चौथीत शिकणाऱ्या मुलीचे अपहरण करुन खून

सांगली : सांगली जिल्ह्यातील वज्रयवाड येथील 9 वर्षाच्या शाळकरी मुलीचा संशयास्पद मृत्यू झाला आहे. या मुलीचे अपहरण करुन तिचा खून केल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. तिचा मृतदेह एका विहिरीत आढळून आल्याने गावात एकच खळबळ उडाली आहे. अज्ञात व्यक्तीने गुरुवारी गावातून तिचे अपहरण केल्याची तक्रार जत पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली होती. जत पोलीस सध्या […]

चौथीत शिकणाऱ्या मुलीचे अपहरण करुन खून
Follow us
| Updated on: Jul 05, 2019 | 4:19 PM

सांगली : सांगली जिल्ह्यातील वज्रयवाड येथील 9 वर्षाच्या शाळकरी मुलीचा संशयास्पद मृत्यू झाला आहे. या मुलीचे अपहरण करुन तिचा खून केल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. तिचा मृतदेह एका विहिरीत आढळून आल्याने गावात एकच खळबळ उडाली आहे. अज्ञात व्यक्तीने गुरुवारी गावातून तिचे अपहरण केल्याची तक्रार जत पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली होती. जत पोलीस सध्या या घटनेचा अधिक तपास करुन आरोपीचा शोध घेत आहेत.

या बालिकेच्या मृतदेहावर शवविच्छेदन अहवाल मिरजच्या शासकीय रुग्णालयात करण्यात आला आहे. मात्र या अहवालाबाबत अद्याप माहिती मिळू शकलेली नाही. व्हिसेरा राखून ठेवण्यात आला आहे. स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस अधिकारी या प्रकरणाचा तपास करत आहेत.

अक्षरा ही गुरुवारी सकाळी शाळेत गेली होती. सकाळी 11.30 वाजता शाळा सुटल्यावर ती घरी जात होती. त्यावेळी वाटेत जतला दवाखान्यात जाणारी आई अक्षराला भेटली. अक्षराने आईला जतमधून खाऊ आणअसं सांगितलं. मात्र अक्षरा दुपारी दोन वाजेपर्यंत घरी आली नव्हती. त्यामुळे तिच्या आजीने चौकशी केली. सर्वत्र शोधाशोध करुनही ती न सापडल्याने जत पोलीस ठाण्यात पावडय्या सिध्दया मठपती यांनी गुरुवारी फिर्याद दाखल केली. या घटनेचा जत पोलिसांनी तात्काळ तपास सुरू केला. स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागानेही पथक स्थापन करुन तपास सुरू केला.

शनिवारी सकाळी अक्षराच्या घरापासून सुमारे दोनशे फूट अंतरावरील विहिरीत अक्षराचा मृतदेह आढळून आला. या विहिरीत पाणी कमी आहे. अपहरण करुण अत्याचार करून तिचा खून केल्याचा संशय आहे.

Non Stop LIVE Update
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?.
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका.
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका.