बंद बंगल्याचे कुलूप उचकटून चोरी, इचलकरंजीत 3 लाख 67 हजारांचा माल लंपास

दरम्यान याप्रकरणी गावभाग पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. (Ichalkaranji thief break door thieves all jewellery)

बंद बंगल्याचे कुलूप उचकटून चोरी, इचलकरंजीत 3 लाख 67 हजारांचा माल लंपास
Follow us
| Updated on: Nov 29, 2020 | 5:29 PM

कोल्हापूर : इचलकरंजीतील सिद्धकला कॉलनीत चोरट्यांनी बंद बंगल्याचे कुलूप उचकटून कपाट फोडून घरात चोरी केल्याचा प्रकार समोर आला आहे. चोरांनी सोन्याच्या दागिन्यांसह जवळपास 3 लाख 67 हजार रुपयांचा ऐवज चोरुन नेला. त्या ठिकाणी सीसीटिव्ही असल्याने हे चोर यात कैद झाले आहे. दरम्यान याप्रकरणी गावभाग पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. (Ichalkaranji thief break door thieves all jewellery)

मिळालेल्या माहितीनुसार, इचलकरंजी-सांगली रोडवरील मुसळे हायस्कूल परिसरात सिद्धकला कॉलनी आहे. या ठिकाणी एका बंगल्यात डॉ. सुनिल बंडगर हे कुटुंबासह भाड्याने राहताच. स्वामी मळ्यात बंडगर यांच्या घराचे बांधकाम सुरू होते. त्यामुळे ते सकाळी बांधकामाच्या ठिकाणी गेले होते.

तर त्यांच्या पत्नी बंगल्याला कुलूप लावून जवळच असलेल्या मैत्रिणीकडे गेल्या होत्या. दुपारी सुनिल बंडगर हे घरी परतले असता त्यांनी बंगल्याच्या प्रवेशद्वाराला कुलूप नसल्याचे निदर्शनास आले.

त्यांनी तात्काळ आत जात घराची आणि बेडरूमची पाहणी केली. त्यावेळी त्यांना कपाटातील साहित्य विखूरुन टाकलेले दिसून आले. चोरट्यांनी कपाट फोडून नेकलेस, चेन, कानातले, वेल, साखळी, पेंडल यांसह सोन्याचे आणि चांदीचे दागिने असा जवळपास 6 लाखाचा मुद्देमाल लंपास केल्याचे आढळून आले.

यानंतर बंडगर यांनी तातडीने गावभाग पोलिसांशी संपर्क साधत घरात चोरी झाल्याची माहिती दिली. ही माहिती मिळताच पोलिस उपअधिक्षक बाबुराव महामुनी हे पथकासह घटनास्थळी दाखल झाले. यावेळी चोरट्यांचा माग काढण्यासाठी श्‍वान पथकाला पाचरण केले. पण त्यावेळी परिसरात चौकशी करत असता एका गॅस गोदाममधील सीसीटिव्ही फुटेजची पाहणी केली. त्यात चोरट्यांच्या हालचाली कैद झालं आहे. (Ichalkaranji thief break door thieves all jewellery)

संबंधित बातम्या : 

आई-वडील मुंबईत, अभ्यासासाठी एकटाच गावी, MPSC परीक्षा पुढे गेल्याने तरुणाची आत्महत्या

दुबईचं सीमकार्ड वापरत बंगळुरुतून रॅकेट ऑपरेट, नवी मुंबई पोलिसांची आंतरराज्यीय वाहनचोर टोळीला अटक

Non Stop LIVE Update
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?.
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका.
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका.