जरे यांच्या घरात बोठेविरुद्ध लिहिलेले पत्र सापडलं; मोठा खुलासा होण्याची शक्यता

...म्हणून बोठे याच्या अडचणी वाढत चालल्या आहेत. Letter Written Against Bothe Was Found In Jare House

  • कुणाल जायकर, टीव्ही 9 मराठी, अहमदनगर
  • Published On - 19:07 PM, 10 Dec 2020
जरे यांच्या घरात बोठेविरुद्ध लिहिलेले पत्र सापडलं; मोठा खुलासा होण्याची शक्यता

अहमदनगर: यशस्विनी महिला ब्रिगेडच्या अध्यक्षा रेखा जरे यांच्या मुलाने आमच्या कुटुंबाला पत्रकार बाळ बोठेपासून धोका असल्याचं म्हणत पोलीस अधीक्षकांकडे संरक्षणाची मागणी केली आहे. तर जरे यांच्या घरात बोठे विरुद्ध लिहिलेले पत्र पोलिसांच्या हाती लागल्यानं या प्रकरणाला वेगळंच वळण लागलं आहे. त्यामुळे बोठे याच्या अडचणी वाढत चालल्या आहेत. पाहूया यावर एक स्पेशल रिपोर्ट…(Letter Written Against Bothe Was Found In Jare House)

यशस्वी महिला ब्रिगेडच्या संस्थापक अध्यक्षा रेखा जरे यांच्या हत्येप्रकरणी तपासात नवनवीन सत्य समोर येऊ लागली आहेत. 30 नोव्हेंबरला रेखा जरे यांची हत्या करण्यात आली होती. रेखा जरे या त्यांच्या कुटुंबीयांसह संध्याकाळी पुण्याहून कामं उरकून अहमदनगरकडे येत होत्या. यावेळी त्यांच्यासोबत मुलगा, आई आणि त्यांची मैत्रीण होती. विशेष म्हणजे यावेळी जरे यांच्या मुलाने एका आरोपीचा फोटो काढला होता. त्यावरूनच तपासाची चक्रे पोलिसांनी फिरवली.

मानसिक छळ केल्याचा त्या पत्रात उल्लेख

तर आता जरे यांच्या घराची पोलिसांनी झाडाझडती घेतली. या वेळी पोलिसांना महत्त्वाचे पुरावे सापडल्याचे सूत्रांनी सांगितले. तपासादरम्यान खुद्द जरे यांनी लिहिलेलं चारपानी पत्र पोलिसांच्या हाती लागलं आहे. या पत्रात बाळ बोटे हा रेखा जर यांचा कशा प्रकारे शारीरिक आणि मानसिक छळ करायचा हे त्या पत्रात लिहिलं असल्याचं सूत्रांकडून माहिती मिळाली आहे. तर पोलिसांनी पंचनामा करून हे पत्र ताब्यात घेतले असून, हे पत्र बोटे यांच्याविरोधात सबळ पुरावा ठरू शकतो. त्यामुळे बोठे यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.

सध्या बोठेंविरोधात दररोज वेगवेगळी पत्र पोलीस अधीक्षकांकडे येत आहेत. तर जरे यांचा मुलगा रुणाल जरे याने देखील पोलिसांना पत्र लिहिले आहे. माझी आई रेखा भाऊसाहेब जरे हिची हत्या झाली असल्याने या घटनेतील सर्व आरोपी तसेच मुख्य सूत्रधार बाळ बोठे यांच्याकडून आमच्या जीविताला धोका असल्याने आम्हाला पोलीस संरक्षण मिळावे, असं त्या पत्रात त्यानं नमूद केलं आहे.

“बाळ बोठेने अनेकदा माझ्या आईचा शारीरिक आणि मानसिक छळ केला”

तसेच बाळ बोठेने अनेकदा माझ्या आईचा शारीरिक आणि मानसिक छळ केला होता, तो तिला नेहमी ठार मारण्याची धमकी द्यायचा, तसेच तुला नाही नाहीतर तुझ्या मुलांना जिवंत ठेवणार नाही, त्याची आमच्या कुटुंबावर मोठी दहशत होती. त्यामुळे आम्ही त्यांच्या विरोधात कधी बोलत नव्हतो. तर ज्या वेळेस हत्या झाली, त्या वेळेला माझी आजी सिंधुबाई वायकर आणि माझा भाऊ कुणाल जरे हे प्रत्यक्ष साक्षीदार आहेत. त्यामुळे बोठे हा गुंड प्रवृत्तीचा असल्याने त्याच्याकडून किंवा त्याच्या समर्थकांकडून आम्हाला धोका आहे, त्यामुळे लवकरात लवकर पोलीस संरक्षण मिळावे, अशी मागणी त्याने केली आहे. जरे यांच्या घरात पोलिसांना सापडलेले चारपानी पत्राने बोठेच्या अडचणी नक्कीच वाढणार आहेत. तर पोलीस फरार बोठेचा कधी शोध घेणार, याकडे सर्वांचे लक्ष लागलंय.

Letter Written Against Bothe Was Found In Jare House

संबंधित बातम्या :

Road Rage नाही, सुपारी घेऊन रेखा जरेंची हत्या, तिघांच्या अटकेने नवा ट्विस्ट

यशस्विनी महिला ब्रिगेडच्या अध्यक्षा रेखा जरे यांच्या हत्येप्रकरणी तिघांना अटक