जळगाव हादरलं! सख्ख्या बहिणींवर दोन वेळा अत्याचार, धक्कादायक घटना समोर
राज्यात महिलांवरील अत्याचाराच्या घटनांमध्ये वाढ होताना दिसत आहे. अशातच जळगाव जिल्ह्यामधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. जळगावच्या एरंडोल तालुक्यातील एका गावात राहणाऱ्या दोन्ही सख्ख्या बहिणींवर अत्याचार झाल्याची घटना समोर आलीये.
जळगाव जिल्ह्यात 11 आणि 13 वर्षीय दोन सख्ख्या बहिणीवर अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. 10 सप्टेंबर ते 11 सप्टेंबर च्या दरम्यान या नराधमाने दोन्ही अल्पवयीन सख्ख्या बहिणींवर दोन वेळा अत्याचार केला आहे. धरणगाव पोलीस ठाण्यात बाल लैंगिक अत्याचार अधिनियम कायद्यानुसार संशयित आरोपी विनोद बारेला याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विनोद हुसेन बारेला असे वर्षीय नराधमाचे नाव असून त्याला धरणगाव पोलिसांनी अटक केली आहे.
अत्याचार केल्यानंतर घरात कुणाला सांगितले तर दोघांना मारून टाकण्याची देखील धमकी आरोपीने दोन्ही मुलींना दिल्याची माहिती सुद्धा समोर आली आहे. दरम्यान पीडित मुलींनी हा प्रकार तिच्या आईला सांगितला त्यानंतर तिच्या आईने थेट धरणगाव पोलीस ठाण्यात धाव घेतली व संशयित आरोपी विनोद बारेला याच्या विरोधात तक्रार दिली. त्यानुसार धरणगाव पोलीस ठाण्यात बाल लैंगिक अत्याचार अधिनियम कायद्यानुसार संशयित आरोपी विनोद बारेला याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अल्पवयीन असलेल्या दोन सख्ख्या बहिणीवरील अत्याचाराच्या घटनेने जळगाव जिल्हा पुन्हा हादरला आहे.
राज्यातील महिला आणि मुली आता घराबाहेर सोडा पण घराजवळच्या परिसरातही सुरक्षित नाहीयेत. राज्यात महिला सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे. राज्यातील महिला आणि तरूणी नराधमांच्या शिकार होत आहेत. आता लहान चिमुकल्या मुलींनाही हे नराधम आपली शिकार करत आहेत. या वाढत्या घटनांमुळे पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.