नाईलाजास्तव झालेल्या लग्नाचं लोढणं, पोलिसाकडून गर्भवती पत्नीची कारखाली चिरडून हत्या

अफसर अलीने बरेलीच्या नजमासोबत 2019 मध्ये लग्न केले होते. फेसबुकवर झालेल्या मैत्रीनंतर दोघांमध्ये संबंध आले. अफसरला तिच्यासोबत लग्न करायचं नव्हतं, पण हे प्रकरण पोलिसांपर्यंत जाऊ नये म्हणून नाईलाजास्तव त्याला विवाहबंधनात अडकावं लागलं.

नाईलाजास्तव झालेल्या लग्नाचं लोढणं, पोलिसाकडून गर्भवती पत्नीची कारखाली चिरडून हत्या
हरियाणामध्ये पोलिसाकडून पत्नीची हत्या
Follow us
| Updated on: Oct 18, 2021 | 11:49 AM

चंदिगढ : हरियाणा रेल्वे पोलीस उपनिरीक्षकाला त्याच्याच गर्भवती पत्नीची हत्या केल्याप्रकरणी अटक झाली आहे. आरोपी अफसर अली हा रेल्वेमध्ये उपनिरीक्षक पदावर कार्यरत होता. पोलीस अधिकारी कमलदीप गोयल यांनी सांगितले की, आरोपी पोलीस कर्मचाऱ्याने त्याच्या चुलत भावासोबतच स्वतःच्या पत्नीचा जीव घेतला. 5 महिन्यांच्या गर्भवती पत्नीला त्याने कारखाली चिरडल्याचा आरोप आहे.

काय आहे प्रकरण?

अफसर अलीने बरेलीच्या नजमासोबत 2019 मध्ये लग्न केले होते. फेसबुकवर झालेल्या मैत्रीनंतर दोघांमध्ये संबंध आले. अफसरला तिच्यासोबत लग्न करायचं नव्हतं, पण हे प्रकरण पोलिसांपर्यंत जाऊ नये म्हणून नाईलाजास्तव त्याला विवाहबंधनात अडकावं लागलं. त्याचवेळी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी तिहेरी तलाक विरोधी कायदा आणला, आणि अलीला नजमास सोडणं कठीण झालं.

लग्नानंतर वादावादी

लग्नाच्या काही काळानंतर दोघांमध्ये वैयक्तिक वाद सुरु झाले. छोट्या छोट्या गोष्टींवरुन त्यांच्यात भांडणं व्हायला लागली. दोघांमधील वाद इतका वाढला, की नजमा परस्पर संमतीने तिच्या घरी गेली. नजमाच्या कुटुंबीयांनी आरोपी पोलीस उपनिरीक्षकाविरुद्ध महिला पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली होती. त्यानंतर दोघांमध्ये समेट घडला आणि अली त्याच्या पत्नीला माहेरुन घरी घेऊन आला.

फिरायला नेण्याच्या बहाण्याने चिरडलं

अफसर अली आणि नजमा हे पृथ्वी नगर फरकपूरमध्ये एकत्र राहू लागले. नजमा गरोदर राहिल्यानंतरही दोघांमधील भांडण संपले नाही. अफसर अलीने बायकोचा काटा काढण्याचा प्लॅन केला. या कामात त्याच्या चुलत भावाने त्याला साथ दिली. 24 सप्टेंबर रोजी अली आपल्या गर्भवती पत्नीला बाहेर फिरायला घेऊन गेला होता. त्याचवेळी ठरल्यानुसार त्याच्या चुलत भावाने त्याला मागून स्कॉर्पिओने चिरडले.

पोलीस तपासात कट उघड

या अपघातात ती गंभीर जखमी झाली होती. त्यानंतर तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले. पण तिचा जीव वाचवता आला नाही. त्यामुळे अफसर अलीच्या मार्गातील काटा कायमचा काढला गेला. मात्र पोलीस नजमाच्या मृत्यूचा तपास करत होते. गुन्हे शाखेने या प्रकरणी कसून तपास केला. तपासानंतर हा अपघात नसून सुनियोजित कट असल्याचे उघड झाले. इतर कोणी नाही, तर नजमाच्या पतीनेच हा कट रचल्याचं उघड झाल्यानंतर पोलिसांनी त्याला अटक केली.

संबंधित बातम्या :

औरंगाबादेत आठवडाभरातच आणखी एक क्रूर हत्या, पत्नीच्या डोक्यात कुऱ्हाडीचे घाव घालून पतीचीही आत्महत्या

न्यूड फोटो व्हायरल करण्याच्या धमकीने 15 वर्षीय मुलीवर बलात्कार, तरुणासह दोघी जणींना अटक

CCTV VIDEO | दिल्लीतील भरचौकात तरुणावर चाकूहल्ला, हत्येचा थरार सीसीटीव्हीत कैद

Non Stop LIVE Update
मी लंगोट घालून तयार, मला भाजपला... वसंत मोरे यांनी थोपडले दंड
मी लंगोट घालून तयार, मला भाजपला... वसंत मोरे यांनी थोपडले दंड.
दानवेंची मनसे नेत्यानं काढली अक्कल, पद मिळालं म्हणून...,कुणाचा पलटवार?
दानवेंची मनसे नेत्यानं काढली अक्कल, पद मिळालं म्हणून...,कुणाचा पलटवार?.
दानवे 8-10 दिवसांत आमच्यासोबत..., शिंदे गटाच्या नेत्याचा मोठा दावा
दानवे 8-10 दिवसांत आमच्यासोबत..., शिंदे गटाच्या नेत्याचा मोठा दावा.
भाजप सोडल्यानंतर तुम्हाला कुत्रंही…कुणी केला खडसेंवर जोरदार पलटवार?
भाजप सोडल्यानंतर तुम्हाला कुत्रंही…कुणी केला खडसेंवर जोरदार पलटवार?.
स्मशानभूमीत जाण्यास डॉक्टरकडूनच अडकाठी, कुठं घडला धक्कादायक प्रकार?
स्मशानभूमीत जाण्यास डॉक्टरकडूनच अडकाठी, कुठं घडला धक्कादायक प्रकार?.
मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतरही अजितदादांवर शिवतारेंची शाब्दिक फायरिंग
मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतरही अजितदादांवर शिवतारेंची शाब्दिक फायरिंग.
'मविआ'चा फॉर्म्युला फायनल, ठाकरे गट, पवार गटाची उमेदवारांची नावं ठरली?
'मविआ'चा फॉर्म्युला फायनल, ठाकरे गट, पवार गटाची उमेदवारांची नावं ठरली?.
भाजप-मनसे युतीवर दिल्लीत शिक्कामोर्तब? राज दिल्लीला, महायुतीत येणार?
भाजप-मनसे युतीवर दिल्लीत शिक्कामोर्तब? राज दिल्लीला, महायुतीत येणार?.
महायुतीत मढ्यातील तिढा काही सुटेना, धैर्यशील मोहिते पाटील अपक्ष लढणार?
महायुतीत मढ्यातील तिढा काही सुटेना, धैर्यशील मोहिते पाटील अपक्ष लढणार?.
महायुतीचा फॉर्म्युला निश्चित! शिंदेंच्या 10 उमेदवारांची यादी तयार
महायुतीचा फॉर्म्युला निश्चित! शिंदेंच्या 10 उमेदवारांची यादी तयार.