मैत्रिणी खातीर ‘ती’चा ‘तो’ झाला, घरच्यांनी बलात्काराचा गुन्हा दाखल केला

दोघी मैत्रिणी एकमेकांवाचून जगू शकत नव्हत्या अखेर त्यांनी लग्नाचा निर्णय घेतला, परंतू घरच्यांनी विरोध केल्याने दोघींपैकी एकीने सेक्स चेंज केले, परंतू तिच्या घरच्यांनी 'ती' चा 'तो' झालेल्यावरच रेपचा गुन्हा दाखल केला , काय झाले अनोख्या प्रेमकथेचे

मैत्रिणी खातीर 'ती'चा 'तो' झाला, घरच्यांनी बलात्काराचा गुन्हा दाखल केला
SANA-SONALImage Credit source: socialmedia
Follow us
| Updated on: Jan 24, 2023 | 6:25 PM

झांशी : ही कहाणी आहे दोन अजाण मुलींची. दोघींची मैत्री अख्ख्या गावात प्रसिद्ध होती. त्यामुळे एक जरी एकटी फिरताना दिसली तर गाववाल्यांना चुकल्या चुकल्या सारखे वाटायचे. अशा दोघींच्या घनिष्ठ मैत्रीला नजरच लागली म्हणायची. त्याचं काय झाले की दोन मुली एकमेकांच्या प्रेमात आकंट बुडाल्या. आजचा जमाना जरी बदलला असला तरी आपले हे अनोखे नातं घरच्यांना रूचणार नाही याची त्यांना कुणकुण लागली होती. त्यामुळे त्या दोघींमधील एकीने लींंगबदल करण्याचा निर्णय घेतला, परंतू घरातल्यांनी ‘ती’ चा ‘तो’ झालेल्यावर त्याच्यावर थेट बलात्काराचाच गुन्हा दाखल केला. त्यामुळे या ‘लव्ह स्टोरी’चा असा वेगळाच ‘दि एंड’ होत आहे.

उत्तर प्रदेशातील दोन मुली एकमेकींच्या प्रेमात पडल्या. एकीचे नाव सोनल तर दुसरीचे साना, सोनल ही झांशीत आपल्या आईवडीलांकडे रहात असताना साना तिच्याकडे पेईंग गेस्ट म्हणून रहायला आली. साल 2016 सोनलच्या घराच्या वरचा मजल्यावर साना रहायला आली. दोघींमध्ये चांगलीच मैत्री झाली. सुरूवातीला केवळ मैत्रीने झाली परंतू नंतर दोघींना एकमेकांशिवाय चैन पडेणा. घरच्यांना संशय आल्याने सोनलच्या परीवाराने सानाला रूम सोडून जाण्यास सांगितले. त्यामुळे त्यांच्या प्रेम कहानीचा अंत व्हायची वेळ आली.

सोनल आणि साना यांच्या नात्याला मान्यता मिळाली नाही. कारण मुलीने मुलीशी लग्न कसे होणार लोक काय म्हणणार म्हणून घरच्यांनी या समलिंगी विवाहाला परवानगी नाकारली. साना गव्हर्नमेंट जॉबला असल्याने तिला 2017 मध्ये झांशीमध्ये रहायला सरकारी क्वॉटर्स मिळाल्याने ती शहरात रहायला गेली. ती शहरात गेल्याच्या दुसऱ्याच दिवशी सोनल तिच्याकडे रहायला गेली. एकदा सोनलने सानाला गंमतीने म्हणाली की, तू सेक्स चेंज का नाही करीत म्हणजे आपल्याला कोणी रोखू शकणार नाही. बस्स सानाने हे मनावरच घेतले आणि ती दिल्लीच्या गंगाराम हॉस्पिटलमधून स्वत: ची लिंगबदल शस्त्रक्रीया केली. गंगाराम हॉस्पिटलच्या सर्जनने साना ऑपरेशनसाठी फिट असल्याचे तिला तपासून सांगितले.

2021 मध्ये सानाने सेक्स चेंज सर्जरी करीत सोहेल खान नाव धारण केले, हॉस्पिटलच्या सर्व कागदपत्रावर साना ऊर्फ सोहेल याची पत्नी म्हणून सोनलने सह्या केल्या, साना प्रमाणे आपल्यालाही नोकरी हवी अशी सोनलची तीव्र इच्छा होती. त्या प्रयत्ना यश येऊन साना प्रमाणे 2022 सोनललाही यर्थाथ हॉस्पिटलमध्ये नोकरी लागली. मात्र त्यानंतर तिच्या स्वभावात बदल होऊ लागला. त्यानंतर ती नोकरीमध्येच जास्त वेळ देऊ लागली. त्यानंतर त्यांच्यात खटके उडू लागले.

एकदा सोनलने आपल्याला घरच्यांची खूप आठवण येत असल्याचे सांगितले. त्यानंतर त्याने चौकशी केली असता सोनलचे तिच्या नोकरीच्या ठिकाणी हॉस्पिटलमध्ये दुसऱ्या एका तरूणाशी सूत जुळल्याचे समजले. त्यानंतर सोनलने साना ऊर्फ सोहेल यांच्याशी भांडण करीत त्याचे घर सोडले, त्यानंतर तिच्या कुटुंबियांनी सोहेलवरच अपहरण आणि बलात्काराचा आरोप केला. त्यामुळे सोहेलने पोलीसांत केस दाखल केली, परंतू सोनलने पोलीसांचे म्हणणे धुडकावले. त्यामुळे तिला काहीही फरक न पडल्याने सोहेलने अखेर कोर्ट केस केली. परंतू सोनल कोर्टातही हजर झाली नाही, त्यानंतर पोलीसांनी सोनलला 18 जानेवारीस अटक केली, आता सोनल जामिनावर सुटली आहे. 23 फेब्रुवारीला पुढची तारीख आहे.

Non Stop LIVE Update
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती.
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया.
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?.
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?.
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा.
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान.