Nagpur Crime : चौघे दारू प्यायला गेले, दोघे परत का आले यावरून वाद, नागपुरात नशेत दोघांना मारहाण, एकाचा जीव गेला

चार मित्रांनी बारमध्ये दारू ढोकसली. दोघे घरी निघून गेले. मात्र दोघांना एकटे सोडून गेल्याचा राग आला. त्यांनी चक्क एकाची हत्या केल्याची घटना नागपुरात घडली.

Nagpur Crime : चौघे दारू प्यायला गेले, दोघे परत का आले यावरून वाद, नागपुरात नशेत दोघांना मारहाण, एकाचा जीव गेला
नागपुरात नशेत दोघांना मारहाण, एकाचा जीव गेला
Image Credit source: t v 9
सुनील ढगे

| Edited By: गोविंद हटवार, टीव्ही 9 मराठी डिजीटल

Jul 28, 2022 | 3:03 PM

नागपूर : नागपूरच्या पारडी ( Pardi) पोलीस स्टेशन हद्दीमध्ये थरारक घटना घडली. एकाच वस्तीत राहणारे चार जण दारू पिण्यासाठी गेले. चौघांनी सोबत दारू ढोकसली. त्यानंतर दोघं त्या ठिकाणावरून निघून घरी गेले. घरात स्वयंपाक बनवायला लागले. तेवढ्यातच दारू पीत बसलेल्या दोघांनी त्यांना फोन केला. हमको अकेला छोडके क्यू चले गये. रुक जाओ आके दिखता हुँ. असं म्हणत तिथून निघाले. त्यांच्या घरी पोहोचले. दारूच्या नशेत त्यांनी दोघांनाही मारहाण सुरू केली. या मारहाणीत नेमालाल गडे यांचं डोकं पिल्लरला लागलं. त्यानंतर ते खाली पडले. त्यांना दोघांनी लाथा बुक्क्यांनी मारहाण (Beating) केली. त्यात नेमालाल यांचा मृत्यू झाला. पोलिसांनी आरोपी विनोद निर्मलकर (Vinod Nirmalkar) याला आणि त्याच्या अल्पवयीन भावाला अटक केली. तपास पारडी पोलीस स्टेशनचे पीआय एस कोटनाके करीत आहेत.

भोजनालयात एकटे सोडून गेल्याचा वाद

अंबेनगरचे मुकुंदा मते यांना मंगळवारी सायंकाळी शेजारी असणार्‍या विजय गुल्हाने याने सुभाननगर येथील लखन सावजी भोजनालय येथे बोलाविले. नेमालाल गडे ( वय 58) यांना भाजी घ्यायची होती. त्यांनाही सोबत घेऊन मते बाजारात गेले. नंतर गडे यांना घरी पाठवून ते भोजनालयात गेले. युवराज वैद्य व आरोपी विनोद निर्मलकर हेदेखील बसले होते. सर्वांनी दारू ढोकसली. यानंतर घरी काम असल्याने मते साडेसात वाजता घरी परत आले. काही वेळातच त्यांना विनोदचा फोन आला. तसेच भोजनालयात एकटे सोडून गेल्याबद्दल त्यांनी वाद घातला. नंतर काळी वेळाने विनोद त्याच्या लहान भावासह मते यांच्या घरी पोहोचला. त्यांनी मते यांना मारहाण करायला सुरुवात केली.

गडे यांचा गेला नाहक जीव

मते यांचे शेजारी गडे हे घरीच होते. भांडण चालू असताना ते घरातून बाहेर आले. त्यांना पाहून आरोपींनी त्यांना मारहाण केली. गडे यांना ढकलले. ते गेटवर जाऊन पडले. यात त्यांना गंभीर दुखापत झाली. डोक्यातून रक्त येत असतानाही आरोपी मारहाण करीत होते. काही वेळांनी आरोपी पळून नेले. जखमी अवस्थेत गडे यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. येथे डॉक्टरांनी त्यांना घोषित केले. मते यांच्या तक्रारीवरून विनोद व त्याच्या लहान भावाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. मूळ वादाशी कोणताही संबंध नसताना गडे यांना नाहक जीव गमवावा लागला.

हे सुद्धा वाचा


Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें