समलैंगिक संबंधातून चिपळूण नगरपरिषदेच्या माजी अधिकाऱ्याची हत्या

रत्नागिरी : चिपळूण नगरपरिषदेचे निवृत्त अधिकारी रामदास सावंत यांच्या हत्येने संपूर्ण रत्नागिरीत एकच खळबळ माजली होती. मात्र, रामदास सावंत यांची हत्या कुणी केली, याबाबत गूढ कायम होतं. अखेर तीन महिन्यानंतर रामदास सावंत यांच्या हत्येचा छडा लागला आहे. समलैंगिक संबंधातून ही हत्या झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. रामदास सावंत यांची हत्या करणाऱ्या आरोपीने त्याचा गुन्हा कबूल केला असून, […]

समलैंगिक संबंधातून चिपळूण नगरपरिषदेच्या माजी अधिकाऱ्याची हत्या
Follow us
| Updated on: Jul 05, 2019 | 4:02 PM

रत्नागिरी : चिपळूण नगरपरिषदेचे निवृत्त अधिकारी रामदास सावंत यांच्या हत्येने संपूर्ण रत्नागिरीत एकच खळबळ माजली होती. मात्र, रामदास सावंत यांची हत्या कुणी केली, याबाबत गूढ कायम होतं. अखेर तीन महिन्यानंतर रामदास सावंत यांच्या हत्येचा छडा लागला आहे. समलैंगिक संबंधातून ही हत्या झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

रामदास सावंत यांची हत्या करणाऱ्या आरोपीने त्याचा गुन्हा कबूल केला असून, समलैंगिक संबंधातून रामदास सावंत यांची हत्या केल्याचं सांगितलं. पोलीस अधिक्षक प्रवीण मुंढे यांनी यासंदर्भात पत्रकार परिषदेत याप्रकरणी माहिती दिली. पोलिसांच्या पत्रकार परिषदेनंतर रामदास सावंत यांच्या हत्येमागील कारण समजताच संपूर्ण चिपळूणमध्ये एकच खळबळ उडाली.

एक जानेवारीला चिपळूण बावशेवाडी परिसरातील विहिरीजवळ रामदास सावंत यांचा मृतदेह आढळून आला होता. त्यांच्या डोक्यावर वार करुन त्यांची हत्या करण्यात आली होती. त्यांच्या हत्येनंतर अनेक दिवसांपर्यंत पोलिसांच्या हाती काहीही लागलं नव्हतं. हत्या करणाऱ्याने सावंत यांच्या शरीरावरील दागिनेही काढून घेतले होते. त्यामुळे ही हत्या चोरीच्या उद्देशाने झाली असावी असा पोलिसांचा प्राथमिक अंदाज होता. मात्र, रामदास सावंत यांच्या हत्येचं नेमकं कारण कळत नसल्याने, हत्येचं गूढ वाढत जात होतं.

पोलिसांनी अधिक तपास सुरु केला. मात्र, त्यांच्या हाती काहीही लागले नाही. त्यानंतर अखेर तीन महिन्यानंतर चिपळूण पोलिसांना आरोपीला पकडण्यात यश आलं आहे. याप्रकरणी पेलिसांनी आरोपी आकाश नायर (वय 24) याला अटक केली, आखाश हा खेर्डी येथील राहणार आहे.

Non Stop LIVE Update
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?.
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?.
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका.
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल.
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?.
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?.
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?.
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ.
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा.
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?.