Lockdown | जालन्यात अवैध दारुवर धडक कारवाई, विदेशी दारुचा मोठा साठा जप्त

जालन्यात लॉकडाऊनमध्ये अवैधरित्या विक्रीसाठी आलेला विदेशी दारुचा मोठा साठा जप्त करण्यात आला आहे.

Lockdown | जालन्यात अवैध दारुवर धडक कारवाई, विदेशी दारुचा मोठा साठा जप्त

जालना : जालन्यात लॉकडाऊनमध्ये अवैधरित्या विक्रीसाठी (Jalna Liquor Seized) आलेला विदेशी दारुचा मोठा साठा जप्त करण्यात आला आहे. यादरम्यान तब्बल पावणेअकरा लाखाची विदेश दारु आणि 4 लाखाचा पिकअप टेम्पो, असा पावणेपंधरा लाखाचा मुद्देमाल जप्त (Jalna Liquor Seized) करण्यात आला आहे.

जालन्यातील मंठा चौफुली भागात पुष्कनगरात ही कारवाई करण्यात आली. पोलीस अधीक्षक एस. चैतन्य यांच्या वाचक शाखेने मध्यरात्री ही कारवाई केली. यावेळी दारुसाठ्याने भरलेला पिकअप टेम्पो सोडून चालक पसार झाला आहे.

या कारवाईत पोलिसांनी एकूणे 10 लाख 79 हजार किंमतीचा विदेशी दारुचा साठा जप्त केला.

– 6 लाख 92 हजार 800 रुपयांचे मॅकडोल नंबर-1 दारुचे 124 बॉक्स

– 1 लाख 53 हजार 600 रुपयांचे ब्लेंडर्स प्राईड दारुचे 10 बॉक्स

– 17 हजार 500 रुपयांचे 100 पायपर्स ब्लेंडर्स स्कॉच व्हिस्कीच्या 5 बॉटल्स (Jalna Liquor Seized)

– 5 हजार रुपयाची व्हाईट लेबल्स ब्लेंडर्स स्कॉच व्हिस्कीच्या 5 बॉटल्स

– 11 हजार रुपयांच्या चिवास रिगल (12) ब्लेंडर्स स्कॉच व्हिस्कीच्या 5 बॉटल्स

त्याशिवाय 4 लाख रुपये किमतीचा पिकअप टेम्पोही जप्त करण्यात आला आहे. या कारवाईत 14 लाख 79 हजाराचा ऐवज पोलिसांनी केला जप्त केला आहे. या प्रकरणी तालुका जालना पोलीस ठाण्यात अज्ञात टेम्पो चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

राज्यात लॉकडाऊनचा तिसरा भाग 4 मेपासून लागू झाला. यादरम्यान लॉकडाऊनचे नियम शिथील करत रेड झोनमधील कंटेनमेंट झोन वगळता इतर सर्व भागातील दारुची दुकानं उघडण्यास परवानगी देण्यात आली. त्याच पार्श्वभूमीवर हा दारुचा साठा अवैधरित्या जालन्यात आणला जात होता, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. याप्रकरणी पोलीस अधिक तपास (Jalna Liquor Seized) करत आहेत.

संबंधित बातम्या :

पोलीस व्हॅनमध्ये TikTok व्हिडीओ करणं भोवलं, कल्याणमध्ये दोघांवर कारवाई

चंद्रपुरात भाजप नेत्याच्या घरी थरार, वडिलांचा दोन मुलांवर गोळीबार, स्वत:वरही गोळी झाडली

राहत्या इमारतीच्या बाराव्या मजल्यावरुन उडी, पिंपरी चिंचवडमध्ये आयटी अभियंत्याची आत्महत्या

अत्यावश्यक सेवेचा गैरवापर करत मुंबई ते सांगली प्रवास, तरुणीला कोरोनाची लागण, पाच जणांवर गुन्हे