भररस्त्यात विनयभंग केल्याने तरुणीची आत्महत्या; जमावाने घरात घुसून तरुणाला बदडले

तरुणांनी भररस्त्यात विनयभंग आणि अश्लील शिवीगाळ केल्याने तन नाशक प्राशन केलेल्या तरुणीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

  • भूषण पाटील, टीव्ही 9 मराठी, कोल्हापूर
  • Published On - 13:00 PM, 31 Oct 2020
भररस्त्यात विनयभंग केल्याने तरुणीची आत्महत्या; जमावाने घरात घुसून तरुणाला बदडले

कोल्हापूर : तरुणांनी भररस्त्यात विनयभंग आणि अश्लील शिवीगाळ केल्याने तन नाशक प्राशन (Kolhapur Molestation Girl Suicide) केलेल्या तरुणीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. कोल्हापूरच्या पन्हाळा तालुक्यातील नणुन्द्रे इथे हा संतापजनक प्रकार घडला. पीडित तरुणीच्या मृत्यूनंतर संतप्त जमावाने विनयभंग करणाऱ्या संशयित आरोपींच्या घरात घुसून प्रापंचिक साहित्याची नासधूस केली (Kolhapur Molestation Girl Suicide).

याप्रकरणी अजित पाटील, अक्षय चव्हाण आणि प्रदीप पाटील यांच्याविरोधात पन्हाळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, आपल्या विरोधात गुन्हा दाखल झाल्याचे समजताच संशयित अजित पाटील यानेही कीटकनाशक प्राशन करुन आत्महत्येचा प्रयत्न केला. या सर्व प्रकारामुळे नणुन्द्रे गावात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून खबरदारी म्हणून पोलिसांनी गावात मोठा पोलीस फौजफाटा तैनात केला आहे.

नेमकं प्रकरण काय?

संशयित अजित प्रदीप आणि अक्षय यांनी 23 ऑक्टोबरला कोलोली ते तेलवे रस्त्यावरुन जाणाऱ्या तरुणीला अडवून तिचा विनयभंग केला होता. या प्रकारामुळे घाबरलेल्या पीडितेने त्याच दिवशी सायंकाळी विषारी औषध प्राशन केलं. तिच्यावर कोल्हापुरात खाजगी रुग्णालयात उपचार सुरु होते. उपचार सुरु असताना काल रात्री उशिरा तिचा मृत्यू झाला.

महिला अत्याचाराची आठवड्यातील दुसरी घटना 

जिल्ह्यात महिला अत्याचाराची ही आठवड्यातील दुसरी घटना आहे. दोन दिवसांपूर्वी पन्हाळा तालुक्यातील सावे येथे तीन वर्षाच्या चिमुरडीवर 55 वर्षीय व्यक्तीने खाऊचे आमिष दाखवून अत्याचार केल्याचा संतापजनक प्रकार समोर आला होता. हे प्रकरण ताजे असतानाच तरुणांच्या छेडछाडीला घाबरुन युवतीने आत्महत्या केली. या दोन्ही घटनेतील आरोपींवर आता लवकरात लवकर कठोर कारवाई व्हावी अशी मागणी होऊ लागली आहे.

Kolhapur Molestation Girl Suicide

संबंधित बातम्या :

अकोल्यात कुख्यात आरोपीची दगडाने ठेचून हत्या, पूर्ववैमनस्यातून खून झाल्याची शक्यता

बाप-बेटा नात्याला काळीमा फासणारी घटना, वडिलांचा ओरडण्याचा राग मनात ठेऊन हत्या