विकृतीचा कळस! प्रेमसंबंध ठेवण्यास नकार दिल्याने माथेफिरूने तरुणीच्या चेहऱ्यावर फोडली बिअरची बाटली

तरुणीने प्रेम संबंधासाठी नकार दिल्यानंतर एका विकृत तरुणाने तिच्या चेहऱ्यावर बियरच्या बाटलीने हल्ला केला. जखमी तरुणीच्या चेहऱ्याला 25 टाके लागले.

विकृतीचा कळस! प्रेमसंबंध ठेवण्यास नकार दिल्याने माथेफिरूने तरुणीच्या चेहऱ्यावर फोडली बिअरची बाटली
तरुणीवर बियर बाटलीने हल्ला Image Credit source: Social Media
Follow us
| Updated on: Nov 18, 2022 | 4:38 PM

चेन्नई, प्रेम प्रकरणासाठी नकार दिल्याने विकृत तरुणाने मुलीच्या चेहऱ्यावर (Girls Face) चक्क बियरची बाटली (Attack by beer Bottle) फोडल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. मंगळवारी रात्री चेन्नईच्या किलपॉकमधील एका हॉटेलमध्ये फ्रंट डेस्कवर काम काम करणाऱ्या एका 20 वर्षीय तरुणीला 25 वर्षीय तरुणाने प्रपोज केले, मात्र मुलीने नकार देताच तरुणाने कपड्यांमध्ये लपवलेली रिकामी बिअरची बाटली बाहेर काढली आणि तिच्या चेहऱ्यावर मारली. या हल्ल्यात तरुणी गंभीर जखमी झाली आहे. जखमी अवस्थेत तरुणीला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पोलिसांनी हल्लेखोराला अटक केली असून त्याचे नाव नवीन कुमार असे आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, त्याने नौदल अधिकारी असल्याचे सांगून तरुणीशी फेसबुकवर मैत्री केली होती.

तरुणीला जाणीवपूर्वक विद्रुप केले

एका इंग्रजी वृत्तपत्राच्या वृत्तानुसार, पीडित तरुणी एअरलाईनमध्ये काम करण्यासाठी इच्छुक होती.  पोलिसांनी सांगितले की,  नवीनने मुलीच्या चेहऱ्यावर जाणीवपूर्वक प्रहार करणे निवडले कारण त्याला तिला विद्रूप करायचे होते. जेणेकरून तीला   एअरलाइनची नोकरी मिळणार नाही आणि ती दुसऱ्याशी लग्न करू शकणार नाही.

रोजंदारीवर मजूर होता हल्लेखोर

वेपेरी येथे राहणारा हल्लेखोर नवीन हा आयएनएस अडयार कॅन्टीनमध्ये रोजंदारी मजूर म्हणून काम करतो. तो केरळमधील तिरुवनंतपुरम येथील एका मुलीच्या मागे लागला होता. सहा महिन्यांपूर्वी त्याची तरुणीशी फेसबुकवर मैत्री झाली होती. आरोपीने आपल्या सोशल मीडिया स्टेटसमध्ये ‘नौदलात सेवा केल्याचा अभिमान आहे’ असे लिहिले होते. तो इतरांना नौदलात काम करत असल्याचे सांगायचा.

हे सुद्धा वाचा

अहवालात एका पोलीस अधिकाऱ्याचा हवाला देऊन म्हटले आहे की, “नवीन कुमारने मुलीला सांगितले होते की तो समुद्रात आहे आणि परतल्यावर तिला भेटेल. नंतर काही बऱ्याचदा तो मुलीच्या मूळ गावीही गेला. गेल्या महिन्यात मुलगी चेन्नईला येऊन किलपॉक येथील हॉटेलमध्ये नोकरीला लागली होती. ती जवळच्याच महिला वसतिगृहात राहात होती. एका पोलिस सूत्राने सांगितले, “ती एअरलाइन केबिन क्रू म्हणून तिच्या नावनोंदणीची वाट पाहत होती. नवीन आपल्याशी खोटे बोलत असल्याचे तिला समजल्यानंतर मुलीने त्याच्याशी भेटणे आणि बोलणे बंद केले.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी रात्री ही मुलगी हॉटेलमधून काम आटोपून हॉस्टेलला जात असताना नवीन कुमारने तिला अडवले. तपास अधिकारी म्हणाले, ‘तरुणाने तरुणीशी लग्न करण्याचा आग्रह धरला. जेव्हा मुलीने त्याचा प्रस्ताव नाकारला तेव्हा तो संतापला. त्याने कपड्यांमध्ये लपवलेली बिअरची रिकामी बाटली फोडली आणि मुलीच्या चेहऱ्यावर वारंवार वार केले.  स्थानिक लोकांनी आरोपी नवीन कुमारला पकडण्याचा प्रयत्न केला, मात्र तो पळून जाण्यात यशस्वी झाला. लोकांनी जखमी  झालेल्या तरुणीला जवळच्या रुग्णालयात नेले, जिथे डॉक्टरांना तिच्या चेहऱ्यावर 25 टाके घालावे लागले.

Non Stop LIVE Update
शशिकांत शिंदेंचे घोटाळे दाबणार का?सवाल करत उदयनराजेंचा पवारांवर निशाणा
शशिकांत शिंदेंचे घोटाळे दाबणार का?सवाल करत उदयनराजेंचा पवारांवर निशाणा.
महायुतीत अद्याप 7 जागांचा पेच? पारंपारिक जागा भाजपला विरोधकांचा निशाणा
महायुतीत अद्याप 7 जागांचा पेच? पारंपारिक जागा भाजपला विरोधकांचा निशाणा.
मनामनातील सूनबाई, सुनेला पाठवा दिल्लीत अन् लेकीला...कुणी घेतला समाचार?
मनामनातील सूनबाई, सुनेला पाठवा दिल्लीत अन् लेकीला...कुणी घेतला समाचार?.
नवनीत राणांवर बोलताना संजय राऊत घसरले, बाई खुणावेल, डोळा मारेल पण...
नवनीत राणांवर बोलताना संजय राऊत घसरले, बाई खुणावेल, डोळा मारेल पण....
ईव्हीएम मशीनबद्दल कोर्टानं काय सांगितलं? याचिकाकर्त्यांना झापलं आणि...
ईव्हीएम मशीनबद्दल कोर्टानं काय सांगितलं? याचिकाकर्त्यांना झापलं आणि....
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?.
निधीवरून धमकीचा मामला...अजित पवारांचं 'त्या' वक्तव्यावरून स्पष्टीकरण
निधीवरून धमकीचा मामला...अजित पवारांचं 'त्या' वक्तव्यावरून स्पष्टीकरण.
लटकवून लटकवून उमेदवारी मिळाली, राणेंना ठाकरे गटाच्या नेत्यानं डिवचलं
लटकवून लटकवून उमेदवारी मिळाली, राणेंना ठाकरे गटाच्या नेत्यानं डिवचलं.
बाई खुणावेल, डोळा मारेल पण... राऊतांचा नाव न घेता राणांवर निशाणा
बाई खुणावेल, डोळा मारेल पण... राऊतांचा नाव न घेता राणांवर निशाणा.
अजितदादांवर गुन्हा दाखल होणार? शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी, पण का?
अजितदादांवर गुन्हा दाखल होणार? शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी, पण का?.