दाऊदचा हस्तक आंतरराष्ट्रीय ड्रग्ज माफिया डेव्हिडचा इमारतीवरुन पडून जागीच मृत्यू, पोलिसांचा प्लॅन फसला!

दिल्ली पोलिसांनी मुंबईत टाकलेल्या छाप्यादरम्यान, आंतरराष्ट्रीय ड्रग माफिया डेव्हिडचा एका उंच इमारतीवरून खाली पडून जागीच मृत्यू झालाय. मृत्युमुखी पडलेल्या ड्रग माफियाचं कनेक्शन डी गँगच्या कैलास राजपूतशी होतं.

दाऊदचा हस्तक आंतरराष्ट्रीय ड्रग्ज माफिया डेव्हिडचा इमारतीवरुन पडून जागीच मृत्यू, पोलिसांचा प्लॅन फसला!
आंतरराष्ट्रीय ड्रग्ज माफिया डेव्हिडचा इमारतीवरुन पडून जागीच मृत्यू

मुंबई : दिल्ली पोलिसांनी मुंबईत टाकलेल्या छाप्यादरम्यान, आंतरराष्ट्रीय ड्रग माफिया डेव्हिडचा एका उंच इमारतीवरून खाली पडून जागीच मृत्यू झालाय. मृत्युमुखी पडलेल्या ड्रग माफियाचं कनेक्शन डी गँगच्या कैलास राजपूतशी होतं. छाप्यादरम्यान हेल्मेट घालून दोरीच्या साहाय्याने डेव्हिड इमारतीवरुन खाली उतरण्याचा प्रयत्न करत होता. मात्र त्याच्या हातून दोरी सुटली आणि तो थेट जमिनीवर पडला. त्यामुळे त्याचा जागीच मृत्यू झाला. जर तो पोलिसांच्या हाती जिवंत लागला असता तर त्याच्यााकडून बऱ्याच प्रकरणांचा उलगडा झाला असता. त्यामुळे पोलिसांचा प्लॅन फसल्याचं बोललं जातंय.

पळून जाण्याच्या प्रयत्नात इमारतीवरुन पडून डेव्हिडचा मृत्यू

दिल्ली पोलिसांची स्पेशल सेल अनेक दिवसांपासून आंतरराष्ट्रीय ड्रग माफिया दाऊदचा शोध घेत होती, जो परदेशात बसून कैलाश राजपूतच्या संपर्कात होता. हा तोच कैलास आहे, जो मोस्ट वॉन्टेड अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमच्या अगदी जवळचा मानला जातो. डेव्हिड मुंबईतील मालाडमध्ये लपल्याची ठोस माहिती पोलिसांना मिळाली होती.

या माहितीच्या आधारे दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलचे पथक मुंबईत पोहोचले आणि मंगळवारी मालाड येथील त्याच्या फ्लॅटवर छापा टाकून ड्रग्ज मालकाला अटक केली. यावेळी घटनास्थळी उपस्थित असलेल्या डेव्हिडने पोलिसांना चकमा देत पळून जाण्याचा प्रयत्न केला. त्याने हेल्मेट घातले आणि उंच इमारतीवरून दोरीच्या सहाय्याने खाली उतरण्याचा प्रयत्न सुरू केला. त्याच्या हातातून दोरी सटकली आणि तो जमिनीवर पडला, त्यातच त्याचा जागीच मृत्यू झाला.

नाहीतर अनेक प्रकरणांचा उलगडा झाला असता!

मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईचा रहिवासी असलेला डेव्हिड हा कैलास राजपूतचा ड्रग्जचा व्यवसाय मुंबई आणि इतर शहरांमध्ये सांभाळायचा. कैलासच्या सांगण्यावरून डेव्हिड दुबई आणि इतर देशांमध्ये कुरिअरद्वारे ड्रग्ज खरेदी-विक्रीचे काम करायचा. दिल्ली पोलिसांनी त्याच्या अटकेसाठी एक लाख रुपयांचे बक्षीसही जाहीर केले होते. पोलिसांनी डेव्हिडला जिवंत पकडले असते तर कैलास राजपूत आणि डी कंपनीशी संबंधित अनेक गुपिते तो उघड करू शकला असता, असं म्हटलं जातंय.

हे ही वाचा :

वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी चोरी, खून, दरोडे; सांगलीतील पाटील टोळीवर मोक्का अंतर्गत कारवाई

Video : प्रवाशांची नजर चुकवायच्या, मौल्यवान वस्तू लंपास करायच्या, 7 महिलांची टोळी पोलिसांकडून जेरबंद

भोसरी पोलीस स्थानकात किरण गोसावी विरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल; परदेशात नोकरी देण्याच्या बहाण्याने घातला लाखोंना गंडा

Published On - 12:47 pm, Fri, 12 November 21

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI