स्टेशनकडे चालत निघालेल्या महिलेवर झुडपात नेऊन गँगरेप, कुर्ल्यातील थरारक घटना, सर्व आरोपींना बारा तासात बेड्या

मुंबईतील लोकमान्य टिळक टर्मिनसवर झालेल्या सामूहिक बलात्कारप्रकरणी मुंबई पोलिसांनी बारा तासांच्या आत चारही आरोपींच्या मुसक्या आवळल्या.

स्टेशनकडे चालत निघालेल्या महिलेवर झुडपात नेऊन गँगरेप, कुर्ल्यातील थरारक घटना, सर्व आरोपींना बारा तासात बेड्या
Follow us
| Updated on: Jan 21, 2020 | 3:33 PM

मुंबई : मुंबईतील लोकमान्य टिळक टर्मिनसवर झालेल्या सामूहिक बलात्कारप्रकरणी (LTT Kurla gangrape) मुंबई पोलिसांनी बारा तासांच्या आत चारही आरोपींच्या मुसक्या आवळल्या. सोनू तिवारी, निलेश बारसकर, सिध्दार्थ वाघ आणि श्रीकांत भोगले या नराधमांना बेड्या ठोकल्या आहेत. पीडित महिला मूळगावी मध्य प्रदेशात जाण्यासाठी रेल्वे स्थानकाकडे निघाली होती. त्यावेळी लोकमान्य टिळक टर्मिनसजवळ निर्जनस्थळी गाठून, आरोपींनीहे क्रूर कृत्य (LTT Kurla gangrape) केलं. याशिवाय तिचे पैसे आणि दागिनेही लुटले.

काय आहे संपूर्ण प्रकरण?

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित महिलेच्या पतीचं तीन वर्षापूर्वी निधन झालं आहे. ती तिच्या दोन मुलांसह वरळी इथं राहते. ती मूळची मध्य प्रदेशची आहे. मुंबईत ती घरकामं करते. सोमवारी रात्री पीडित महिला मध्य प्रदेशला जाणारी रेल्वे पकडण्यासाठी आली होती त्यावेळी हा सर्व प्रकार झाला. पीडित महिला लोकमान्य टिळक टर्मिनसवरुन  मध्य प्रदेशकडे जात होती. रात्री 11 च्या सुमारास पीडित महिला कुर्ला रेल्वे स्थानकापासून लोकमान्य टिळक टर्मिनसकडे चालत जात होती. त्यावेळी पायी जात असताना ती साबळेनगर येथील झाडीमध्ये लघुशंकेसाठी गेली. मात्र त्याठिकाणी आरोपी सोनू तिवारी आणि निलेश बारसकर हे आधीपासूनच पलिकडे उभे होते. त्यांनी महिलेस झाडीत ओढून तिच्यावर बलात्कार केला.

ही घटना घडत असतानाच आरोपी सिध्दार्थ वाघ आणि श्रीकांत भोगले तिथून आपल्या दुचाकीवरुन जात होती. त्यांनीदेखील या महिलेवर बलात्कार केला. याशिवाय पीडित महिलेचे रोख 3 हजार रुपये आणि मंगळसूत्र खेचून पळून जात होते. मात्र हा सर्व प्रकार रस्त्याने जाणाऱ्या अन्य महिलेच्या नजरेस पडला. त्या महिलेने तातडीने 100 नंबरवर फोन करुन माहिती दिली. यानंतर पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत, स्थानिकांच्या मदतीने दोन आरोपींना तिथल्या तिथे अटक केली. तर अन्य दोन आरोपी पळून गेले.

मात्र पोलिसांनी उर्वरित दोन्ही आरोपींनाही आज पहाटे बेड्या ठोकून त्यांच्या मुसक्या आवळल्या. बारा तासाच्या आतच पोलिसांनी या चारही आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत. या घटनेमुळे मात्र परिसरात खळबळ उडाली आहे.

Non Stop LIVE Update
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?.
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?.
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका.
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल.
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?.
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?.
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?.
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ.
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा.
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?.