इचलकरंजीत जर्मनी गँगच्या गुंडांचा दोघांवर जीवघेणा हल्ला, एकाची बोटे तुटली

इचलकरंजीमध्ये पूर्ववैमनस्यातून जर्मनी गँगच्या गुंडांनी दोघांवर सशस्त्र हल्ला केला.

इचलकरंजीत जर्मनी गँगच्या गुंडांचा दोघांवर जीवघेणा हल्ला, एकाची बोटे तुटली
Follow us
| Updated on: Nov 14, 2020 | 3:07 PM

इचलकरंजी : इचलकरंजीमध्ये पूर्ववैमनस्यातून जर्मनी गँगच्या गुंडांनी दोघांवर सशस्त्र हल्ला केला. या हल्ल्यात आकाश संजय वासुदेव (वय 30 रा. जवाहरनगर) आणि सुनिल वाघवे हे दोघे जखमी झाले असून वासुदेव याच्या हाताची बोटे तुटली आहेत. (Germany gang Goons Attacked 2 people in ichalkaranji)

हल्ल्यात जखमी झालेल्यांवर इचलकरंजीमधल्या इंदिरा गांधी सामान्य रुग्णालयात उपचार सुरु आहेत. ही घटना जवाहरनगर परिसरातील गणपती मंदिरानजीक घडली. या प्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला.

जवाहरनगर परिसरात राहण्यास असलेल्या आकाश वासुदेव आणि लिगाडे मळा परिसरातील सुनिल वाघवे यांचे जर्मनी गँगचा अभी तेरणे याच्याशी पूर्ववैमनस्यातून वाद होता. या वादातूनच तेरणे याने साथीदारांच्या मदतीने वाघवे याला बेदम मारहाण केली. त्यामध्ये तो जखमी झाला आहे. वाघवे याच्याकडे वासुदेव याच्यासंदर्भात विचारणा केली असता तो कोठे आहे याची माहिती नसल्याचे वाघवे याने सांगितले. दरम्यान वासुदेव हा गणपती मंदिर परिसरात आला असल्याचे समजल्यानंतर तेरणे याच्यासह चौघांनी त्याच्यावर सशस्त्र हल्ला केला. त्यामध्ये वासुदेव याच्या डोकीत आणि हातावर वार करण्यात आल्याने तो गंभीर जखमी झाला.

या हल्ल्यात वासुदेव याच्या हाताची बोटे तुटल्याचे समजते. घटनेनंतर हल्लेखोर पसार झाले. जखमी वासुदेव याला नागरिकांनी उपचारासाठी इंदिरा गांधी सामान्य रुग्णालयात दाखल केले. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर वासुदेव याच्या समर्थकांसह नातेवाईकांनी रुग्णालयाबाहेर मोठी गर्दी केली होती. वासुदेव हा पोलिस रेकॉर्डवरील गुन्हेगार असल्याचे समजते. (Germany gang Goons Attacked 2 people in ichalkaranji)

संबंधित बातम्या

इम्तियाज जलील यांच्या तिरंगा रॅलीत आरटीआय कार्यकर्त्यावर जीवघेणा हल्ला

अंगावर उकळतं तेल ओतलं, मित्राच्या मदतीने पत्नीचा पतीवर जीवघेणा हल्ला

Non Stop LIVE Update
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?.
निधीवरून धमकीचा मामला...अजित पवारांचं 'त्या' वक्तव्यावरून स्पष्टीकरण
निधीवरून धमकीचा मामला...अजित पवारांचं 'त्या' वक्तव्यावरून स्पष्टीकरण.
लटकवून लटकवून उमेदवारी मिळाली, राणेंना ठाकरे गटाच्या नेत्यानं डिवचलं
लटकवून लटकवून उमेदवारी मिळाली, राणेंना ठाकरे गटाच्या नेत्यानं डिवचलं.
बाई खुणावेल, डोळा मारेल पण... राऊतांचा नाव न घेता राणांवर निशाणा
बाई खुणावेल, डोळा मारेल पण... राऊतांचा नाव न घेता राणांवर निशाणा.
अजितदादांवर गुन्हा दाखल होणार? शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी, पण का?
अजितदादांवर गुन्हा दाखल होणार? शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी, पण का?.
'यमराज'नं भरला लोकसभेचा उमेदवारी अर्ज? रेड्यावर बसून घेतली एन्ट्री
'यमराज'नं भरला लोकसभेचा उमेदवारी अर्ज? रेड्यावर बसून घेतली एन्ट्री.
नाची, डान्सर आणि... नवनीत राणांवर बोलताना संजय राऊतांची जीभ घसरली
नाची, डान्सर आणि... नवनीत राणांवर बोलताना संजय राऊतांची जीभ घसरली.
सुनेत्रा पवारांनी उमेदावारीचा अर्ज दाखल करताच दादांनी भरला डमी अर्ज
सुनेत्रा पवारांनी उमेदावारीचा अर्ज दाखल करताच दादांनी भरला डमी अर्ज.
लोकसभेची निवडणूक म्हणजे अफझलखानाची... अमोल कोल्हे नेमकं काय म्हणाले?
लोकसभेची निवडणूक म्हणजे अफझलखानाची... अमोल कोल्हे नेमकं काय म्हणाले?.
ठरलं... रत्नागिरी-सिंधुदुर्गातून राणे लढणार, भाजपकडून 13 वी यादी जाहीर
ठरलं... रत्नागिरी-सिंधुदुर्गातून राणे लढणार, भाजपकडून 13 वी यादी जाहीर.