17 वर्षीय तरुणीवर चाकू हल्ला, नागरिकांनी आरोपीला जागेवरच चोपलं

यवतमाळ येथे एका 17 वर्षीय तरुणीवर दोन तरुणांनी चाकू हल्ला केला. यामध्ये तरुणी जखमी झाली आहे. या दोन हल्लेखोर तरुणांपैकी एकाला पकडण्यात पोलिसांना यश आलं आहे. मात्र, दुसरा हल्लेखोर अद्याप फरार आहे.

  • विवेक गावंडे, टीव्ही 9 मराठी, यवतमाळ
  • Published On - 21:42 PM, 2 Sep 2019
17 वर्षीय तरुणीवर चाकू हल्ला, नागरिकांनी आरोपीला जागेवरच चोपलं

यवतमाळ : एका तरुणीवर चाकू हल्ला झाल्याची घटना यवतमाळात घडली (Yavatmal). शहरातील बसस्थानक परिसरातील एका हॉटेलजवळ सोमवारी (2 सप्टेंबर)सायंकाळी ही धक्कादायक घटना घडली. दोन तरुणांनी एका 17 वर्षीय तरुणीवर चाकू केला (Knife attack on girl). या प्रकरणी पोलिसांनी नंदकिशोर चौधरी या तरुणाला ताब्यात घेतलं आहे. तर पीडित तरुणीवर सध्या रुग्णालयात उपचार सुरु आहे.

वर्धा येथील मुळची रहवासी असलेली 17 वर्षीय पिडीत हा यवतमाळमधील कनिष्ठ विद्यालयात शिक्षण घेत आहे. सोमवारी सायंकाळच्या वेळी ही तरुणी एका महिलेसह काही कामानिमित्त बसस्थानक परिसरात आली होती. बसस्थानकापासून काही अंतरावर असलेल्या एका हॉटेलजवळ दोन दुचाकीस्वारांनी या तरुणीला घेरलं. दुचाकीस्वार तरुणांनी तरूणीसोबत असलेल्या महिलेला धक्का दिला आणि त्यानंतर तरुणीच्या पोटावर चाकूने वार करण्यास सुरुवात केली. यावेळी सोबत असलेल्या महिलेने प्रसंगावधान दाखवत आरडाओरड केली.

पीडित तरुणी आणि महिलेचा आवाज ऐकून परिसरातील नागरिकांनी धाव घेतली. चाकू हल्ला करणाऱ्या तरुणांना पकडून नागरिकांनी चांगलाच चोप दिला. दरम्यान, एकाने घटनास्थळावरुन पळ काढला तर दुसऱ्या तरुणाला नागरिकांनी पोलिसांच्या स्वाधीन केलं. नंदकिशोर चौधरी असं ताब्यात घेतलेल्या तरुणाचं नाव आहे, तो वर्धा येथील रहिवासी आहे. मात्र, नंदकिेशोर याच्यासोबतच्या साथीदार अद्याप फरार आहे. या प्रकरणी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरु आहे. हा हल्ला करण्यामागचं नेमकं कारण काय? याचा पोलीस शोध घेत आहेत. तर जखमी तरुणीवर सध्या जिल्हा शासकीय रूग्णालयात उपचार सुरू आहेत.

संबंधित बातम्या :

जुगारींकडून पोलीस कर्मचाऱ्यांना बेदम मारहाण

Jalgaon Gharkul Scam | सुरेश जैन यांना 7 वर्ष शिक्षा आणि 100 कोटी दंड, गुलाबराव देवकर यांना 5 वर्षांची शिक्षा

दारु पिताना किरकोळ वाद, तरुणाची हॉटेलमध्येच गळा चिरुन हत्या

मुंबईत अभिनेत्रीची आत्महत्या, आईसोबत वादानंतर टोकाचं पाऊल