पकडलं एकाला सापडले नऊ चोर; कल्याण पोलिस ठाण्यात रंगला एकदम फिल्मी ड्रामा

पोलीसांच्या हाती एक चोरटा सापडला. त्याने चौकशीत दुसऱ्या चोरट्याचं नाव सांगीतलं ,दुसऱ्याने तिसऱ्याचं नाव सांगीतले अशा प्रकारे चोरी फक्त आम्ही करत नाही इतरही करतात असे सांगत चोरट्याने एकमेकांची नाव सांगीतल्याने पोलीसांच्या हाती चक्क 9 वाहन चोरटे लागले आहेत. त्यांच्याकडून 10 गुन्ह्यांची उकल करण्यात कल्याणच्या कोळसेवाडी पोलीसांना यश आले आहे.

पकडलं एकाला सापडले नऊ चोर; कल्याण पोलिस ठाण्यात रंगला एकदम फिल्मी ड्रामा
प्रातिनिधिक छायाचित्रImage Credit source: tv9
Follow us
| Updated on: Aug 11, 2022 | 6:19 PM

कल्याण : कल्याण शहरातील एका पोलीस ठाण्यात अत्यंत फिल्मी ड्रामा पहायला मिळाला आहे. पोलिसांनी पकडले एका चोराला पण मात्र अवघ्या काही वेळात  तब्बल नऊ चोर कल्याण पोलिसांच्या(Kalyan police ) हाती लागले. फक्त मी नाही याने पन चोरी केलीय त्याने पण चोरी केलेय असं म्हणत एका पाठोपाठ नऊ चोर पोलिसांना सापडले आहेत. या चोरट्यांकडून मोठा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला आहे.

एकाने दुसऱ्याचं नाव सांगीतले दुसऱ्याने तिसऱ्याचे आणि तिसऱ्याने चौथ्याचं… पोलिसांना सापडले नऊ चोर

कल्याण डोंबिवली शहरात गेल्या काही दिवसांपासून वाहन चोरीच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ झालीये. या पार्श्वभूमीवर सर्व पोलीस स्टेशनमध्ये विशेष पथकं तयार करण्यात आली आहेत. गस्त घालत असताना पोलीसांच्या हाती एक चोरटा सापडला. त्याने चौकशीत दुसऱ्या चोरट्याचं नाव सांगीतलं ,दुसऱ्याने तिसऱ्याचं नाव सांगीतले अशा प्रकारे चोरी फक्त आम्ही करत नाही इतरही करतात असे सांगत चोरट्याने एकमेकांची नाव सांगीतल्याने पोलीसांच्या हाती चक्क 9 वाहन चोरटे लागले आहेत. त्यांच्याकडून 10 गुन्ह्यांची उकल करण्यात कल्याणच्या कोळसेवाडी पोलीसांना यश आले आहे. त्यांच्याकडून 9 बाईक आणि 1 रिक्षा जप्त करण्यात आली आहे.

कल्याण पूर्व कोळशेवाडी पोलिस ठाण्याच्या हद्दीत वाहन चोरीचे प्रकार वाढले होतें.या गुन्ह्यांचा तपास करत आरोपींना गजाआड करण्यासाठी डीसिपी सचिन गुंजाळ , एसीपी उमेश माने पाटील ,वरिष्ठ पोलीस निरीक्षक बशीर शेख यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस अधिकारी हरिभाऊ बोचरे यांच्या पथकाने शोध सुरू केला. प्रत्येक चौकात या पथकाने पेट्रोलिंग सुरू केली.

पेट्रोल सुरु असताना पोलिसांना सापडले चोर

याच पेट्रोलिंग दरम्यान या पथकाला भावेष कुंड नावाचा चोरटा हाती लागला. त्याच्या जवळ असलेल्या गाडीचे कागदपत्र विचारले असता ती गाडी चोरीची निघाल्याने पोलिसांनी त्याची चौकशी केली व त्याला ताब्यात घेतले चौकशी दरम्यान त्यांनी गाडी चोरीच्या गुन्ह्यात त्याचा मित्रही सामील असल्याचे त्यांनी सांगितले. त्या नंतर पोलिसांनी त्याचा मित्र आकाश मेहेरलाही ताब्यात घेतले व या दोघांची चौकशी सुरू असताना त्यांनी आणखी चोरट्यांची नावं सांगीतली. त्यानंतर पुन्हा काही वाहन चोरांना अटक करण्यात आली विशेष म्हणजे या चोरांनी फक्त आम्ही चोरी करतो का असे सांगत परिसरातील अन्य चोरांची ही नावे सांगितली मग काय पोलिसांनी एकामागोमाग एक असे 9 वाहन चोरांना बेड्या ठोकल्या .

आकाश महर ,भावेश कुंड,जतिन अजेंद्र,क्रिश एनथोनी,सतीश लोंढे , मंगेश डोंगरे,अविनाश उर्फ लाला चिकने, मितेश पंडित ,गणेश ससाणे अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत .या चोरट्याविरोधात कल्याण ,उल्हासनगर , डायघर पोलिस ठाण्यात अनेक गुन्हे दाखल आहेत. सध्या पोलिसांनी या आरोपींकडून 9 वाहनांसह अनेक बॅट-याही जप्त केले असून या चोरट्या कडून अनेक गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता पोलिसांकडून वर्तवली जात आहे

Non Stop LIVE Update
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?.
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका.
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका.