हर्षल आणि त्याची आजी प्रमिलाबाई या घरी असायच्या.
त्या दिवशी दुपारी दोनच्या दरम्यान आजीसुद्धा कामानिमित्त दुकानावर गेली होती. दुकानावरून परतल्यानंतर स्नानगृहात हर्षलचा साडीने गळफास घेतलेला मृतदेह आढळल्यानंच आजीसुद्धा घाबरून गेली. आजूबाजूच्या परिसरातील लोकांनी त्याला तात्काळ रुग्णालयात हलवले. परंतु तिथे त्याला मृत घोषित करण्यात आले.
पोलिसांच्या माहितीनुसार, हर्षल याच्याकडे मोबाईल होता. या मोबाईलमध्ये त्याने एक वेबसाईट ओपन करून मृत्यू कधी होणार, असं सर्च करत स्वतःची जन्मतारीख टाकलेली असल्याचं दिसून आलं. तसंच यानंतरही त्याने यू ट्युबसह अनेक वेबसाईट ओपन केल्याचंही पाहायला मिळालं. आजी काही वेळासाठी बाहेर जाताच मोबाईलमध्ये व्हिडीओ बघितल्यानंतर हर्षलने स्नानगृहात जाऊन गळफास घेऊन जीवन संपवलं.
मृत हर्षल याच्या पश्चात वडील दीपक कुंवर, आई कविता आणि बहीण कोमल असा परिवार आहे. दीपक कुंवर यांचा शिंदखेडा येथे कपडे इस्त्री करण्याचा व्यवसाय आहे. तर हलाखीची परिस्थिती असल्याने हर्षलची आई भाजीपाला विक्रीचा व्यवसाय करून उदरनिर्वाह चालवते. विशेष म्हणजे पैसे नसल्याने फक्त हर्षलच्या हट्टापायी हप्त्यांवर काही दिवसांपूर्वीच 15 हजार रुपयांचा नवीन मोबाईल खरेदी करून दिला होता. परंतु मुलानं केलेल्या या कृत्यानं कुंवर कुटुंबचं हादरून गेलंय.
संबंधित बातम्या
दुसऱ्या महिलेचा फोटो पाहत होता पती, पत्नीने थेट केला चाकून हल्ला; नंतर समोर आलं सत्य
First Video In Mobile And Ended Life In Dhule