गोव्यात देहविक्रीच्या रॅकेटचा पर्दाफाश, मुंबईतील टीव्ही अभिनेत्रीसह तिघींची सुटका

गोव्यात देहविक्रीच्या रॅकेटचा पर्दाफाश, मुंबईतील टीव्ही अभिनेत्रीसह तिघींची सुटका
गोव्यात सेक्स रॅकेटचा पर्दाफाश
Image Credit source: टीव्ही9

मुंबईतील एका टीव्ही अभिनेत्रीसह तीन महिलांची सुटका करण्यात आली आहे. तर हैदराबादमधील एका व्यक्तीला अटक करण्यात आली आहे.

संदीप राजगोळकर

| Edited By: अनिश बेंद्रे

Mar 19, 2022 | 10:26 AM

पणजी : गोवा पोलिसांकडून (Goa Police) हाय प्रोफाईल सेक्स रॅकेटचा पर्दाफाश करण्यात आला आहे. गोवा गुन्हे शाखेने पणजीजवळ सांगोल्डा गावात कारवाई केली. मुंबईतील एका टीव्ही अभिनेत्रीसह (TV actress) तीन महिलांची सुटका करण्यात आली आहे. सुटका झालेल्या तीन महिलांपैकी अन्य दोघी झारखंड आणि तेलंगणा या राज्यातील रहिवासी आहे. तर आंध्र प्रदेशमधील एका व्यक्तीला अटक करण्यात आली आहे. हैदराबादचा (Hyderabad) रहिवासी असलेला आरोपी गोव्यात सेक्स रॅकेट चालवत असल्याचा आरोप आहे.

काय आहे प्रकरण?

26 वर्षीय हाफिज सय्यद बिलाल गोव्यात पणजीजवळ सांगोल्डा गावात देहविक्रीचा व्यापार चालवत असल्याची माहिती गोवा गुन्हे शाखेच्या पथकाला मिळाली होती. त्यानुसार बनावट ग्राहक पाठवून पोलिसांनी आरोपीला जाळ्यात पकडण्याचा प्रयत्न केला. सांगोल्डा भागातील एका सुप्रसिद्ध हॉटेलमध्ये तीन महिला पाठवण्याबाबत व्यवहार झाला. गुरुवारी संध्याकाळी 50 हजार रुपयांचे ऑनलाईन पेमेंट करण्यात आले.

पणजीतील बड्या हॉटेलमध्ये हायप्रोफाईल सेक्स रॅकेट

आरोपीला घटनास्थळी रंगेहाथ ताब्यात घेण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली. तीस ते चाळीस वर्ष वयोगटातील तीन पीडित महिलांची देहविक्रीच्या व्यापारातून सुटका करण्यात आली. त्यापैकी एक टीव्ही अभिनेत्री असल्याचं समोर आलं. पणजीतील बड्या हॉटेलमध्ये आपण हायप्रोफाईल सेक्स रॅकेट चालवत असल्याची कबुली आरोपीने दिली आहे.

संबंधित बातम्या :

पिंपरीतील लॉजवर वेश्या व्यवसाय, प्रसिद्ध अभिनेत्रीसह तिघींची देह व्यापाराच्या दलदलीतून सुटका

पोलिसांनी बोगस ग्राहक पाठवला आणि महिला दलाल जाळ्यात अडकली, कल्याणमध्ये देह व्यापार रॅकेटचा पर्दाफाश

पिंपरीत स्पा सेंटरच्या नावाखाली वेश्या व्यवसाय, महिला मालकासह दोघे अटकेत, चौघींची सुटका

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें