ऊसाच्या शेतात 35 वर्षीय तरुणाचा नग्न मृतदेह, बेदम मारहाण करुन हत्येचा अंदाज

यमुनानगर पांवटा साहिब राष्ट्रीय महामार्गावर असलेल्या बॉम्बेपूर गावात ऊसाच्या शेतात एका तरुणाचा मृतदेह नग्न अवस्थेत आढळल्याने एकच खळबळ उडाली होती. मृतदेह पाहूनच मारेकऱ्यांच्या क्रौर्याचा अंदाज येत होता.

ऊसाच्या शेतात 35 वर्षीय तरुणाचा नग्न मृतदेह, बेदम मारहाण करुन हत्येचा अंदाज
प्रातिनिधीक फोटो

गुरुग्राम : हरियाणाच्या यमुनानगर जिल्ह्यातील बॉम्बेपूर गावात एका तरुणाची हत्या झाल्याचे समोर आले आहे. ऊसाच्या शेतात तरुणाचा मृतदेह नग्नावस्थेत सापडला होता. ही माहिती गावकऱ्यांनी पोलिसांना दिली, त्यानंतर पोलीस अधिकारी घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला. मृताच्या शरीरावर अनेक ठिकाणी जखमांच्या खुणा आहेत. मृत व्यक्तीचे नाव नाझीम असून तो बॉम्बेपूरचा रहिवासी आहे.

नेमकं काय घडलं?

यमुनानगर पांवटा साहिब राष्ट्रीय महामार्गावर असलेल्या बॉम्बेपूर गावात ऊसाच्या शेतात एका तरुणाचा मृतदेह नग्न अवस्थेत आढळल्याने एकच खळबळ उडाली होती. मृतदेह पाहूनच मारेकऱ्यांच्या क्रौर्याचा अंदाज येत होता. बॉम्बेपूर गावातील रहिवासी 35 वर्षीय नाझीम सकाळी जनावरांना चारा आणण्यासाठी शेतात गेला होता. परंतु बराच वेळ होऊनही तो परत न आल्याने कुटुंबातील सदस्यांना काळजी वाटू लागली. त्यांनी गावकऱ्यांच्या साथीने शोध घेतला असता नाझीमचा मृतदेह ऊसाच्या शेतात सापडला. मुलाच्या मृतदेहाची अवस्था पाहून कुटुंबीयांनी एकच हंबरडा फोडला.

हत्येचं कारण अद्याप अस्पष्ट

गावकऱ्यांकडून माहिती मिळाल्यानंतर घटनास्थळी पोहोचलेल्या पोलीस अधिकाऱ्यांनी घटनास्थळावरुन महत्त्वाचे पुरावे गोळा केले. मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे. पोलीस अधिकारी लज्जाराम यांनी सांगितले की, मृताच्या शरीरावर सर्वत्र जखमेच्या खुणा होत्या. मृतदेहाची स्थिती पाहून प्राणघातक हल्ला आणि आरोपींच्या क्रूरतेचाही अंदाज येऊ शकतो. सध्या मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे. शवविच्छेदन अहवाल आणि नातेवाईकांच्या जबाबाच्या आधारे पुढील कारवाई केली जाईल. आरोपी कोण आहेत किंवा हत्येचं नेमकं कारण काय, याविषयी अद्याप स्पष्टता नाही.

बिहारमध्ये मारहाण करुन डॉक्टरची हत्या

दुसरीकडे, प्रेम प्रकरणानंतर फोटो व्हायरल झाल्याने बेदम मारहाण करुन डॉक्टरची हत्या केल्याची धक्कादायक घटना बिहारमध्ये उघडकीस आली आहे. गावकरी आणि महिलेच्या कुटुंबीयांकडून अमानुषपणे करण्यात आलेल्या मारहाणीत डॉक्टरचा जागीच मृत्यू झाला. बिहारच्या जमुई जिल्ह्यातील गिधौर पोलीस स्टेशन परिसरातील सेवा गावात हा प्रकार घडल्याची माहिती आहे. मनोज पंडित असे मृत 40 वर्षीय डॉक्टरचे नाव आहे. सोमवारी रात्री ग्रामस्थांनी डॉ. मनोज पंडित यांना पकडून अमानवी मारहाण केल्याचा आरोप आहे. हत्येनंतर मृताच्या नातेवाईकांनी दोषींना अटक करण्याची मागणी पोलिस प्रशासनाकडे केली आहे.

फूल तोडल्यानं मारहाण, पपईची बाग कापून बदला

दरम्यान, नंदुरबारमध्ये एका माथेफिरूने शेतातील झेंडूचे फूल तोडले, म्हणून शेतकऱ्याने मारहाण केली. संबंधित माथेफिरूनं त्याचा बदला म्हणून अन्य दोघांच्या साथीनं पपईच्या 629 झाडांची कत्तल केल्याचे उघडकीस आले आहे. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा आणि तळोदा पोलिसांनी संयुक्त कारवाई करत दोघांना ताब्यात घेतले असून तिसरा संशयित फरार झाला आहे.

संबंधित बातम्या :

40 वर्षीय डॉक्टरचा महिलेवर जीव जडला, फोटो व्हायरल झाल्याने बोभाटा, बेदम मारहाण करुन जीव घेतला

मूल नसल्यावरुन डॉक्टर वहिनीचे सततचे टोमणे, दीराकडून हातोडी-कात्रीने वार करत हत्या

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI